चालू घडामोडी - १६ सप्टेंबर २०१७

Date : 16 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दोन हत्या प्रकरणी राम रहीमविरोधात आज कोर्टात सुनावणी : पंचकुला
  • राम रहीमवर सिरसा येथील पत्रकार राम चंद्र छत्रपती आणि डे-याचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येचा आरोप आहे.

  • साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम विरोधात शनिवारी आणखी दोन हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

  • विशेष सीबीआय न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार असून याच कोर्टाने २५ ऑगस्टला राम रहीमला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले होते. 

  • हरयाणामधील पंचकुला येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून चकुला येथील सेक्टर एकमधील न्यायालयाच्या आवारात आणि आजूबाजूच्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निमलष्करी दल आणि पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती, हरयाणाचे पोलीस महासंचालक बीएस संधू यांनी दिली आहे.

  • गुरुमीत राम रहीम याच्यावरील बलात्कार प्रकारणाची सुनावणी करतेवेळी पंचकुला परिसरात त्याच्या एक लाखहून अधिक समर्थकांनी धुडगूस घातला होता.

२० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर नासाचं 'कॅसिनी' यान शनी ग्रहाजवळ नष्ट :
  • ‘कॅसिनी’ या यानाने जवळपास २० वर्ष शनी ग्रहाची परिक्रमा करुन, ग्रहावरील हलचालींचे फोटो नासाला पाठवले होते. १९९७ मध्ये हे यान अंतराळात पाठवण्यात आलं होतं.

  • २००४ मध्ये या यानाने शनीच्या वलंयाकृती कक्षेत प्रवेश केला, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) चं ‘कॅसिनी’ हे अंतराळ संशोधन यान शुक्रवारी शनी ग्रहाजवळ नष्ट झालं आहे.

  • यानंतर या यानाने आपल्या मोहीमेदरम्यान शनी ग्रहाचे ४ लाखपेक्षा जास्त फोटो काढले होते. तर या यानाने एकूण ४.९ अब्ज मैलाचा प्रवास पूर्ण करुन, अंतराळ मोहिमेतील सर्वात मोठी मोहीम फत्ते केली होती.

  • भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ५.२५ वाजता हे यान शनी ग्रहाजवळ नष्ट झालं.

कर विभागाची तयारी जीएसटीसाठी घालणार छापे :
  • अधिकाधिक कंपन्यांना वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासाठी, कर विभागाच्या वतीने लवकरच देशभरात छापेमारी करण्यात येणार आहे.

  • अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील आठवड्यात हे छापे मारले जाऊ शकतील, जीएसटीच्या कक्षेत येण्यासाठी कंपन्यांना खरोखरच काही अडचणी येत आहेत की, काही कंपन्या जीएसटीच्या कक्षेत येण्यास टाळाटाळ करीत आहेत, याचा शोध घेण्यासाठी हे छापे मारले जाणार आहेत.

  • जीएसटी प्रमाणपत्रांची तपासणीही या मोहिमेत केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आठवडाभरापूर्वीच वरिष्ठ कर अधिका-यांसोबत एक बैठक घेतली.

  • कराधार वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. जीएसटीअंतर्गत नव्या नोंदणींत वाढ व्हायला हवी, अशा सूचना आम्हाला अलीकडेच मिळाल्या आहेत.

  • त्या अनुषंगाने पात्र व्यवसाय अजूनही जीएसटी नोंदणीच्या बाहेर नाहीत ना, याची खातरजमा करण्यासाठी, आम्ही देशभर छापेमारी करणार आहोत, असे एका अधिकाऱ्याने सांगतिले.

  • उद्योग क्षेत्रातील अंतस्थ सूत्रांनी सांगितले की, काही कंपन्या आणि व्यावसायिक विशेषत: असंघटित क्षेत्रातील कंपन्या जीएसटी नोंदणी करण्याचे टाळत असून कर अधिकारी भूतकाळातील न भरलेल्या करासाठी आपल्या मागे लागतील, अशी भीती त्यांना वाटत आहे.

  • ८ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, आयएएस, आयआरएस आणि आयएफएस या सेवांच्या २०० वरिष्ठ अधिकाºयांना देशभरातील शहरांत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि किमती यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

देशातील ‘व्हीआयपी संस्कृती’त वाढ ४७५ हून अधिक जणांना विशेष सुरक्षा :
  • केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व्हीआयपी लोकांना विशेष सुरक्षा देण्याबाबत यूपीए सरकारपेक्षाही पुढे गेले असून यापूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारने ३५० लोकांना विशेष सुरक्षा (झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणी) दिली होती.

