चालू घडामोडी - १७ ऑक्टोबर २०१७

Date : 17 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुरूत्वीय लहरींबरोबर गॅमा किरणांचाही शोध - शास्त्रज्ञांचा दावा:
  • दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे. दोन न्युट्रॉन ता-यांची ही पहिलीवहिली धडक टिपता आल्याने गुरूत्वलहरी या निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.

  • या आईनस्टाईन यांच्या भाकितालाही भक्कम पुरावा मिळाला आहे. या शोधामध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञांचेही महत्वपुर्ण योगदान आहे. दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेची घटना आपल्यापासून केवळ 13 कोटी प्रकाशवर्ष दुर घडल्यामुळे गुरूत्वलहरींचे आतापर्यंतचे सर्वात ठळक निरीक्षण नोंदविले गेले आहे.

  • यापुर्वी चार वेळा गुरूत्वीय लहरींचा शोध लागला असला तरी त्या आपल्यापासून खुप दुर अंतरावर होत्या. ही घटना पहिल्यांदाच पृथ्वीपासून इतक्या जवळ घडल्याने गॅमा किरणांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. ता-यांच्या धडकेमुळे घडलेल्या विस्फोटातून गॅमा किरणांचा झगमगाट बाहेर पडला.

  • या किरणांचा विस्फोट उपग्रहस्थित विविध दुर्बिणींनी गुरूत्वलहरींच्या निरीक्षणानंतर केवळ दोन सेकंदांच्या फरकाने टिपला आहे. यामुळे दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेमुळे गॅमा किरणे दिसतात या अनेक वर्ष जुन्या सिध्दांताला पुष्टी मिळाली आहे.

सोमालियात झाला आत्तापर्यंतचा सर्वात शक्तीशाली स्फोट - 276 लोकांचा मृत्यू
  • मोगादिशू- सोमालियाची राजधानी मोगादिशू शनिवारी सर्वात शक्तीशाली स्फोटाने हादरली.

  • शनिवारी एका हॉटेल आणि बाजाराच्या बाहेर झालेल्या स्फोटात 276 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 300 लोक जखमी झाली आहेत.

  • मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. गेल्या तीन दशकातील हा सर्वात शक्तीशाली स्फोट असल्याचं बोललं जातं आहे.

  • हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150 मीटरच्या परिघात उपस्थित असलेले नागरिकही मृत्युमुखी पडले.  

मोबाईल उपभोक्ता यादी मध्ये भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचणार :
  • येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. भारतही याला अपवाद नसून त्यामुळे या क्षेत्रात भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे.

  • 2018 मध्ये भारतातील मोबाईल वापकर्त्यांची संख्या तब्बल 53 कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज अमेरिकास्थित झेनिथ या एजन्सीने व्यक्त केला आहे. या यादीत चीन भारतापेक्षा पुढे आहे. 2018 मध्येही चीन आघाडी कायम राखेल आणि तेथील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 1.3 अब्ज असेल, असा अंदाज झेनिथने वर्तवला आहे.

  • यामध्ये अमेरिका 29 कोटी मोबाईल वापरकर्त्यांसह तिसऱ्या क्रमांकावर असेल.

  • पुढील वर्षभरात जगातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढणार असल्याचे ‘झेनिथ’ने म्हटले.

जनधन बँक खाती उघडल्यामुळे तंबाखू आणि दारु सेवनात घट :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेली बँकखाती विरोधकांच्या टीकेचा विषय असला तरी या सगळ्यातील एक सकारात्मक पैलू नुकताच समोर आला. ही बँक खाती उघडण्यात आल्यामुळे विशेषत: ग्रामीण भागात दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात घट झाली आहे.

  • ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या इकॉनॉमिक रिसर्च विंगच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. जनधन, आधार आणि मोबाईल (JAM) हे तीन घटकांच्या समन्वयामुळे सरकारला अनुदानाची रक्कम अधिक योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येत आहे.

  • त्यामुळे ग्रामीण भागात दारू आणि तंबाखू यासारख्या अपायकारक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाणही कमी झाले आहे.

  • महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमधील लोकांच्या जीवनशैलीतही लक्षणीय फरक पडला.

  • या अहवालानुसार ऑक्टोबर 2016 पासून हे बदल दिसायला सुरूवात झाली.

स्वदेशी बनावटीचे पहिले पाणबुडीभेदी जहाज नौदलात दाखल :
  • आयएनएस किल्तानमुळे भारताची संरक्षण व्यवस्था अधिक सुदृढ झाली आहे. याशिवाय, या लढाऊ जहाजाची बांधणी पूर्णत: भारतात करण्यात आली आहे. यामुळे या जहाजाचा नौदलातील समावेश हा "मेक इन इंडिया" या योजनेमधील यशाचाही क्षण आहे.

  • भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज (सोमवार) "आयएनएस किल्तान" या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीभेदी लढाऊ जहाजाचा औपचारिकरित्या भारतीय नौदलात समावेश करण्यात आला.

  • "प्रोजेक्‍ट 28" या नौदलाच्या प्रकल्पांतर्गत बांधणी करण्यात आलेल्या कार्मोता प्रकारातील (क्‍लास) चार लढाऊ जहाजांपैकी "आयएनएस किल्तान" हे तिसरे लढाऊ जहाज आहे. या जहाजावर स्वदेशी बनावटीचे शस्त्रास्त्रे बसविण्यात आली असून; हवाई व "सोनार" सर्वेक्षण प्रणालींचाही या जहाजावर अंतर्भाव करण्यात आला आहे.

  • लक्षद्वीप आणि मिनिकॉय या बेटसमूहांमध्ये वसलेल्या व व्यूहात्मकदृष्टया महत्त्वपूर्ण असलेल्या आमिनिदिवी बेटांमधील एका बेटावरुन या जहाजाचे नाव ठेवण्यात आले आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • जागतिक गरिबी निर्मूलन दिन

जन्म /वाढदिवस

  • सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक : १७ ऑक्टोबर १८१७

  • भास्करबुवा बखले, हिंदुस्तानी गायक-संगीतकार, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू : १७ ऑक्टोबर १८६९

  • नारायणराव बोरावके, पहिले मराठी साखर कारखानदार : १७ ऑक्टोबर १८९२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक : १७ ऑक्टोबर १८८२

  • जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली : १७ ऑक्टोबर १९०६

  • इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर यांचे निधन : १७ ऑक्टोबर : १७ ऑक्टोबर २००८

ठळक घटना

  • पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर : १७ ऑक्टोबर १९९४

  • मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला : १७ ऑक्टोबर १९७९

  • आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान : १७ ऑक्टोबर १९९८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.