चालू घडामोडी - १७ नोव्हेंबर २०१७

Date : 17 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
3 हजार कोटींना विकलं गेलं लिओनार्डो द विंचीचं 500 वर्षं जुनं पेंटिंग :
  • न्यू यॉर्क- इटालियन चित्रकार लिओनार्डो दि विंची हे त्यांच्या अप्रतिम चित्रांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगविख्यात असलेल्या लिओनार्डो दि विंची यांनी मोनालिसाचं रेखाटलेलं चित्र फारच चर्चेत आलं. त्यांच्या चित्रांना जगभरातून मागणी आहे.

  • अमेरिकेत लिओनार्डो द विंची यांनी बनवलेल्या येशू ख्रिस्तांच्या 500 वर्ष जुन्या पेंटिंगचा 45 कोटी डॉलर म्हणजेच 3 हजार कोटी रुपयांना लिलाव झाला आहे. या पेंटिंगचा लिलाव हा जगभरातील सर्वात महागडा लिलाव आहे.

  • 19 मिनिटे चाललेल्या या बोलीवर खरेदीदारानं टेलिफोनवरून बोली लावली आहे. परंतु अद्यापही खरेदीदाराचा नाव उघड करण्यात आलेलं नाही. येशू ख्रिस्तांच्या या पेंटिंगचं नाव साल्वाडोर मुंडी असे आहे.

  • या पेंटिंगनं 2015मध्ये पिकासोची पेंटिंग वुमन ऑफ एल्जियर्सचा लिलावाचाही रेकॉर्ड तोडला आहे. त्या पेंटिंगची विक्री 17.94 कोटी डॉलरला झाली होती. येशू ख्रिस्तांवर रेखाटलेलं हे पेंटिंग हरवलं होतं, परंतु 500 वर्षांपूर्वी या पेंटिंगचा अधिकारी फ्रान्सच्या शाही परिवाराला मिळाला होता.

  • इतकेच नव्हे तर 1950च्या दशकात हे पेंटिंग फक्त 45 पौंड म्हणजेच जवळपास 3900 रुपयांत विकण्यात आलं आहे. 2005मध्ये पुन्हा त्या पेंटिंगचं 10 हजार डॉलरमध्ये लिलाव करण्यात आला होता. 

'मिशन 150'साठी भाजपचा 'मास्टर प्लॅन' :
  • गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत 150 जागा मिळविण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजपनं आपला ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींच्या तब्बल 25 ते 30 सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • ‘पंतप्रधान मोदी हे आमचे सर्वात मोठे नेते आहेत. ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता ते देशाचे पंतप्रधान आहेत. फक्त गुजरातच नाही तर देशात आणि जगातही त्यांच्या नेतृत्वाची चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वातील विकासकामं लोकं निश्चितच लक्षात ठेवतील.’ असं गुजरात भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याचं मत आहे.

  • पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो यामुळे थेट लोकांशी संपर्क साधता येणार असल्याचंही या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. 182 जागा असलेल्या गुजरातमध्ये मोदीं अनेक सभा घेणार आहेत. येत्या एक-दोन दिवसात त्याचं संपूर्ण वेळापत्रकही तयार करण्यात येणार आहे.

  • गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर आहे. त्यामुळे निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतरच खऱ्या अर्थानं प्रचाराला जोर चढणार आहे. म्हणून त्यानंतरच मोदींच्या सभांना सुरुवात होणार आहे.

रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंगवर इस्रोच्या कृपेने आता वाजणार भोंगा, तरीही सावधान :
  • भारतात रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंगवर होणा-या अपघातांची व त्यात बळी गेलेल्यांची संख्या कमी नाही. मनुष्यविरहीत लेव्हल क्रॉसिंगच्या ठिकाणी अपघाताची शक्यता जास्त असते. याचे विशेष कारण हे रेल्वे नसून रस्त्यावरून हे लेव्हल क्रॉसिंग पार करताना वाहनचालकांनी दाखवलेली बेपर्वाही व बेफिकिरी हेच आहे.

