चालू घडामोडी - १६ मार्च २०१८

Date : 16 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवी योजना :
  • नवी दिल्ली : शालेय शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने अध्ययन फलनिष्पत्ती (लर्निंग आऊटकम) योजना तयार केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच विषयासंदर्भातील आकलन क्षमता विकसित करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे.

  • शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर केंद्र सरकारने राष्टÑीय फलनिष्पत्ती सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आले आहेत. त्यानुसार तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थ्यांना धड वाचता येत नव्हते. तसेच ४७ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारही करता आला नाही.

  • केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मागच्या सरकारच्या ‘पुढच्या वर्गात बढती’ धोरणामुळे शालेय शिक्षणाचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळायचा; परंतु विषयच त्यांना समजत नसे. त्यामुळे सरकारने मागच्या वर्षी सर्व राज्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार २३ राज्यांनी ढकलपास योजना रद्द करण्याचे मान्य केले. त्यानंतर सरकारने या कायद्यात दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गात ठेवण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले.

  • विद्यार्थ्यांना जे काही शिकविले जाते, त्याचे त्यांना आकलन झाले पाहिजे, यादृष्टीने शिकविण्याच्या पद्धतीचे प्रारूप कसे असावे. या सर्व पैलूंवर राष्टÑीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तीन वर्षे संशोधन करून लर्निंग आऊटकम योजनेचे प्रारूप निश्चित केले.

  • एनसीईआरटीच्या क्रमिक अभ्यासक्रमानुसार शाळेत शिकविले जाते होते; परंतु अभ्यास कसा करावे, हे सांगितले जात नव्हते. लर्निंग आऊटकममध्ये शिक्षकांसाठी काही सोप्या पद्धती सुचविण्यात आल्या आहेत.

गाझामध्ये स्फोट, पॅलेस्टाईनचे पंतप्रधान थोडक्यात बचावले!
  • गाझा : पॅलेस्टाईनचे पंतप्रधान रामी हमदल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हमदल्ला मंगळवारी गाझा पट्टीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर निशाणा साधत हल्ला केला गेला. सुदैवाने यातून हमदल्ला बचावले.

  • या स्फोटात सात जण जखमी झाले असल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या गृहमंत्रालयाने दिली.

  • वेस्ट वॉटर प्युरिफिकेशन प्लांटच्या उद्घटनासाठी हमदल्ला गाझा पट्टीत गेले होते. तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांची बैठक होती.

  • पॅलेस्टाईन न्यूज एजन्सी वाफाच्या माहितीनुसार, हमदल्ला आणि पॅलेस्टाईन गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख मजीद फराज हे दोघेही हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

  • दरम्यान, आतापर्यंत कुठल्याच दहशतवादी संघटनेने स्वत:हून या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र पॅलेस्टाईन नॅशनल ऑथोरिटीने 'हमास'ला या स्फोटासाठी जबाबदार धरले आहे.

मोदी सरकारविरोधात आज YSR अविश्वास प्रस्ताव आणणार :
  • नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारविरोधात आज लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करणाऱ्या वायएसआर काँग्रेस पक्षाकडून एनडीए सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे.

  • यापूर्वी याच मागणीसाठी आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आंध्र प्रेशातील प्रमुख दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

  • दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी अविश्वास ठरावाबाबत पत्र लिहून अनेक विरोधी पक्षांकडे पाठींब्याची मागणी केली आहे. तर वायएसआरचे खासदार वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी लोकसभा सचिवांना नोटीस देऊन, आजच्या कार्यसूचीत अविश्वास प्रस्ताव सामील करण्याची मागणी केली.

  • दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील गरज पडल्यास या अविश्वास ठरावाला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे.

जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहक म्हणून तुमचे अधिकार कोणते :
  • नवी दिल्ली : ग्राहक या नात्याने तुम्हाला अनेक अधिकार दिलेले आहेत आणि या अधिकारांची माहिती घेऊन तुम्ही जागरुक ग्राहक बनू शकता. शिवाय या अधिकारांची माहिती असल्यामुळे तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता.

  • सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. तुमची फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार कुठे करावी, याची माहिती तुम्हाला जाहिरातीमधून मिळते. कुणाकडून तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही संबंधित विक्रेत्याला धडा शिकवू शकता आणि तुमची नुकसान भरपाईही मिळवू शकता.

  • आज (15 मार्च) जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. यानिमित्ताने ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jagograhakjago.gov.in ही खास नवी वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. ग्राहकांचे अधिकार, तक्रार आणि इतर सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल.

  • या वेबसाईटवर कोणत्याही कंपनीची तक्रार करणं सोपं होणार आहे. तरी टोल फ्री क्रमांक, मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करता येऊ शकते. आपल्या तक्रारीची स्थितीही ग्राहक वेबसाईटद्वारे ट्रॅक करु शकतात. लवकरच प्रादेशिक भाषांमध्ये हेल्पलाईन सुरु केली जाणार असल्याचीही माहिती आहे.

