चालू घडामोडी - १७ सप्टेंबर २०१७

Date : 17 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे :
  • भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजेच आज करणार आहेत.

  • याबरोबरच आज ते गुजरात निवडणुकी प्रचाराचे बिगुलही फुंकणार असून सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

  • भारतीय कर्णधार विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, ममता बॅनर्जी, अमित शाह, नारायण राणे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज ६७ वा वाढदिवस असून याचे औचित्य साधून भाजपाकडून  हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे, लोकार्पणानंतर पंतप्रधान डभोई येथे सभा घेणार आहेत.

  • आज होणारा धरण लोकापर्ण सोहळा अहमदाबादपासून २०० किलोमीटवर असून या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते, मात्र दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला.

  • नर्मदा कंट्रोल अथॉरिटीने दिलेल्या सुचनेनुसार धरणाचे १७ जून रोजी बंद केलेले ३० दरवाजेही पंतप्रधान उघडतील दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली.

  • पुर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती. धरणाबाबत बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले,' यामुळे १८ लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येईल तसेच नर्मदेचे पाणी कालव्यांतून ९ हजार गावांमध्ये खेळवले जाईल'.

बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन लोणावळ्यात अध्यक्षपदी : डॉ. अनिल अवचट 
  • २० सप्टेंबरला होणा-या या संमेलनाचे अध्यक्षस्थान बालकुमारांसाठीच्या लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहिमत्यिक डॉ. अनिल अवचट भूषविणार आहेत.

  • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे.

  • या संमेलनाला परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि मसापचे पदाधिकारी तसेच मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, संशोधन विभागप्रमुख व विश्वस्त गजानन केळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

  • प्रा. जोशी म्हणाले, ‘‘मराठी अभिमान गीत शालेय विद्यार्थी सादर करणार असून उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट बालकुमारांशी संवाद साधणार आहेत.

  • कवयित्री डॉ. संगीता बर्वे, आश्लेषा महाजन आणि आदित्य दवणे ‘लेखनाची आनंद वाट’ या कार्यक्रमात बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा घेणार आहेत.

हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचे निधन :
  • भारतीय हवाईदलाचे (आयएएफ) मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांचे शनिवारी सायंकाळी दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ९८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामनण हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी हॉस्पिटलात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सिंग यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मोठी कामगिरी बजावली होती.

  • भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आणि मार्शल आॅफ एअरफोर्स अर्जन सिंग (वय ९८ वर्षे) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर आर्मीज रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

  • त्यांना पाच रँक देऊ न फिल्डमार्शलचा दर्जा देण्यात आला होता, अनेक नेते व लष्करी अधिका-यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

  • माजी लष्करप्रमुख व परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी अर्जन सिंग यांना जिवंतपणी श्रद्धांजली वाहिली, सिंग यांनी ट्विटची सुरुवात आत्म्यास शांती लाभो अशी केली होती नंतर त्यांनी ट्विट डिलिट केले.

धोनी सामिल होणार दिग्गजांच्या यादीत :
  • आजपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो या विक्रमाला गवसणी घालू शकतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडेत धोनीने आतापर्यंत ५२.२० च्या सरासरीने ९६५८ धावा केल्या आहेत.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टम्पिंगचे शतक करण्याचा विक्रम केल्यानंतर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याला आणखी एक विक्रम खुणावतोय.

  • या मालिकेत धोनीने ३४२ धावा केल्यास तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांच्या पंक्तीत विराजमान होईल.

  • भारतीय संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा धोनीच्या नावावर असून एवढेच नाही तर कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणारा धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे.

  • धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून या सामन्यांमध्ये दोन शतकांच्या मदतीने त्याने १२०४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची ही कामगिरी आणि सध्याचा त्याता फॉर्म पाहता आगामी मालिकेत दहा हजार धावांचा टप्पा गाठणे अवघड नाही.

बंगळुरू येथे 'मिस इंडिया सुपर टॅलेंटेड' स्पर्धेत कौशिकी नाशिककर :
  • बंगळुरू येथे अलीकडेच झालेल्या 'मिस इंडिया सुपर टॅलेंट' स्पर्धेत नागपूरची कौशिकी नाशिककर हिने बाजी मारली असून तिच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

  • गेल्या काही वर्षांपासून नागपूरच्या सौंदर्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेला नावलौकिक आता कौतुकाचा विषय ठरत आहे.

  • बंगळुरू येथील दावणगिरीला जेनेसीस रिसोर्टमध्ये 'मिस इंडिया सुपर टॅलेंट - सिझन ९' ही स्पर्धा घेण्यात आली असून यामध्ये 'मिस परफेक्‍ट' या गटात कौशिकीने विजेतेपद पटकावले.

  • देशभरातील शेकडो सौंदर्यवतींनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. देशाच्या विविध भागांमध्ये जवळपास सहा ठिकाणी या स्पर्धेसाठी ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यापैकी 15 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

  • या पंधरा स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली, यात सौंदर्य, कॅटवॉक, सामान्यज्ञान आदी गोष्टींची चाचणी घेण्यात आली असून यासाठी चार दिवस सर्व स्पर्धकांकडून कसून तयारी करून घेण्यात आली. जिद्द, मेहनत, कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर कौशिकीने हा खिताब पटकावला.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील मुख्य याचिकाकर्ते यांचे निधन : महंत भास्कर दास
  • रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील मुख्य याचिकाकर्ते महंत भास्कर दास यांचे शनिवारी निधन झाले असून ते ८९ वर्षांचे होते.

  • महंत भास्कर दास हे निर्मोही आखाड्याचे सरपंच महंत (प्रमुख) होते, त्यांच्या मृत्यूमुळे या खटल्यातील हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मांचे याचिकाकर्ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

  • या खटल्यातील सर्वांत जुने याचिकाकर्ते हाशिम अन्सारी यांचे जुलै २०१६ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले असून अन्सारी व भास्कर दास हे रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यात परस्परांच्या विरोधात लढाई लढत होते, तरी त्यांचे वैयक्तिक संबंध मैत्रीपूर्ण होते.

  • दीर्घकाळापासून आजारी असलेल्या भास्कर दास यांना बुधवारी रुग्णालयात दाखल केले असता तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • भारतात राष्ट्रीय श्रम दिवस व विश्वकर्मा जयंती.

जन्म /वाढदिवस

  • नरेंद्र दामोदरदास मोदी, भारताचे पंतप्रधान : १७ सप्टेंबर १९५०

  • दिलीप पुरुषोत्तम चित्रे, कवी, कथाकार, समीक्षक : १७ सप्टेंबर १९३८

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदि

  • हसरत जयपुरी, गीतकार : १७ सप्टेंबर १९९९

  • वसंत बापट, कवी : १७ सप्टेंबर २००२

​​​ठळक घटना

  • हरिकेन आयव्हनने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पेन्साकोला शहराजवळ किनारा गाठला व संपत्तीची अमाप हानी केली : १७ सप्टेंबर २००४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.