चालू घडामोडी - १६ ऑगस्ट २०१७

Date : 16 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शाहिद अफ्रिदीकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा :
  • पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत, शाहिद अफ्रिदीने ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देत शांततेसाठी आवाहन केलं आहे.  

  • आपण आपला शेजारी बदलू शकत नाही असं सांगत शांतता, सहिष्णुता आणि दोन्ही देशांमधील प्रेम वाढावं यासाठी शाहिद अफ्रिदीने आवाहन केलं असून आज देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.

  • पाकिस्ताननेही १४ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा केला, शाहिद अफ्रिदीने ट्विट करताना लिहिलं आहे की, 'भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपण कोणत्याही परिस्थितीत आपला शेजारी बदलू शकत नाही.

  • शांतता, सहिष्णुता आणि दोन्ही देशांमधील प्रेमा वाढावं यासाठी एकत्र काम करुया, माणुसकीचा विजय होऊ दे'. 

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईत दंगल : केक ची किंमत
  • भारताच्या ७१ स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईतल्या ब्रॉडवे बेकरीने खास केक तयार केला असून ४ फूट लांब असलेला हा केक तब्बल ५४ किलो वजनाचा असून या केकची थीम बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या दंगल चित्रपटावर आधारित आहे.

  • या केकची किंमत तब्बल ४० हजार डॉलर्स म्हणजेच २५ लाख रुपयांच्या आसपास आहे, या केकमध्ये महावीर फोगट यांची भूमिका साकारलेला आमीर खान तसंच गीता आणि बबिता फोगट दाखवण्यात आल्या आहेत.

  • गीता फोगटनं २०१० सालच्या कॉमनवेल्थ खेळात मिळवलेल्या गोल्ड मेडलचीही प्रतिकृती या केकमध्ये लावण्यात आली आहे, या मेडलसाठी ७५ ग्रॅम सोन्याचं खाद्यदेल वापरण्यात आलंय.

  • हा केक बनवण्यासाठी बेकरीला साडेतीन आठवडे लागले आहेत, हा केक जगातील सर्वात महाग केक असल्याचा दावा ब्रॉडवे बेकरीने केला असून हा केक तब्बल २५० लोक खाऊ शकतील. 

  • ब्रॉडवे बेकरीच्या एका खास ग्राहकाच्या इच्छेखातर हा केक बनवण्यात आहे. केक बनवण्यासाठी शुगर फाँडन्ट, चॉकलेट स्पंज, चॉकलेट गनाश, बेल्जियम डार्क चॉकलेट आणि ७५ ग्रॅम एडिबल गोल्ड पावडर वापरण्यात आले असून केक बनवायला तीन आठवड्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली आहे.

केंद्र सरकारचा आदेश ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या सर्व लिंक काढा :
  • जगभरात धुमाकूळ घालणार्‍या जीवघेण्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले आहेत.

  • इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून या गेमची किंवा त्यासंबंधित असलेली लिंक तातडीने हटवावी, असे पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि याहू यासारख्या वेबसाइट्सना पाठविले आहे.

  • ब्ल्यू व्हेल चॅलेंजमुळे भारतात अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई आणि पश्चिम बंगालमध्येही अशा घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या, त्यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती.

  • २०१३ साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन व त्याच्या साथीदारांनी ब्ल्यू व्हेल चॅलेंज डेव्हलप केले असून ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आहे, ऑर्डर देणारी व्यक्ती अज्ञात असते.

  • एकदा या खेळात लॉग इन केले की तो वेगवेगळे चॅलेंज देतो, साधारणत ५० टप्पे ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेने होते, शेवटी खेळणार्‍याला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.

'सी प्लेन'ची चाचणी भारतात होणार :
  • कंपनीने परवानगीसाठी भारतीय नागरी उड्डयन मंत्रालयाशी संपर्क साधला. या चाचणीत सुरक्षेची चाचपणीही करण्यात येईल, जपानी कंपनीने सी प्लेन तयार केले असून, चाचणीसाठी भारताची निवड केली आहे.

  • पूर्व किनारा किंवा इतर किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली.

  • एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओमध्ये पहिल्यांदाच स्पाईट जेट या खासगी कंपनीच्या विमान दुरुस्ती सेवेच्या लोकार्पणासाठी ते शहरात आले होते.

  • देशातील हवाई वाहतुकीतील ही सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीला तोटातून बाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

  • कंपनीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित केली.

प्रायश्चित्त करावं योगी सरकारने : आरएसएस नेत्याचे खडे बोल
  • अवध क्षेत्राचे आरएसएसचे प्रांत संघचालक प्रभु नारायण यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून योगी सरकारवर टीका केली आहे, या प्रकरणाच्या कायदेशीर कारवाईत कोणीही दोषी ठरलं तरी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी राज्य सरकारचीच आहे.

  • उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले आहेत.

  • प्रभु नारायण यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं,  'या प्रकरणाच्या कायदेशीर कारवाईत कोणीही दोषी ठरलं तरी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी राज्य सरकारचीच आहे.

  • राज्य सरकारच्या सर्व मंत्री आणि उत्तर प्रदेश भाजपच्या सदस्यांनी याचं प्रायश्चित्त करायला हवं, ' राज्य सरकारने एक 'प्रायश्चित्त दिवस' आयोजित करावा, असा सल्ला प्रभु यांनी त्यांच्या फेसबुक  पोस्टमधून योगी सरकारला दिला आहे.

RSS कडून चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन :
  • भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्याचे चीनचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले आहे.

  • चीनबरोबर सीमावादावरून तणाव असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

  • चिनी बनावटीच्या मालाला तोंड देण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा आग्रह महत्त्वाचा असे भैय्याजी जोशी यांनी सांगितले स्वयंपूर्णतेकडे देशाची वाटताल सुरू असून, युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

  • सीमेवर चीनची घुसखोरी रोखण्यासाठी आपले जवान समर्थ आहेत. मात्र आर्थिक गुलामगिरी रोखण्यासाठी भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तूंचा शिरकाव रोखा असे आवाहन भैय्याजींनी केले.

  • तसेच त्यांच्या उपस्थितीत येथील महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, आधुनिकीकरणाला आमचा विरोध नाही. मात्र एखाद्या देशाची आर्थिक गुलामगिरी आपण धुडकावून लावली पाहिजे.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू : १६ ऑगस्ट १९५७

  • १९१३मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान : १६ ऑगस्ट 

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी : १६ ऑगस्ट १८८६

  • एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता : १६ ऑगस्ट १९७७

ठळक घटना

  • अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू : १६ ऑगस्ट १८९६

  • जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला : १६ ऑगस्ट १९६०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.