  • उतावळेपणापायी अनेक चालक आजही मनुष्यविरहीत लेव्हल क्रॉसिंगवर बेदरकारीने रेल्वेरूळ ओलांडत असतात. लेव्हल क्रॉसिंग म्हणजे रेल्वेचे रूळ व रस्ता हे दोन्ही एकाच स्तरावर असतात, त्या ठिकाणी ते परस्परांना छेद देत असतात व या दोन्ही श्रेणीमध्ये असलेल्या वाहनांचे भिन्नत्त्व असल्याने या लेव्हल क्रॉसिंगला ग्रेड क्रॉसिंग असेही म्हणतात.

  • ज्या ठिकाणी रेल्वे वा रस्ता या एका ठिकाणी आल्याने रेल्वेला प्रथम जाण्याचा अधिकार आपल्या देशात कायद्याने दिलेला आहे. मोटर वाहन कायदा १९८८ व रेल्वे कायदा १९८९ यानुसार रेल्वेगाडीला या ठिकाणी प्रथम जाण्याचा अधिकार आहे.

  • अशा या लेव्हल क्रॉसिंगवरून रेल्वेला ओलांडताना रस्ता वापर करणा-यांनी सावधानता बाळगली पाहिजे. दक्ष राहिले पाहिजे. मनुष्य रहीत लेव्हल क्रॉसिंग हेच अशा वाहनांच्या अपघातासाठी धोकादायक क्षेत्र आहे.

तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते : सर्व्हे
  • नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही सर्वात लोकप्रिय नेते आहे. अमेरिकन सर्व्हे एजन्सी प्यू रिसर्च सेंटरने हे सर्वेक्षण केलं आहे.

  • सर्व्हेचे आकडे काय सांगतात? या सर्व्हेनुसार, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 अंकांनी पुढे आहेत. 58 टक्के लोकांना राहुल गांधी आवडतात.

  • तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 88 टक्के लोकांनी सर्वात लोकप्रिय नेता म्हणून निवड केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना 57 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 39 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत.

  • कधी झाला सर्व्हे ? 21 फेब्रुवारी ते 10 मार्च म्हणजेच उत्तर प्रदेश निवडणुकांच्या काळात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे. या सर्व्हेमध्ये देशातल्या 2464 लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते.

पुढील वर्षापासून टपाल कार्यालयात मिळणार आधार कार्ड :
  • पुढील वर्षापासून महाराष्ट्र व गोव्यातील नागरिकांना राज्यांतील टपाल कार्यालयामधून (पोस्ट ऑफिस) आधार कार्ड मिळणार आहेत. या दोन्ही राज्यांमधील १२००हून अधिक पोस्ट कार्यालयांमध्ये आधार क्रमांकासाठी नोंदणी प्रक्रियाही २०१८पासून सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच. सी. अगरवाल यांनी दिली.

  • या सुविधेमुळे ज्या नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नाहीत, त्यांना पोस्टात जाऊन आधार कार्ड तयार करुन घेता येणार आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील एकूण २ हजार २१६ पोस्ट कार्यालयांपैकी १ हजार २९३ कार्यालयंमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

  • या सुविधेमुळे सध्या आधार कार्ड केंद्रांवरील गोंधळ आणि त्यांच्या मर्यादित संख्येमुळे नागरिकांना सहन करावा लागणारा मनस्ताप कमी होईल. पोस्टात आधार कार्ड काढण्याची सुविधा मिळाल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील जनतेला होईल.

  • दोन्ही राज्यांमधील पोस्टामधील कर्मचाऱ्यांना आधार कार्ड संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. चार हजार कर्मचाऱ्यांना आधार कार्ड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक पूर्व परिपक्वता दिन / आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

महत्वाच्या घटना

  • १८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

  • १८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

  • १९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

  • १९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.

  • १९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

  • १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

  • १९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

  • १९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.

जन्म

  • १७५५: फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)

  • १९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२)

  • १९०६: होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९१)

  • १९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)

  • १९२५: अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८५)

  • १९३२: अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)

  • १९३८: लेखक, नाटककार, निर्माते रत्‍नाकर मतकरी यांचा जन्म.

  • १९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.

मृत्यु

  • १८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.

  • १९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

  • १९३५: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)

  • २००३: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९६२)

  • २०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९२६)

  • २०१२: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)

  • २०१५: कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.