चालू घडामोडी - १६ सप्टेंबर २०१८

Date : 16 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘केएलएस’चे शैक्षणिक कार्य गौरवास्पद- राष्ट्रपती रामनाथ कोविंद :
  • बेळगाव : केएलएस (कर्नाटक लॉ सोसायटी) या संस्थेने केलेले शैक्षणिक कार्य गौरवास्पद आहे, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. बेळगाव येथे केएलएस संस्थेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा, मुख्य अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल, खासदार सुरेश अंगडी उपस्थित होते.

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, कर्नाटक लॉ सोसायटीने उच्च शिक्षणाचे महत्त्व ७५ वर्षांपूर्वी ओळखले. कायद्याचे शिक्षण सुरू केले. उच्च शिक्षण महत्त्वाचे आहे. निसर्गाचा कायदा शिस्त शिकवतो. मानव हक्क कायदा हा नागरिकतेची गरज आहे. कायदा गरजेचा आहे तो देश घडविण्यासाठी.

  • आज ही संस्था ४० शिक्षण संस्था चालवते. १४००० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. माजी विद्यार्थीवर्गाची मोठी संघटना आहे. या संस्थेने देशाला कायदेपंडित दिले. दोन माजी चीफ जस्टीस दिले. सध्याचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल हे याच संस्थेचे आहेत याचा अभिमान वाटतो असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.

  • मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले, बेळगावात लवकरच शासकीय कार्यालये स्थलांतरीत करू. आपण मुख्यमंत्री असतानाच बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायला सुरुवात केली.

इस्त्रोचं आज व्यावसायिक उड्डाण, दोन ब्रिटीश उपग्रह प्रक्षेपित करणार :
  • नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आज व्यावसायिक सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही-सी42 श्रीहरिकोटा येथून अंतराळात झेपावणार आहे. आजचं सॅटेलाईट प्रक्षेपण हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचं इस्त्रोच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

  • नोव्हा एसएआर आणि इंग्लंडच्या सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या एस वन-फोर या पृथ्वीचे निरिक्षण करणाऱ्या उपग्रहांना वाहून नेणारे इस्त्रोचे पीएसएलव्ही-सी42 हे यान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर उड्डाणासाठी तयार होत आहे. रविवारी (16 सप्टेंबर) रात्री 10 वाजून सात मिनिटांनी यांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांचं वजन 800 किलोग्राम आहे. 

  • इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी याआधी इस्रो सात महिन्यात 19 अभियानं राबवणार असल्याची माहिती दिली होती. त्यामध्ये 10 सॅटेलाइटच्या प्रक्षेपणासह 9 यान प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. सप्टेंबर ते मार्च या महिन्यात या मोहिमा राबवण्यात येणार आहेत.  

  • पीएसएलव्ही-सी42 च्या प्रक्षेपणाने 16 सप्टेंबरपासून या मोहिमेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बाहुबली नावाने जीएसएलव्ही एमके 3- डी 2 या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच पीएसएलव्ही सी 43 याचेही प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये होणार आहे. जी सॅट 7 ओ आणि जी सॅट 11 या उपग्रहांचे नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तर डिसेंबरमध्ये पीएसएलव्ही सी 44 आणि जीसॅट 31 अंतराळात सोडण्यात येणार आहेत. 2019 या नवीन वर्षात इस्रोची बहुप्रतीक्षीत चांद्रयान 2 मोहीम 3 ते 16 जानेवारीदरम्यान सुरू होणार आहे.

इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा :
  • मुंबई : राज्यात इंजिनिअरिंगच्या ४३ टक्के जागा रिक्त राहिल्या असून आॅल इंडिया सर्व्हे आॅफ हायर एज्युकेशनच्या सर्वेक्षणानुसार, इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी ही विद्यार्थ्यांची पसंती असलेली देशातील तिसºया क्रमांकाची शाखा असल्याचे समोर आले आहे.

