चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ सप्टेंबर २०१९

Date : 17 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ७०० फूट अन्  हजार किलोचा केक कापणार :
  • सूरत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर रोजी 69 वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सूरत येथील ब्रेडलाइनर बेकरीच्या मालकाने मोदींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरविलं आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त 7 हजार किलो आणि 700 फूट लांब असा केक कापून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. सूरत येथील सरसाना कन्वेंशन सेंटरमध्ये 700 प्रामाणिक लोकांकडून हा केक कापण्यात येणार आहे. 

  • ब्रेडलाइनर बेकरीचे मालक नितीन पटेल यांनी सांगितलं की, हा केक जगातील सर्वात मोठा केक असणार आहे. याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली जाईल. भ्रष्टाचाराविरोधात लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी हा केक कापण्यात येणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. दरवर्षी ब्रेडलाइनर बेकरी मोदींचा वाढदिवस मोठा केक कापून साजरा करतो, हा केक गरीब मुलांमध्ये वाटला जातो. 

  • याचसोबत अतुल बेकरीनेही आदिवासी पाड्यातील 370 शाळांमधील कुपोषित विद्यार्थ्यांना जेवण देणार आहे. जवळपास 12 हजार विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाणार आहे. कुपोषणाशी लढण्याचा दृढ निश्चय करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येईल. कुपोषणमुक्त भारताचं जे स्वप्न नरेंद्र मोदींनी पाहिलं आहे ते साकार करण्यासाठी आम्ही मदत करू असं अतुल बेकरीचे मालक अतुल वेकारिया यांनी सांगितले आहे.  

थायलंडमध्ये ८६ वाघांचा मंदिरातून स्थलांतरानंतर मृत्यू :
  • थायलंडमधील मंदिरातून ताब्यात  घेतलेल्या १४७ वाघांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे  ८६ वाघ मरण पावले असल्याची माहिती उद्यान अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. एकेकाळी पैसा मिळवणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यटन केंद्र सदृश मंदिरात या वाघांना काही ठेवण्यात आले होते असे सांगण्यात आले.

  • कांचनबुरी प्रांतातील वात फा लुआंग टा बुआ या मंदिरात गेली काही वर्षे १४७ वाघ ठेवण्यात आले होते, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले होते. त्या ठिकाणी गेलेले पर्यटक या वाघांसमवेत छायाचित्रे काढून घेत असत. या वाघांना तेथून हलवतानाच्या २०१६ मधील मोहिमेत गैरव्यवस्थापनामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड झाली असा आरोप आहे.

  • मंदिरातून वाघ ताब्यात घेतले तेव्हा त्या  ठिकाणी वाघांच्या बछडय़ांचे मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसून आले. बहुदा तेथून वाघांच्या शरीराचे भाग विकले जात असावेत, त्यातून मोठय़ा प्रमाणात पैसा मिळत होता.

  • वाघांच्या शरीराचे भाग चीन व व्हिएतनाममध्ये मोठय़ा प्रमाणात विकले जातात. वाघांच्या अवयवात औषधी गुण असतात असा एक चुकीचा समज रूढ असून त्यातून त्यांच्या शरीराच्या भागांची विक्री केली जाते. जे वाघ या सगळ्या दुष्टचक्रातून वाचले आहेत त्यांची संख्या ६१ आहे व त्यांना रचाबुरी प्रांतातील दोन प्रजनन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. वाघांचा मृत्यू जनुकीय रोग किंवा प्रजननाशी संबंधित कारणांनी झाला असावा, असे मत राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव व वनस्पती संवर्धन या विभागाचे पॅट्रापोल मॅनीऑन यांनी व्यक्त केले आहे. जे वाघ जिवंत आहेत त्यांनाही जनुकीय समस्या होत्या, त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असून त्यांना जिभेचा पक्षाघात झाला आहे, त्यांना श्वास घेता येत नाही, आतडी तुटलेली आहेत.

PMO कडून NSA अजित डोवाल यांची कार्यकक्षा निश्चित :
  • पंतप्रधान कार्यालयाने पी.के.मिश्रा, पी.के.सिन्हा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कार्यकक्षा निश्चित केली आहे. काही दिवसांपूर्वीच पी.के.मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव आणि पी.के.सिन्हा यांची प्रधान सल्लागार या पदांवर नियुक्ती झाली आहे. पीएमओकडून या संदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे.

