चालू घडामोडी - १६ मे २०१७

Date : 16 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिका-रशिया संबंध अनेक वर्षांत खूपच खालावले - टिलरसन :
  • अमेरिका-रशिया यांच्यातील संबंध सध्या खालावले असून ते सुधारण्यासाठी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूप प्रयत्न करावे लागतील, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी सांगितले.

  • रशियाबरोबर संबंधांची फेरबांधणी करावी लागणार असल्याचे ट्रम्प यांनी सूचित केले असून रशियाबरोबरचे संबंध हे अतिशय नीचांकी असून शीतयुद्धानंतर ते इतके खालच्या पातळीवर कधीच गेले नव्हते, असे टिलरसन यांनी ‘एनबीसी न्यूज’च्या ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात सांगितले. जगाला अमेरिकी जनतेत स्वारस्य आहे.

  • दोन अण्वस्त्रधारी देशातील संबंध सुधारणे गरजेचे आहे. त्यामुळे अध्यक्ष ट्रम्प यांनी मला रशियाशी संबंध सुधारण्यावर काम करण्यास सांगितले आहे, युरोपच्या नेत्यांशीही त्याबाबत चर्चा करण्याची सूचना त्यांनी केली आहे.  

  • अमेरिकी लोकांच्या हितासाठी ते सुधारण्याची गरज आहे असे सांगून ते म्हणाले, की हे संबंध सुधारण्यासाठी खूप काळ लागेल, परिश्रमही लागतील. रशियाने अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की ते खरे आहे पण रशियाशी संबंध बिघडलेले असणे अमेरिकेच्या हिताचे नाही. 

मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ अपात्र, हायकोर्टात याचिका :
  • योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांना अपात्र ठरवण्यात यावं. कारण दोघेही सध्या खासदार आहेत, असं याचिकेत म्हटलं आहे.

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे पदासाठी अपात्र आहेत, अशी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल झाली आहे. 

  • न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती वीरेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. संजय शर्मा या व्यक्तीने ही जनहित याचिका दाखल केली आहे.

  • खासदार हा कोणत्याही राज्याचा मंत्री होऊ शकत नाही. संविधानातील १०(२) या कलमाचं हे उल्लंघन आहे.  

लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल स्थानावर :
  • अमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीने स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे.

  • जगभरात प्रत्येक देशाचा शस्त्रास्त्रांच्या भंडारातून स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही सर्व देशांमध्ये अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचे समोर आले आहे.

  • अमेरिका स्वतःच्या संरक्षणासाठी जवळपास ६०० बिलियन डॉलर एवढा खर्च करतो. तर रशिया एका वर्षात जवळपास ५४ बिलियन डॉलर खर्च करतो, चीन १६१ बिलियन डॉलर खर्च करतो.

  • तसेच या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण ५१ मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो.

गोवा टुरिझमची 'हॉप ऑन हॉप ऑफ' बससेवा :
  • गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या बसमधून प्रवास करत गोव्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देता येईल.

  • गोव्यातील पर्यटनाला चांगला वाव मिळावा म्हणून गोवा पर्यटन विभागातर्फे नवीन बससेवेची सुरुवात करण्यात आली.

  • 'हॉप ऑन हॉप ऑफ' (एचओएचओ - होहो) नावाने सुरू झालेल्या या लाल रंगाच्या शाही बसमध्ये बसवून पर्यटकांना गोव्याची सफर घडविण्यात येईल. 'ओपन टॉप डबल डेकर' आणि 'हायडेक' स्वरुपातील या बस आहेत.

  • बहुप्रतिक्षित अशा 'हॉप ऑन हॉप ऑफ' बससेवेचा गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगांवकरांच्या हस्ते पंजिम येथील पर्यटन भवनात शुभारंभ करण्यात आला.

ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर कालवश :
  • १९९२ च्या २४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेवेळी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक, गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार, भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांशिवाय अनेक अन्य संस्थांनी त्यांना सन्मान आणि पुरस्कार दिले.

  • जेष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे १५ मे रोजी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  

  • गेली सत्तर वर्षांहून अधिक वर्षे नाट्यव्यवसायात रंगभूषेची धुरा समर्थपणे सांभाळणारे रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे मूत्रपिंडाच्या विकाराने मुंबईत निधन झाले.  

  • वयाच्या अकराव्या वर्षांपासून 'रंगभूषाकार' म्हणून बोरकर यांचा प्रवास सुरू झाला. वयोपरत्वे रंगभूषेच्या कामातून निवृत्ती पत्करल्यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या 'अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स'च्या अभ्यासक्रमात 'रंगभूषा' हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवण्याचे काम ते करत.

  • बोरकर कुटुंबीय खरे तर गोव्यातील बोरी गावचे. पण पोर्तुगीजांच्या काळात काही मंडळींनी तिथून स्थलांतर केले आणि बोरकर रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिंचखरी गावी आले.

भारतीय महीला क्रिकेट टीमची विश्वविक्रमाला गवसणी :
  • दीप्तीने केलेल्या १८८ धावा हा भारतीय महीला क्रिकेटमधला नवा विक्रम ठरला. शिवाय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या ठरली आहे.

  • आंतरराष्ट्रीय महीला एकदिवसीय क्रिकेटमधील ही कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.  

  • भारतीय महीला क्रिकेट टीमने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ती शर्मा आणि पूनम राउत या दोघींनी इतिहास रचला आहे. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल ३२० धावांची भागीदारी केली.

  • दीप्ती शर्माने १८८ धावांची खेळी केली मात्र, महीला क्रिकेटमध्ये व्दिशतक झळकविणारी दुसरी महिला खेळाडू होण्याची तिची संधी हुकली.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • --

जन्म, वाढदिवस

  • महान गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म : १६ मे १८२४

  • महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म : १६ मे १९४४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • पुरंदर किल्ला लडविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण : १६ मे १६६५

  • जुन्या काळातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक फ़णी मुजुमदार यांचे निधन : १६ मे १९९४

ठळक घटना

  • --

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.