  • बी.ए. आणि बी.एससीनंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१७-१८ च्या अहवालानुसार देशात बॅचलर आॅफ इंजिनिअरिंगसाठी १८.२ लाख, तर बॅचलर आॅफ टेक्नोलॉजीसाठी २१.१९ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. इंजिनीअरिंग आणि टेक्नोलॉजीच्या आणखी १९ उपशाखा आहेत. त्यातही मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या पाच सगळ्यात जास्त मागणी असणाºया उपशाखा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

  • देशात १.९२ लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, तर ३८,७१४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. साठी प्रवेश घेतला आहे. पीएच.डी.साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सर्वात जास्त ५,३४९ विद्यार्थी आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचा क्रमांक लागतो. त्यासाठी ५,२३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ३५,९६७ इतकी आहे.

जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या अभिमन्यू पुराणिकला रौप्य :
  • पुणे : पुण्यातील सर्वांत तरूण ग्रॅण्डमास्टर अभिमन्यू पुराणिक याने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळविताना जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी रौप्यपदकाची कमाई केली.

  • टर्की येथे ही स्पर्धा झाली. ११ फेरींच्या या स्पर्धेत इराणचा ग्रॅण्डमास्टर पारहम मॅगसॉद्लो याने ९.५ गुणांसह सुपर्णपदक पटकावले. अभिमन्यूला ८.५ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिमन्यूने अखेरच्या फेरीत ग्रॅण्डमास्टर अराम हाकोबयान याच्यावर मात केली. रशियाचा इंटरनॅशनल मास्टर सर्गेई लोबानोव कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

  • स्पर्धेच्या प्रारंभी काहीसा चाचपडत खेळ करणाऱ्या अभिमन्यूला पहिल्या ५ फेरींमध्ये ३.५ गुणांचीच कमाई करता आली. नंतर मात्र त्याने आपला खेळ कमालीचा उंचावला. अखेरच्या ६ फेरींमध्ये त्याने जोरदार मुसंडी मारताना ५ गुण मिळविले. या स्पर्धेत त्याने ७ विजय, ३ बरोबरी आणि १ पराभव अशी कामगिरी केली. या स्पर्धेत अभिमन्यूला २३वे मानांकन देण्यात आले होते.

  • १८ वर्षीय अभिमन्यू सिम्बायोसिस महाविद्यालयात बी. कॉमच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. ‘फिडे’चे मान्यताप्राप्त प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली तो २००७ पासून सराव करीत आहे.

मोदी म्हणाले, चार वर्षात केली ६० वर्षांची सफाई... :
  • नवी दिल्ली : गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करून दाखवले. चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 'स्वच्छता हीच सेवा' या अभियानात संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसह बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योगपती रतन टाटा आणि अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

  • चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. देशात 40 टक्के स्वच्छता होती. ती आता 90 टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करुन दाखविले आहे. आतापर्यंत 450 जिल्ह्यांसह 20 केंद्र शासित प्रदेश हागणदरीमुक्त झाले आहेत. फक्त शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  

  • याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानातील सहकार्याबद्दल अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांचे आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली, त्यासाठी त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. फक्त स्वच्छतेच्याच नाही तर सामाजिक अभियानांमध्ये अमिताभ बच्चन यांचे मोठे योगदान आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, टाटा ट्रस्टचे स्वच्छता अभियानासाठी 100 कोटी रुपयांचे योगदान असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले. 

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय ओझोन दिन.

महत्वाच्या घटना

  • १९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.

  • १९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.

  • १९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.

  • १९७५: पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र झाला.

  • १९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.

  • १९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.

  • १९९७: निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.

  • १८८८: बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९७१)

  • १९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९१)

  • १९१३: रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९९९)

  • १९१६: विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

  • १९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)

मृत्यू

  • १७३६: जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट यांचे निधन. (जन्म: २४ मे १६८६)

  • १८२४: फ्रान्सचा राजा लुई (अठरावा) यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)

  • १९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४)

  • १९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन. (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड)

  • १९६५: अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८६)

  • १९७३: पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.

  • १९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन. (जन्म: १३ जुलै १८९२)

  • १९९४: साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)

  • २००५: लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२०)

  • २०१२: आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.