चालू घडामोडी - १५ ऑक्टोबर २०१७

Date : 15 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डॉ. अब्दुल कलाम यांचं 'हे' स्वप्न अधुरंच राहिलं जयंती विशेष :
  • भारताचा ‘मिसालईल मॅन’ अशी ओळख असणारे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं… आणि ते त्यांच्या या स्वप्नाच्या जवळ पोहोचलेही होते.

  • मात्र, इंडियन एअरफोर्समध्ये आठ जागा रिक्त होत्या. मात्र, मुलाखतीत कलाम यांचा नववा क्रमांक होता. त्यामुळे कलाम यांना पायलट होणं शक्य झालं नसून डॉ. कलाम यांनी याबाबत त्यांच्या “My Journey: Transforming Dreams into Actions” या पुस्तकात लिहिलं आहे.

  • मद्रास टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना डॉ. कलाम यांचं भविष्यात पायलट होण्याचं स्वप्न होतं. “माझं स्वप्न होतं की, अवकाशात उंच उडावं आणि तिथून मशिन कंट्रोल करावी.”, असे डॉ. कलाम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.

  • डॉ. कलाम यांनी एअरफोर्समध्ये पायलट होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही केलेले. त्यासाठी त्यांना दोन ठिकाणांहून मुलाखतीची निमंत्रणं आली. पहिलं निमंत्रण होतं देहरादूनच्या इंडियन एअरफोर्सकडून, तर दुसरं निमंत्रण होतं दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या तंत्रज्ञान आणि उत्पादन संचालनालयाकडून..

  • कलाम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, संरक्षण खात्याला मुलाखत देणं शक्य होतं मात्र, संरक्षण मंत्रालय उमेदवारांकडून काही विशेष गुणांची अपेक्षा करत होता, तिथे २५ मुलांची निवड झाली होती या २५ मुलांमध्ये डॉ. कलाम नवव्या स्थानावर होते आणि संरक्षण खात्याकडे केवळ ०८ जागा रिक्त होत्या.

मोहन धारियांविषयी कृतज्ञता - डॉ. मनमोहनसिंग यांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार :
  • जनतेने पंतप्रधानपद दोनदा माझ्या हाती सोपवले, यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो? मी पुरस्कार टाळतो. मात्र सिध्दांतांशी तडजोड न करता वैचारिक मूल्यांशी एकनिष्ठ असलेल्या मोहन धारियांचे मार्गदर्शन मला लाभले.

  • त्यामुळे त्यांच्या नावाशी संलग्न असा वनराई पुरस्कार स्वीकारण्यात वेगळा आनंद आहे, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले.

  • मोहन धारियांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूरच्या वनराई फौंडेशन तर्फे दिला जाणारा राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ. सिंग यांना ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

  • माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, धारिया यांचे सुपुत्र रवींद्र धारिया, वनराई फौंडेशनचे अनंत धारड आदी यावेळी उपस्थित होते.

  • पंतप्रधानपद सोडतांना एक वाक्य त्यांनी सर्वांना ऐकवले, ‘ कोणी करो अथवा ना करो, इतिहास माझ्या कामाचे मूल्यमापन जरूर करील’. विद्यमान काळात साºया देशाला त्यांच्या या वाक्याचे पदोपदी स्मरण होते.

  • कुलदीप नायर म्हणाले, मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपद व विविध भूमिका जबाबदारीने, प्रामाणिकपणे व निष्ठेने बजावल्या.

मोदींची घोषणा देशातील २० विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविणार :
  • जगातील प्रमुख ५०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, देशातील १० खासगी आणि १० सरकारी अशा २० विद्यापीठांना सरकारी बंधनातून स्वतंत्र करून, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्यात येतील.

  • त्यासाठी येत्या पाच वर्षांत १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येत असून पाटणा विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधानांना केले होते.

  • त्याचा उल्लेख करून नरेंद्र मोदी म्हणाले की, विद्यापीठांना केंद्रीय दर्जा देणे ही आता भूतकाळातील गोष्ट झाली, असे मला वाटते. तिथवर न थांबता मी एक पाऊल टाकू इच्छितो. आमच्या देशात शैक्षणिक सुधारणा अतिशय मंदगतीने झाल्या आहेत.

  • आमच्या सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हिंमत दाखविली आहे, देशात प्रथमच ‘आयआयएम’ला सरकारी नियंत्रणातून बाहेर काढून स्वतंत्र केले तसेच भारतीय विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, अशी आपली इच्छा आहे.

२०१९ च्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्त्वात लढणार : शिंदे
  • २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येतील, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी शिंदे बोलत होते.

  • राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतलाअसून यंदाच्या दिवाळीचं हे समस्त काँग्रेसजनांना गिफ्ट असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

  • अगदी दोन-तीन दिवसांपूर्वीच म्हणजे ११ ऑक्टोबरलाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबईतील बैठतीत ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये राहुल गांधींकडे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र काँग्रेसने एकमताने हा ठराव मंजूर केला होता.

  • राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद देऊन देशभरातील काँग्रेस नेत्यांची इच्छा कधी पूर्ण होऊन, राहुल गांधी कधी पक्षाची धुरा खांद्यावर घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार - आशिया कप हॉकीत :
  • कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे संघ आज हॉकीच्या मैदानात भिडणार आहेत.  दोन सहज विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय हॉकी संघाचा सामना आशिया कपमध्ये रविवारी ढाका येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता या सामन्याला सुरूवात होईल.

  • विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणा-या भारतीय संघाने पुल ए मध्ये बांगलादेश आणि जपानवर विजय मिळवला असून सुरुवातीच्या सामन्यात जापानला ५-१ असे पराभूत केल्यानंतर मनप्रीत सिंहच्या नेतृत्वात संघाने बांगलादेशला ७-० असे पराभूत केले असून दुसरीकडे पाकिस्ताननेदेखील बांगलादेशला ७-०ला पराभूत केले.

  • जपानने त्यांना २-२ असे बरोबरीवर रोखले, भारत पुल एमध्ये सहा गुण घेऊन आघाडीवर आहे तर पाकिस्तान चार गुणांसह दुस-या स्थानावर असून भारत दोन विजयांसह सुपर चारमध्ये पोहचला असून संघ गटातील सर्व सामने जिंकून साखळी फेरीत अव्वल स्थानावर राहण्यास उत्सुक आहे.

  • बांगलादेशविरोधात भारताने १३ पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र त्यापैकी दोनवर गोल करण्यात संघाला यश आले. प्रशिक्षक रोलेंट ओल्टेमन्स यांना हटवल्यावर एक महिन्यात पदभार स्वीकारणाºया मारिन यांच्यासाठी आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आव्हान असेल. 

  • पहिल्या दोन सामन्यात भारताने शानदार खेळ केला आणि गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या भारताने काही चांगले मैदानी गोलदेखील केले. मात्र पेनल्टी कॉर्नर ही चिंतेची बाब ठरली आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • शिक्षक दिन - ब्राझिल : 

जन्म /वाढदिवस

  • गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक : १५ ऑक्टोबर १९२३

  • डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम,भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती : १५ ऑक्टोबर १९३१

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान यांचे निधन : १५ ऑक्टोबर १९८१

  • लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन : १५ ऑक्टोबर २००२

  • प्रसिद्ध एेतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन : १५ ऑक्टोबर २००२

ठळक घटना

  • टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली : १५ ऑक्टोबर १९३२

  • भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला : १५ ऑक्टोबर १९९७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.