चालू घडामोडी - १५ नोव्हेंबर २०१७

Date : 15 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती :
  • मुंबई : भारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षितने हा नवा देश तयार केला असून त्याचं ‘किंगडम ऑफ दीक्षित’ असं नामकरणही केलं आहे.

  • इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक मोकळा प्रदेश आहे. बिर ताविल नावाचा हा भाग ‘नो मॅन्स लँड’ म्हणजे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नसलेला भाग आहे. याच संधीचा फायदा घेत सुयशनं त्या जागेवर स्वत:ची मालकी सांगितली.

  • हा प्रदेश म्हणजे आपण स्थापन केलेला नवा देश असल्याचा दावा सुयशने केला आहे. फेसबुकवर या ‘देशाचे’ फोटो पोस्ट करत त्याने स्वतःला राजा घोषित केलं आहे.

  • विशेष म्हणजे सुयशने या देशाचा झेंडाही तयार केला. स्वतःच्या वडिलांना त्याने देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. सुयशने थेट संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणी केली आहे. (source :abpmajha)

'700 वर्षांपूर्वी दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने केली होती नोटबंदी' :
  • अहमदाबाद - देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोच-या शब्दात निशाणा साधला आहे.

  • नोटबंदीवरून बोलताना सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींची तुलना मोहम्मद बिन तुघलक याच्यासोबत केली. नोटबंदीवर टीका करताना नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला 3.75 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालं असं वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले सिन्हा म्हणाले.  

  • नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींची तुलना 14 व्या शतकातील दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक याच्यासोबत करताना सिन्हा म्हणाले,   'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटबंदी केली होती.

  • अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रा देखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं चलन बाद ठरवलं'. (source :lokmat)

दिल्लीतील दहा वर्षे जुनी डिझेल वाहने हटवा :
  • नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना बाहेर ठेवण्याची दिल्ली सरकारची मागणी हरित लवादाने (एनजीटी) मंगळवारी फेटाळून लावली. त्यानंतर सरकारने आपली याचिका मागे घेतली. तथापि, १० वर्षे जुने डिझेल वाहने रस्त्यांवरून तत्काळ हटविण्याचे आदेशही एनजीटीने दिले.    

  • दिल्लीतील सर्वात प्रदूषित भागांची ओळख निश्चित करून या भागात पाण्याची फवारणी करा, असे निर्देशनही हरित लवादाने सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रदूषण न करणाºया आणि आवश्यक वस्तूंची निर्मिती करणाºया कंपन्यांच्या संचालनास परवानगी देण्यात आली.     

  • एनजीटीने ११ नोव्हेंबरच्या आपल्या आदेशात सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना सूट देण्यास नकार दिला होता. दिल्ली सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या मागणीसाठी हरित लवादाकडे धाव घेतली होती. त्यामुळे ही याचिका आता सरकारने मागे घेतली आहे. 

  • हरित लवादाने या सुनावणीत दिल्ली सरकारला विचारले की, या योजनेच्या दरम्यान महिलांसाठी स्वतंत्र बस का चालविण्यात येत नाही. एका अहवालाचा हवाला देत हरित लवादाने स्पष्ट केले की, दुचाकी वाहनातून होणारे प्रदूषण हे चारचाकी वाहनातून होणाºया प्रदूषणापेक्षा अधिक आहे मग आपण अशी मनमानी सूट कशी देऊ शकता. (source :lokmat)

सौदी अरेबियात "योग"ला मिळाला खेळाचा दर्जा :
  • रियाध - भारतात योग हा व्यायामाचा प्रकार आहे की हिंदू धर्माचरणाता एक भाग यावरून वाद विवाद सुरू आहेत. मात्र दुसरीकडे कट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने योगचा स्वीकार करताना योग ला खेळाचा दर्जा दिला आहे. सौदी प्रशासनाकडून तसी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. 

  • सौदी अरेबियाच्या ट्रेड अँड इंडस्ट्रीने क्रीडाप्रकार म्हणून योग शिकवण्याला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये अधिकृत परवाना घेऊन योग शिकवता येणार आहे. 

  • उल्लेखनीय बाब म्हणजे नोफ मारवाई या महिलेला सौदी अरेबियामधील पहिली योग प्रशिक्षक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये योगला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय नोफ यांनाच जाते. नोफ यांनी योगला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून दीर्घकाळापासून अभियान राबवले होते. 

  • अरब योग फाऊंडेशनच्या संस्थापक असलेल्या नोफ यांचे मत आहे की, योग आणि धर्म यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने योगला जागतिक मान्यता दिली होती. तसेच 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून घोषित केला होता. (source :lokmat)

‘बुलेट ट्रेन’चे रेल्वेमंत्र्यांकडून समर्थन :
  • भारतात बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयाचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी समर्थन केले असून तो विकास योजनांचा भाग असल्याचे म्हटले आहे. बुलेट ट्रेनची व्यवहार्यता व इतर मुद्दय़ांवरून या प्रकल्पावर टीका झाली होती.

  • ‘कोरा’ या संकेतस्थळाने त्यांच्या वाचकांसाठी प्रश्न विचारण्याची व त्यावर ऑनलाइन समुदायाकडून उत्तरे मागवण्याची योजना सुरू केली आहे. त्यात भारताला खरोखर बुलेट ट्रेनची गरज आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

  • त्यानंतर समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्या गोयल यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे ८८४ शब्दांत समर्थन केले. त्यांनी यात काही ग्राफिक्स व पंतप्रधान हा मुद्दा पटवून देतानाची छायाचित्रे टाकली आहेत.

  • भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून त्यासाठी भारताच्या विकास योजनेत रेल्वे जाळ्याचे आधुनिकीकरण हा प्रमुख भाग आहे. त्याचबरोबर अतिवेगवान बुलेट ट्रेनही या विकास योजनेचाच भाग आहे.

  • मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्प हा एनडीए सरकारच्या दूरदृष्टीच्या प्रकल्पांचा एक नमुना आहे. त्यातून सुरक्षा, वेग व सेवा यात लोकांना मोठी सुधारणा दिसून येईल शिवाय भारतीय रेल्वे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात वेग व कौशल्ये यात आघाडीवर जाईल. कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला नेहमीच विरोध होत असतो.(source :loksatta)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.

  • १९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.

  • १९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

  • १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.

  • १९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.

  • २०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

जन्म दिवस

  • १७३८: जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट१८२२)

  • १८७५: झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९००)

  • १८८५: आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)

  • १९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू:  २४ ऑक्टोबर १९७९)

  • १९१७: संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)

  • १९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)

  • १९२९: कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.

  • १९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर१९९८)

  • १९८६: लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म.

मृत्यू

  • १७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)

  • १९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन. (जन्म: १९ मे१९१०)

  • १९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.

  • १९८२: भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)

  • १९९६: कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.

  • २०१२: केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट१९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.