  • भाजप सरकारने अनेक साधुसंतांनाही विशेष सुरक्षा पुरवली आहे. यामध्ये योगगुरू रामदेव बाबा, माता अमृतानंदमयी, रामजन्म भूमी श्राइन बोर्डचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, वादग्रस्त खासदार साक्षी महाराजांचा समावेश असून या संख्येत आता वाढ होऊन हा आकडा ४७५ च्या पुढे गेला आहे,

  • त्याचबरोबर गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह जे पहिल्यांदाच आमदार झाले असून त्यांनाही विशेष सुरक्षा देण्यात आली असून ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे १५ राजकारण्यांच्या मुलांसाठी सरकारने एनएसजी सुरक्षा तैनात केली आहे.

  • विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: देशातील व्हीआयपी संस्कृती संपवण्याबाबत भाष्य केले होते. त्यांनी सरकारी गाड्यांवरील लाल, निळे, पिवळे दिवे काढून टाकण्यासाठी कायदा केला होता.

  • मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात याचा उल्लेखही केला होता. परंतु, सरकारच अशा संस्कृतीला प्रोत्साहन देत असल्याचे गृहमंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

११ वर्षीय चिमुकल्याकडे व्हाईट हाऊसबाहेरील गवत कापण्याचं काम :
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये अवघ्या ११ वर्षांचा चिमुकल्याला काम देण्यात आलं असून फ्रॅन्क असं या चिमुकल्याचं नाव असे आहे, त्याला व्हाईट हाऊसबाहेरील गवत कापण्याचं काम देण्यात आलं आहे.

  • डोनाल्ड ट्रम्प यांची व्यावसायिक पार्श्वभूमी पाहून फ्रॅन्क अगदी भारावून गेला होता. ट्रम्प यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनं स्वत: चा व्यवसायच सुरू केला.

  • फ्रॅन्क नक्कीचं चांगलं काम करेल, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून तसेच त्याच्या सोबतचा एक व्हिडीओ देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

  • व्हाईट हाऊसमध्ये मला संधी मिळाल्यास मी स्वत: ला भाग्यवान समजेन, असं पत्रच फ्रॅन्कने डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलं होतं, फ्रॅन्क हा व्हाईट हाऊस जवळच्या फॉल्स चर्च परिसरातला रहिवासी आहे.

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने अपेक्षित कामगिरी करताना उपांत्यफेरीत धडक :
  • भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने अपेक्षित कामगिरी करताना कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यफेरीत धडक मारली असून काल झालेल्या उपांत्यापूर्वफेरीच्या सामन्यात ऑलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूने जपानच्या मितासू मितानीचा २१-१९, १८-२१, २१-१० असा पराभव केला.  

  • मितासू २०१४ च्या विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती असून, २०१२ च्या फ्रेंच ओपन फायनलमध्ये तिने सायना नेहवालचा पराभव करीत विजेतेपद पटकविले होते.

  • पहिला सेट ८-६ असा केला. सामन्यात मिड इंटरव्हलसाठी थांबला तेव्हा मितानी ११-९ अशी आघाडीवर होती, सिंधूने त्यानंतर हा सेट १३-१३ असा बरोबरीत आणला असून दोन्ही खेळाडू १९-१९ अश्या बरोबरीत आल्यावर सिंधूने आपला खेळ उंचावत पहिला सेट २१-१९ असा जिंकला.

  • दुसऱ्या सेटमध्ये मितानी हिने उत्तम प्रदर्शन करताना ५-१ अशी आघाडी सिंधूने सलग गुण मिळवत तिची आघाडी ५-४ अशी केली असून दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू ८-८ अश्या बरोबरीत होत्या, त्यानंतर मितानीने सेटवर वर्चस्व गाजवत दुसरा सेट २१-१६ असा जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. 

  • तिसऱ्या आणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सिंधूनं आपला खेळ पहिल्यापासूनच उंचावला असून या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने ६-२ अशी आघाडी मिळवली.

  • मितानी केलेल्या चुकामुळे सिंधूने निर्णायक सेटमध्ये ९-३ अशी मोठी आघाडी मिळवली, त्यानंतर सिंधूने या सेटमध्ये वर्चस्व स्थापन करताना १५-९ अशी आघाडी मिळवली शेवटचा सेट सिंधूने २१-१० असा जिंकत सामना आपल्या नावे केला. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • ओझोन : संरक्षण दिन

जन्म /वाढदिवस

  • एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका : १६ सप्टेंबर १९१६

  • ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार : १६ सप्टेंबर १९४२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदि

  • हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार : १६ सप्टेंबर १९८९

  • जयवंत दळवी, मराठी साहित्यिक : १६ सप्टेंबर १९९४

ठळक घटना

  • मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले : १६ सप्टेंबर १९६३

  • झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक : १६ सप्टेंबर १९६३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.