चालू घडामोडी - १७ मे २०१७

Date : 17 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आरएसएसची पहिल्यांदाच जम्मूमध्ये बैठक :
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यांदाच जम्मूमध्ये वार्षिक आढावा बैठक आयोजित करणार असून, ही बैठक जुलैमध्ये घेण्यात येईल.

  • तसेच या बैठकीव्दारे काश्‍मीर खोरे हे भारताचा अविभाज्य घटक असून, तसा फुटीरतावाद्यांना संदेश देण्यात येणार असल्याचे 'आरएसएस'चे नियोजन आहे.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि विश्‍व हिंदू परिषदचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • १० ते २० जुलैदरम्यान तीन दिवसांच्या बैठकीचे संघाचे नियोजन असल्याची माहिती 'आरएसएस'चे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिली.

सौरऊर्जेवरील पहिले रेल्वे प्रशिक्षण केंद्र :
  • रोज सुमारे दीड हजार विविध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी भुसावळ येथील रेल्वेची क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था (झेडआरआयटीआय) आता सौरऊर्जेवर कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे वर्षाला ७० लाख रुपयांची वीजबिलाची बचत होत आहे.

  • भुसावळातील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेच्या टेरेसवर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ही प्रणाली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई येथे एका सोहळ्यात नुकतीच राष्ट्राला अर्पण केली.

  • झेडआरआयटी संस्थेत साडेतीन कोटी रुपये खर्च करून हा सौरऊर्जा प्रकल्प २१ नोव्हेंबर २०१६ पासून आकारास आला आहे. त्यात ४.५३५ मे.वॅ. इतका वीजभार आहे. वर्षभरात येथे सात लाख युनिट वीज तयार होते.

खूशखबर! पीएफची रक्कम मिळणार फक्त १० दिवसांत :
  • कर्मचाऱ्याने आवश्यक अर्ज करून इतर कागदपत्रांची पूर्तता केल्यावर दहा दिवसांच्या आत त्याला पीएफ खात्यातील रक्कम मिळू शकेल. या आधी यासाठी २० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता.

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाने ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी ‘ई-कोर्ट’ मॅनेजमेंट सिस्टिमही लागू केलीये

  • ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यामुळे पीएफ व्यवस्थापनाच्या कारभारात पारदर्शकता येईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीही कमी होतील. कामाचा निपटारा वेगाने होईल.

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भारताची घोडदौड :
  • अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील 'अर्न्स्ट अँड यंग' संस्थेच्या मानांकनातून हे स्पष्ट झाले.

  • 'अर्न्स्ट अँड यंग'च्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठांच्या मानांकनात पहिल्या ४० देशांमध्ये चीन अव्वल स्थानी असून, भारत दुसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या मानांकनात अमेरिका प्रथम क्रमांकावर होता. 

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा धोरणात केलेल्या बदलांमुळे ही घसरण झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने याआधीची तापमान बदलाबाबतची अनेक धोरणे रद्द करीत अमेरिकेतील कोळसा उद्योगाचे पुरुज्जीवन करणारे धोरण अवलंबले आहे.

  • भारत सरकारने २०२२ पर्यंत अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट  १७५ गिगावॉट ठेवले आहे. 'अर्न्स्ट अँड यंग'च्या मानांकनात युरोपीय देशांमधील जर्मनी चौथा, फ्रान्स आठवा; तर ब्रिटन दहावा आहे.

१३७ वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण एप्रिल : 
  • गेला एप्रिल महिना हा आधुनिक हवामान नोंदींच्या गेल्या १३७ वर्षांच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण एप्रिल महिना ठरला आहे.

  • अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार, २०१७मधील एप्रिल महिन्याचे सरासरी तापमान हे एप्रिल महिन्याच्या १९५१-१९८० या दीर्घकालीन सरासरी तापमानाच्या तुलनेत ०.८८ अंश सेल्सिअस अधिक होते.

  • एप्रिल २०१६च्या तुलनेत एप्रिल २०१७ हा ०.१८ अंश सेल्सिअस थंड होता. तर सन २०१०मधील एप्रिल या कालावधीतील तिसऱ्या स्थानावरील सर्वात उष्ण एप्रिल महिना ठरला.

  • नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीजतर्फे (जीआयएसएस) तापमानाचे दरमहा विश्लेषण केले जाते. त्यासाठी जगाच्या विविध भागांतील सुमारे ६,३०० हवामान केंद्रे, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची नोंदी घेतल्या जातात.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘ती’ मालिका आव्हानात्मक - सचिन तेंडुलकर :
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका होती. स्टीव्ह वॉ यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारतावर ३-० असा विजय मिळवला होता.

  • २४ वर्षांच्या कारकिर्दीतील १९९९ साली झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सर्वात आव्हानात्मक होती, अस मत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.

  • ‘१९९९ साली भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता आणि त्यांचा संघ बलाढय़ होता. या ऑस्ट्रेलियाच्या संघाने बरीच वर्षे क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवले होते.

  • त्यांनी अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे जो खेळ केला, त्याने क्रिकेट विश्वावर गारूड केले होते. प्रत्येकाला त्यांच्या शैलीतील खेळ करायचा होता. आमची शैलीही चांगली होती, पण त्यांची शैली काही खासच होती. ते आपल्या शैलीत सातत्यपूर्ण कामगिरी करत होते, त्यामुळे त्यांना क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवता आले,’ असे सचिन म्हणाला.

  • एकेकाळी अ‍ॅलन डोनाल्ड आणि शॉन पॉलक यांची गोलंदाजी खेळणे मला कठीण गेले नसून पण क्रोनिए गोलंदाजीला आल्यावर त्याचा सामना करावा लागू नये.

नोटाबंदीनंतर २३ हजार कोटी काळा पैसा बाहेर, करदात्यांमध्ये ९१ लाखांची भर : जेटली 
  • नोटाबंदीच्या निर्णयावर टीका होत असली तरी मोदी सरकार मात्र हे मानायला तयार नाही. मंगळवारी केंद्र सरकारच्या वतीने नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे सांगण्यात आले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आतापर्यंत २३ हजार कोटींची अघोषित संपत्ती समोर आल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले.

  • मंगळवारी प्राप्तिकर विभागाची www.cleanmoney.in ही वेबसाइट लाँच करण्यात आली. त्यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाच्या फायद्यांची माहिती दिली.

  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर २३ हजार कोटींच्या अघोषित संपत्तीबरोबर प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या संख्येतही ९१ लाख लोकांची भर पडल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कर चुकवून पैशांचा व्यवहार करणे आता कठीण राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

  • नोटाबंदीनंतर ९०० प्रकरणात १६,३९८ कोटी रूपयांच्या अघोषित उत्पन्नाबाबत माहिती समोर आली. त्याचबरोबर ९०० कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. ८३२९ प्रकरणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये ६,७४६ कोटी रूपयांच्या अघेाषित संपत्तीची माहिती मिळाली,

'उषा स्कूल ऑफ अ‍ॅथ्लिट' जूनपासून सुरू होणार :
  • धावपटू पी.टी. उषा हिने अथक परिश्रमाने केरळच्या कोझीकोडे येथे 'उषा स्कूल ऑफ अ‍ॅथ्लीट'ची स्थापना केली आहे. या स्कूलचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते १५ जून रोजी होईल. कोझीकोडे जिल्ह्यातील किनालूर येथे ३० एकर परिसरात अकादमी आकारास आली आहे.

  • जमीन केरळ सरकारने दिली असून, या स्कूलमध्ये आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला. यासाठी केंद्र शासनाने तीन वर्षांआधी साडेआठ कोटी रुपये दिले होते.

  • तसेच याशिवाय एक मड ट्रॅकदेखील तयार करण्यात आला असून, ४० खाटांचे वसतिगृहदेखील आहे.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • जागतिक दूरसंचार दिन

  • संविधान दिन : नॉर्वे

जन्म, वाढदिवस

  • डॉ. एडवर्ड जेन्नर, जरी देवीच्या लसीचा शोध : १७ मे १७४९

  • भागवत चंद्रशेखर, भारतीय क्रिकेट खेळाडू : १७ मे १९४५

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार  : १७ मे १९७२

  • कमिला तय्यबजी, वकील, समाजसेविका : १७ मे २००४

ठळक घटना

  • इंग्रज व मराठे यांच्यातील इतिहासप्रसिध्द सालबाईचा तह झाला : १७ मे १८७२

  • भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय : १७ मे १९४९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.