चालू घडामोडी - १७ डिसेंबर २०१७

Date : 17 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नोगा’चे पुनरुज्जीवन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :
  • नागपूर : संत्रा उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘नोगा’चे (नागपूर आॅरेंज ग्रोवर्स असोसिएशन) पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी सरकारतर्फे ४९ टक्के व खासगी ५१ टक्के भागीदारी घेतली जाईल आणि नोगाची उत्पादने देश-विदेशात पोहोचवून आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूरच्या संत्र्याची नवी ओळख निर्माण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

  • ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी शानदार उद्घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या सोहळ्यात सन्माननीय पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ 

  • शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर नियोजनबद्ध ‘क्लस्टर’ उभारावे लागतील, असे गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले. वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत उपस्थित होते.

  • याशिवाय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ‘यूपीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजूभाई श्रॉफ, बजाज इलेक्ट्रीकल्स लि.च्या कन्झ्युमर्स प्रोडक्ट्सचे कार्यकारी अध्यक्ष व कंट्री हेड अतुल शर्मा, आॅरेंज ग्रोवर असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष पी. जी. जगदीश, कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे, उपाध्यक्ष हरजिंदरसिंग मान, सचिव जगदीश पाटीदार उपस्थित होते.

सिंधूची दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक :
  • दुबई : भारताच्या ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन युफेचा 21-15, 21-18 असा धुव्वा उडवून दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

  • या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुचीशी होईल. सिंधून 2016 साली रिओ ऑलिम्पिकची, तर 2017 साली ग्लास्गो जागतिक विजेतेपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

  • त्यानंतर सिंधूने दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवून आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. सिंधूने यंदाच्या मोसमात इंडिया ओपन आणि कोरिया ओपन या सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावली.

  • जागतिक विजेतेपद आणि हाँगकाँग ओपनमध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

योगी आदित्यनाथ सरकार नववधूला देणार मोबाइल आणि ३५ हजार रुपये :
  • लखनऊ- उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन दिला जाणार आहे. तसंच या योजनेअंतर्गत लग्नासाठी पात्र तरूणींना 35 हजार रूपये दिले जाणार आहेत. सध्या ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत सुरु करण्यात येणार आहे.

  • योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला 20 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. हे पैसे त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. तर कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी आणि सात भांडी असं एकूण 10 हजार रुपयांचं सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूंना देण्यात येईल. गरजू लोकांच्या सामूहिक विवाहसोहळ्यासाठी नोंदणीचं काम लवकरच सुरु होईल.

  • यासाठी प्रशासनाकडे एक कोटी 66 लाख 60 हजार रुपयांचा निधी मिळाल्या असल्याचं, वाराणसीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. के. यादव सांगितलं.

ई-वे बिल यंत्रणा १ जूनपासून कार्यान्वित :
  • देशात मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारे वे-बिल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्याची यंत्रणा १ जून २०१८ पासून कार्यान्वित करण्यास वस्तू आणि सेवा कर परिषदेने (जीएसटी काऊन्सिल) शनिवारच्या बैठकीत मान्यता दिली.

  • अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जीएसटी परिषदेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. त्यात ई-वे बिल पद्धती सुरू करण्यासाठीची संगणक यंत्रणा (सॉप्टवेअर आणि हार्डवेअर) तयार आहे की नाही याचा आढावा घेतला गेला.

  • देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी मूल्यवर्धित कर (व्हॅट) अधिकाऱ्यांकडून वाहतूकदारांना माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठीचा परवाना दिला जात असे. जीएसटी लागू झाल्यापासून त्या यंत्रणेत बदल करून हा परवाना प्रत्यक्ष कागद स्वरूपात देण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (ई-वे बिल) देण्याचे ठरले. मात्र त्यासाठी आवश्यक ती संगणक यंत्रणा तयार आहे की नाही ते तपासणे आवश्यक होते. त्याचा आढावा शनिवारच्या बैठकीत घेण्यात आला.

  • देशव्यापी ई-वे बिल यंत्रणा १६ जानेवारी २०१८ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास तयार असेल, असे अर्थ खात्याच्या पत्रकात म्हटले आहे. व्यापारी आणि वाहतूकदार त्याचा १६ जानेवारीपासून ऐच्छिकपणे वापर करू शकतील.

२००४ ते २०१६, यापूर्वी चुकीचे ठरलेले एक्झिट पोल :

नवी दिल्ली : गुजरातमध्ये सत्ता कुणाची याचा निर्णय 18 डिसेंबरला होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी हा अंदाज नाकारला आहे.

गुजरात निवडणुकीत काँग्रेसचं समर्थन करणारा पाटीदार नेता हार्दिक पटेलनेही एक्झिट पोलवर अविश्वास दाखवला आहे. शिवाय भाजप ईव्हीएममध्ये छेडछाड करणार असल्याचा आरोप केला आहे.

यापूर्वीचे एक्झिट पोल

  • २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत होतं, मात्र अंतिम निकाल वेगळाच लागला

  • २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा कमी होत असल्याचं दिसत होतं, मात्र प्रत्यक्षात बहुमताने काँग्रेसने सत्ता स्थापन केली

  • २००७ सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावती यांचा विजय एकाही एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आला नव्हता, मात्र बसपाची सत्ता आली

  • २०१५ मध्ये आपच्या एकतर्फी विजयाचा अंदाज एकाही एक्झिट पोलमध्ये दिसला नव्हता

  • २०१६ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमके आणि काँग्रेस युतीला आघाडी दाखवली होती, मात्र एआयएडीएमके पक्ष सत्तेत आला.

  • त्यामुळे गुजरातमध्ये नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी सर्वांनाच 18 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.

  • १९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.

  • १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

  • १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

  • २०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

  • २०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.

  • २०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.

जन्म

  • १८४९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा कलकत्ता येथे जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९०९)

  • १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)

  • १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)

  • १९११: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)

  • १९२४: पत्रकार, द हिन्दू चे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)

  • १९४७: दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer) दीपक हळदणकर यांचा जन्म.

  • १९७८: अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७४०: पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचे निधन.

  • १९३३: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)

  • १९५६: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९८)

  • १९५९: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८८० – गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)

  • १९६५: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १९०६)

  • १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचे निधन. (जन्म: २२ मार्च१९२४)

  • २०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला यांचे निधन.

  • २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.