चालू घडामोडी - १५ मे २०१७

Date : 15 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लोकसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या - लालूप्रसाद यादव यांचे मोदींना आव्हान :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली लोकप्रियता तपासून पाहण्यासाठी येत्या काही महिन्यांत विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबरोबर लोकसभा निवडणूक ही घ्यावी, असे आव्हान राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिले आहे.

  • राजकीय स्थिरतेसाठी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित घ्याव्यात या नीती आयोगाच्या सूचनेचे त्यांनी समर्थन करत या सरकारला तीन वर्षे झाली आहेत.

  • हिंमत असेल तर मोदींनी लोकसभा भंग करावी. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांबरोबरच मोदींनी लोकसभा निवडणुका घ्याव्यात.

  • तुम्हाला तुमच्या परिस्थितीबाबत माहिती होईल, असा टोलाही लालूप्रसाद यांनी लगावला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले.

  • नीती आयोगाने विधानसभा आणि संसदेच्या निवडणुका एकत्रित घेण्याचा उपाय सुचवला आहे. त्यांना संघराज्यीय पद्धत आणि प्रादेशिक पक्षांना नेस्तनाबूत करायचे आहे. हे आम्ही चालू देणार नाही. 

  • असे म्हणत नीता आयोगाचे हे काम नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. या माध्यमातून देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

भारत विरुद्ध पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा इतिहास :
  • भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज म्हणजे १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

  • पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती.

  • ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक  झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

  • आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आज पाकिस्तानने कशी नियमांची पायमल्ली करत फाशीची शिक्षा सुनावली, त्याची पोलखोल भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली जाणार आहे.

  • भारत आणि पाकिस्तानचे वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलेले आहेत.

जेएनपीटीवर विवेक देशपांडे यांची फेरनियुक्ती :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जपान दौऱ्यात मराठवाड्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व देशपांडे यांनी केले होते. या ट्रस्टवर देशपांडे यांच्याशिवाय शिपिंग मंत्रालयाचे संयुक्त सचिव बरून मित्रा, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल विशेष सचिव शशी शेखर, उरण येथील महेश रतन बाल्डी, मुंबईचे प्रमोद जठार, नागपूरचे राजेश बागडी आदींचा समावेश आहे.

  • जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर येथील रूद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे चेअरमन विवेक देशपांडे यांची केंद्र सरकारने फेरनियुक्ती केली.

  • तसेच या ट्रस्टवर निवड झालेले मराठवाड्यातील ते एकमेव असून सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली आहे. पहिली निवड सहा महिन्यांसाठी, तर दुसरी दोन वर्षांसाठी होती. या काळात सहा हजार कोटींची कामे मार्गी लागली.

अखिल भारतीय संमेलनाच्या राष्ट्रीय सचिवपदी सुमन अग्रवाल :
  • भारतीय अग्रवाल संमेलन हे भारतामधील सर्वात जुन्या सामाजिक संस्थेपैकी एक आहे.

  • सामाजिक कार्यकर्त्या सुमन अग्रवाल यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय सचिवपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.

  • अग्रवाल समाजातील महिलांना पुढे आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • अग्रवाल म्हणाल्या की, समाजाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी माझ्या सामाजिक कार्यातून दाखवण्याचा प्रयत्न करीन. महाराष्ट्रात संस्थेला मजबूत बनवण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे.

राज्यातील तीन परिचारिकांना 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार :
  • राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातील एकूण 35 परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • रुग्णसेवेचे पवित्र कार्य मनोभावे करताना इतरांना आदर्श ठरेल अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.

  • तसेच सन्मानपदक, प्रशस्तिपत्र आणि २० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार १९७३ पासून प्रदान करण्यात येतात.

  • 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' यांच्या जन्मदिन 'आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते.

केंद्र सरकार अयोध्येत राम-रामायण संग्रहालय उभारणार :
  • केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार मिळून २५ एकर जागेवर हे संग्रहालय साकारणार आहेत. यासाठी २२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

  • अयोध्येत वादग्रस्त रामजन्म स्थानापासून सहा किमी अंतरावर राम-रामायण संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

  • अखिलेश सरकारने ही जागा देण्यास नकार दिला होता. मार्चमध्ये राजकीय चित्र बदलल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीच्या काठावरील २५ एकर जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे, संग्रहालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

  • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम संग्रहालय उभारण्याची इच्छा व्यक्त करून, अयोध्येतील एक जागाही ठरवली होती.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • विश्व कुटुंबसंस्था दिन.

  • स्वातंत्र्य दिन : पेराग्वे.

जन्म, वाढदिवस

  • देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक : १५ मे १८१७

  • पिएर क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ : १५ मे १८५९

  • तेनसिंग नोर्गे, एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणार्‍या एडमंड हिलरी यांचे सहकारी : १५ मे १९१४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • संत जनाबाई : १५ मे १३५०

  • पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता : १५ मे १९९४

ठळक घटना

  • संपूर्ण भारतीय बनावटीच्या गोदावरी या पाणबुडीचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण : १५ मे १९८०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.