चालू घडामोडी - १६ एप्रिल २०१७

Date : 16 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांमध्ये विविध करार 
  • प्रधानमंत्री मोदी आणि ऑस्ट्रेलिया प्रधानमंत्री मॉकॉम टूर्नबुल यांची नुकतीच एका बैठकी दरम्यान भेट झाली.

  • या बैठकी दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील ट्रेड व सुरक्षा या मुद्यांवर चर्चा झाली.

  • दोन्ही देशांमध्ये  करार साईन झाले असून त्यामाश्व CECA चा हि समावेश आहे.

पेट्रोल १.३९ तर डिझेल १.०४ रूपयांनी महागले, आजपासून नवे दर लागू
  • पेट्रोल प्रतीलिटर १.३९ रुपये तर डिझेल १.०४ रुपयांनी महाग झाले आहे.

  • यापूर्वी १ एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. पेट्रोल प्रतिलिटर ३.७७ रुपये तर डिझेल प्रतिलिटर २.९१ रुपयांनी स्वस्त झाले होते.

  • कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

  • प्रथम देशातील ५ शहरांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. या पाच शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे.

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
  • दि. 16 - जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इटलीच्या एमा मोरेनो या महिलेचा मृत्यू झाला.

  • त्या 117 वर्षांच्या होत्या. जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. 

  • एमा यांचा जन्म  29 नोव्हेंबर 1899 रोजी इटलीमध्ये झाला होता. 

  • आपल्या 117 वर्षांच्या जीवनात एमा यांनी खराब वैवाहिक जीवनाशिवाय, आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, दोन विश्वयुद्ध आणि इटलीत 90 पेक्षा जास्त वेळेस बदलेलेलं सरकार पाहिलं.  

राजीव चौक मेट्रो स्टेशनवर एलईडी स्क्रीनवर चालवली गेली अश्लील क्लिप, चौकशीचे आदेश
  • दिल्लीच्या सर्वात जास्त गर्दी असणाऱ्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवर एलईडी स्क्रीनवर अश्लील क्लिप चालवली गेल्यामुळे खळबळ उडाली.

  • एलईडी स्क्रीन मेट्रो प्रशासनाद्वारे चालवली जात नाही असे मेट्रोच्या प्रवक्त्यांनी म्हटले.

  • या प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाणार आहे असे ते म्हणाले.

मेरठ-लखनऊ राज्य राणी एक्स्प्रेसचे ८ डबे रूळांवरून घसरले; १५ जण जखमी
  • उत्तर प्रदेशमधील रामपुर येथे शनिवारी सकाळी मेरठ-लखनऊ राज्य रानी एक्स्प्रेसचे डबे रूळांवरून खाली घसरून अपघात झाला.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार तर इतर जखमींना २५ हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दिनविशेष 

 

  • भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावण्यास सुरुवात : १६ एप्रिल १८५३

  • कंडुकुरी वीरेसलिंगम, आंध्र प्रदेशमधील समाजसुधारक जन्मदिवस : १६ एप्रिल १८४८

  • विल्बर राईट, अमेरिकन विमानसंशोधक जन्मदिवस : १६ एप्रिल १८६७

  • चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार जन्मदिवस : १६ एप्रिल १८८९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.