चालू घडामोडी - १७ एप्रिल २०१७

Date : 17 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुजरातमध्ये मोदींचा १० किलोमीटरपर्यंत रोड शो
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमधल्या सुरतमध्ये भाजपानं १० किलोमीटरपर्यंत रोड शो काढला असून विशेष म्हणजे भाजपाचा हा रोड शो अडीच तासांत पूर्ण करण्यात आला.

  • पंतप्रधानांनी रोड शो दरम्यान हात उंचावून जनतेला अभिवादन केले व रोड शोच्या वेळी महिलांनी आकर्षक कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळाले असून गुलाबी रंगाचं टी-शर्टमध्ये 90 महिला बायकर्सच्या ताफ्याचा लवाजमा मोदींच्या गाडीभोवताली होता.

  • रोड शोमध्ये २५ हजार बाईकवर ५० हजार लोक मोदींच्या मागोमाग होते. रोड शोनंतर मोदी सर्किट हाऊसमध्ये दाखल झालेत. आज रात्री ते येथेच वास्तव्याला राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ४०० कोटी रुपयांच्या किरण मल्टी सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करणार आहेत.

काश्मिरी लोकांना दहशतवादी आणि सैनिक दोघंही मारतात- दिग्विजय सिंह
  • दिग्विजय  सिंह यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. 

  • काश्मिरमध्ये सैन्य आणि स्थानिक नागरिकांमधील वाद वाढत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काश्मिरी जनतेला सैन्य आणि दहशतवादी दोघेही मारतात असं ते म्हणाले आहेत. 

  • काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि स्थानिक लोकांमधील वाद चिघळत आहे. 

  • दोन दिवसांपूर्वी एका व्हिडिओत लष्कराच्या जीपवर हातपाय बांधलेल्या एका काश्मीरी युवकाचा व्हिडिओ समोर आला.

  • अशापरिस्थितीत दिग्विजय सिंह यांनी केलेलं  ‘काश्मिरी लोकांना एका बाजूने दहशतवादी मारतात तर दुसरीकडून भारतीय लष्कराचे जवान.’ हे वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे.

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी फसली
  • उत्तर कोरियाचे संस्थापक नेते किम सुंग यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त संचलन झाले, त्यात शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

  • उत्तर कोरियाची नवीन क्षेपणास्त्र चाचणी फसली असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले असून उत्तर कोरियाने दक्षिण हामक्योंग प्रांतातील सिनपो येथून क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले, पण ते अपयशी ठरले.

  • उत्तर कोरियाने अलीकडेच एका कार्यक्रमात ६० क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले होते. त्यात काही नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा समावेश होता.

  • उत्तर कोरियाची अण्वस्त्र महत्त्वाकांक्षा मोठी असून त्याबाबत अमेरिकेला चिंता आहे.

  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाची दादागिरी मोडून काढण्यासाठी एकतर्फी कारवाईचा इशारा दिला आहे. चीनला त्यांचा मित्र देश म्हणून उत्तर कोरियाला समजून सांगता आले नाही व अण्वस्त्र कार्यक्रम बंद केला नाही.

टायटॅनिकच्या चावीचा ७० लाख रुपयांचा लिलाव
  • आख्यायिका बनलेले टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्या समुद्र सफरीसाठी रवाना झाले; मात्र कधीच परत आले नाही.

  • टायटॅनिक जहाजाची भक्कम चावी नुकतीच ८५ हजार पौंड म्हणजेच सुमारे ७० लाख रुपयांना लिलावात विकली गेली. असून ही चाबी टायटॅनिकच्या लाईफ जॅकेट लॉकरची होती.

  • डेव्हिजेसमध्ये झालेल्या या लिलावात टायटॅनिकशी संबंधित इतरही काही वस्तू विकल्या गेल्या. सुमारे २०० वस्तूंचा त्यात समावेश होता.

  • टायटॅनिकशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज लिलावात सहभागी झाले होते. त्यात ही चावी सर्वाधिक किमतीत विकली गेली.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • कवी सूरदास, हिंदीतील एक थोर कवी व श्रेष्ठ कृष्ण भक्त जन्म : १७ एप्रिल १४७९

  • यशवंत रामकृष्ण दाते,नामवंत मराठी कोशकार : १७ एप्रिल १८९१

  • सिरिमावो भंडारनायके महिला पंतप्रधान : १७ एप्रिल १९१६

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • बेंजामिन फ्रँकलिन विजेच्या शक्तीविषयी महत्त्वाचा शोध लावणारे अमेरिकेतील थोर शास्त्रज्ञ : १७ एप्रिल १७९०

  • सर्वपल्ली राधाकृष्णन भारतीय राष्ट्राध्यक्ष : १७ एप्रिल १९७५

  • सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री : १७ एप्रिल २००४

  • वसंत दिवाणजी कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक : १७ एप्रिल २०१२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.