  • प्रधान सचिव मिश्रा धोरणात्मक मुद्दे कार्मिक, कायदा मंत्रालयाशी संबंधित विषय, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती संदर्भात विषय हाताळतील. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विषय, भ्रष्टाचार विरोधी युनिट असे महत्वाचे विषय हाताळतील.नियुक्त्यांचा विषय वगळता एनएसए अजित डोवाल यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेशी संदर्भात जबाबदारी असेल तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित असलेले धोरणात्मक विषय, संरक्षण, अवकाश, अणू ऊर्जा आणि ‘रॉ’ यांच्याशी संबंधित कामकाजावर एनएसए डोवाल लक्ष ठेवतील.

  • रासायनिक शस्त्रांसंदर्भात धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. त्याशिवाय नागालँडमधील फुटीरतावादी एनएससीएन बरोबर चर्चेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मिश्रा पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव होते. मागच्या आठवडयात त्यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी मिश्रा यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

४८ वर्षानंतर बांगलादेशनं मिटवलं पाकिस्तानचं ‘नामोनिशाण’ :
  • मुक्तीसंग्राम लढाईच्या ४८ वर्षानंतर बांगलादेशने सीमेवर असणाऱ्या सर्व खांबांवरुन पाकिस्तानचे नाव हटवले आहे. १९४७ सालच्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर हे खांब बसवण्यात आले होते. बॉर्डर गार्ड बांगलादेशने स्वत:च्या पैशातून हे काम पूर्ण केले.

  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निर्देशावरुन सीमेवर असणाऱ्या खांबांवरुन पाकिस्तान नाव हटवण्याचे काम करण्यात आले. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती.

  • त्यानंतर ४८ वर्षांनी पाकिस्तानचे नाव हटवण्यात आले. आता बांगलादेशात सीमेवरील सर्व खांबांवर पाकिस्तान/पीएके ऐवजी बांगलादेश/बीडी हे नाव असेल असे बीजीबीकडून सांगण्यात आले. १९७१ सालच्या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करुन बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली.

नरेंद्र मोदी माझ्यासाठी प्रेरणास्रोत! :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरोग्याविषयी अधिक जागरूक आहेत, यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच योगाला जागतिक मान्यता मिळत आहे तसेच देशभरातील जनता योगाचे धडे गिरवत आहे. पंतप्रधान स्वत: योगाभ्यास करत असून त्यांनी लोकांसमोर चांगला पायंडा पाडला आहे. ‘तंदुरुस्त भारत चळवळी’मुळे देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

  • काही वर्षांपूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हाच ते म्हणाले होते, ‘‘तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस आणि काहीही गरज भासेल तेव्हा माझ्याकडे येत जा.’’ पहिल्या भेटीतच त्यांच्या या वागणुकीमुळे मी भारावून गेले होते. त्यामुळे त्यांना भेटताना मला कधीही अवघडल्यासारखे वाटले नाही. नेत्यापेक्षाही एका वडीलधाऱ्या व्यक्तीला भेटल्याचे समाधान मिळत आहे. त्यामुळेच मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने कोणत्याही विषयावर बोलू शकते. समाजाच्या तसेच देशाच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे नरेंद्र मोदी म्हणजे माझ्यासाठी प्रेरणास्रोतच आहेत.

  • मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक शिखरे पादाक्रांत करण्यात आली, ती प्रशंसनीय आहेत. एक खेळाडू या नात्याने, खेळांचा प्रसार आणि देशातील क्रीडासंस्कृती पुढील टप्प्यावर कशी नेता येईल, हा पहिला विचार माझ्या मनात आला. आता ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून नव्या तसेच युवा गुणवत्तेला शोधण्याचे तसेच त्यांना घडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या अभियानाचा फायदा सर्वच खेळाडूंना होत आहे. स्पर्धेत यश मिळवणाऱ्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. याच वेगाने सरकार आणि खेळाडूंची कामगिरी होत राहिली तर येत्या काळात आपण क्रीडाक्षेत्रातही अव्वल राहू, अशी मला खात्री आहे.

दिनविशेष :
  • मराठवाडा मुक्तिदिन

महत्वाच्या घटना 

  • १६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली.

  • १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

  • १९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

  • १९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.

  • १९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.

  • २००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.

जन्म 

  • १८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)

  • १८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

  • १८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.

  • १९००: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)

  • १९०६: श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)

  • १९१४: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)

  • १९२२: अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो  यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९७९)

  • १९२९: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)

  • १९३०: व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

  • १९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.

  • १९३७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.

  • १९३८: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००९)

  • १९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.

  • १९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००)

  • १९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०)

  • १९९४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १९५४)

  • १९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२)

  • २००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन. (जन्म: २५ जुलै १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.