भारताचा आणखी एक शेजारी खेळणार वन-डे, आयसीसीने दिली मान्यता :
  • नवी दिल्ली - भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळला काल गुरुवारी आयसीसीने एकदिवसीय क्रिकेट सामने खेळण्याचा दर्जा दिला आहे. विश्वचषक पात्रता फेरीमध्ये काल झालेल्या सामन्यात नेपाळने पपुआ न्यू गिनीसंघावर सहा विकेट राखून शानदार विजय मिळवला. या पराभवामुळे मात्र पपुओ न्यू गिनी संघाने आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा गमावला आहे. 

  • काल झालेल्या सामन्यात अष्टपैलू दीपेंद्र सिंग ऐरीने विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने पापुओ गिनी संघाच्या चार फलंदाजाला बाद केले. तर फलंदाजी करताना त्याने 58 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारासह नाबाद 50 धावा काढल्या. दीपेंद्र सिंगशिवाय संदीप लॅमिचानेही पापुआ संघाला चार धक्के दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पपुआ न्यू गिनी संघाचा डाव 24.2 षटकांत 114 धावांत संपुष्टात आला. आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या नेपाळने चार फलंदाजांच्या मोबदल्यात 23 षटकांत विजयी लक्ष्य पार केले. 

  • पात्रता फेरीतील काल झालेल्या अन्य एका सामन्यातही मोठा उलटफेर पहायला मिळाला. बलाढ्या वेस्ट इंडिजचा आफगाणिस्तानने पराभव केला. दिवसेंदिवस क्रिकेटमध्ये आपलं नाव प्रस्थापित करु पाहणाऱ्या आफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला पराभवचा धक्का दिला आहे. मुजिबूर रेहमानचा फिरकी मारा आणि रेहमत शाहच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर अफगाणिस्ताने बलाढय़ वेस्ट इंडिजवर तीन विकेट राखून विजय मिळवला.

  • वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 197 धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानने 47.3 षटकांत सात फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पेलले. शाहने 109 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 68 धावा करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. 

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिकांचे अच्छे दिन!, बांगलादेश, भूतान हे देशही अधिक आनंदी :
  • नवी दिल्ली : दहशतवादी संघटनांचे माहेरघर, सातत्याने होणारे हल्ले यांमुळे पाकिस्तान बदनाम असला तरी तेथील नागरिक भारतीयांपेक्षा अधिक सुखी आणि आनंदी असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातून समोर आले आहे. सर्वात आनंदी देश फिनलँड ठरला आहे. भारतापेक्षा बहुतांश शेजारी देशही अधिक आनंदी व खूश असल्याचे अहवालात म्हटले आहे.

  • दरवर्षी ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’ प्रसिद्ध करण्यात येतो. सामाजिक सद्भाव, भ्रष्टाचार व लोकांच्या अपेक्षा अशा मुद्द्यांचा विचार करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. १५६ आनंदी देशांच्या यादीत भारत १३३ व्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान या यादीत ७५ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे बांगलादेश, भूतानसारखी शेजारी राष्ट्रेही भारतापेक्षा अधिक आनंदी असल्याचे यात म्हटले आहे. क्रमवारीत नेपाळ, चीन आणि श्रीलंकादेखील भारताच्या पुढे आहेत.

  • १० स्वस्त शहरांत भारतातील तीन जगातील १० स्वस्त शहरांमध्ये भारतातील बंगळुरू, चेन्नई व दिल्ली या शहरांचा समावेश आहे. एका सर्व्हेमध्ये हे आढळून आले आहे. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने केलेल्या सर्वेक्षणात सिंगापूर हे सर्वात महागडे शहर असल्याचे दिसून आले आहे. बंगळुरू पाचव्या तर चेन्नई आठव्या स्थानावर असून, दिल्ली शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे.

  • जगातील सर्वात स्वस्त शहर आहे सिरियाची राजधानी असलेले दमास्कस. बंगळुरू पाचव्या तर चेन्नई आठव्या स्थानावर असून, दिल्ली शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. दुसऱ्या व तिसºया स्थानावर व्हेनेझुएलाची राजधानी काराकस व कझाकिस्तानची राजधानी अलमाटी यांचा क्रमांक लागतो. लागोस शहर चौथ्या व पाकिस्तानमधील कराची सहाव्या क्रमांकावर आहे. अल्जिअर्स व बुखारेस्ट ही शहरे सातव्या व नवव्या क्रमांकावर आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

  • १९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.

  • १९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.

  • १९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.

  • १९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

  • १९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

  • १९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

  • १९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

  • २०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

  • २०१३: त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

जन्म

  • १८७४: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)

  • १८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५)

  • १८७९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९६५)

  • १८८१: गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९५३)

  • १८९८: पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

  • १९०७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)

  • १९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)

  • १९७३: गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.

  • १९८५: झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.

मृत्यू

  • १८२७: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

  • १८८५: वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८२५)

  • १९३२: कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी१८४३)

  • १९९६: चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन.

  • १९९६: हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)

  • १९९७: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर१९१०)

  • १९९९: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९४२)

  • २००३: गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.

  • २००८: दलित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९३०)

  • २०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे१९४०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.