चालू घडामोडी - १८ एप्रिल २०१७

Date : 18 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट परवानाधारक कंपन्यांसाठी RBIची नवी मसुदा
  • पेटीएम आणि मोबीक्विक यासारख्या मोबाइल वॉलेट कंपन्यांसाठी हे प्रस्तावित नियम जाचक ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर या कंपन्यांनी एक महत्त्वाची बैठक गेल्या आठवड्यात घेतली.

  • रिझर्व्ह बँकेने नव्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जारी केला असून, या मसुद्याबाबत पेटीएमसह अन्य मोबाइल वॉलेट कंपन्यांनी चिंता व्यक्त केली असून रिझर्व्ह बँकेने मात्र, प्रस्तावित नियमांबाबत ठाम भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • कंपन्यांनी प्रामुख्याने केवायसीविषयक नियमांवर चर्चा केली. केवायसीविषयक नियम छोट्या व्यवहारांसाठी अतिशयोक्त ठरतील. छोटे आर्थिक व्यवहार बंदच होण्याचा धोका आहे, असे कंपन्यांना वाटते.

भविष्य निर्वाह निधीवर व्याज मिळणार
  • २०१६-२०१७ या वर्षासाठी पीएफवर ८.६५% व्याज मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील ४ कोटी ईपीएफओ सदस्यांना मिळणार आहे.

  • भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वर ८.६५% व्याज मिळण्याच्या कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून सदस्यांना व्याज मिळावे या दृष्टीने तुमच्या कडे निधी आहे की नाही याकडे लक्ष ठेवावे अशी सूचना अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाला दिली आहे.

  • पीएफवर ८.६५% व्याज मिळावे अशी सूचना ईपीएफओ ट्रस्टीजने केली होती. हे व्याज कमी करावे असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे होते. व्याजदर वाढवल्यास सरकारी तिजोरीवर ताण पडेल असे अर्थमंत्रालयाचे म्हणणे होते.

यशोवर्धन जुमळे करणार जर्मनीत भारताचे प्रतिनिधित्व
  • यशोवर्धन हा अनुभवी खेळाडू असून, यापूर्वी त्याने चीन, मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले आहे. स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू एकत्रित प्रो डबल व प्रो सिंगल या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत.

  • जर्मनी येथील हंबुर्ग शहरात सुरू असलेल्या जागतिक टेबल-सॉकर अजिंक्यपद स्पर्धा २०१७ मध्ये अकोल्यातील यशोवर्धन अनिल जुमळे व मंदार राजू झापे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

  • स्पर्धा १६ ते १८ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यजमान जर्मनीचा संघ, तर ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, युक्रेन, अमेरिका व यूके या दिग्गज देशातील खेळाडूंना भारतातील खेळाडू टक्कर देत आहेत.

  • भारतीय टेबल सॉकर फेडरेशनचे महासचिव मनोज सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील एकूण ९ खेळाडूंचे पथक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

  • मंदार याने आपल्या प्रो सिंगल या क्रीडा प्रकारात प्रथमच जागतिक क्रमवारीत स्थान मिळविले आहे.

अ‍ॅम्बी व्हॅली’चा होणार लिलाव
  • नवी दिल्ली : गुंतवणूकदारांचे देणे चुकते करण्यास सहारा उद्योगसमूहाच्या मालकीची पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ ही मालमत्ता लिलावात विकून पैसे वसूल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

  • सहाराने गुंतवणूकदारांचे १४ हजार कोटी रुपये अद्याप परत करायचे आहेत. त्यापैकी पाच हजार कोटी रुपये १७ एप्रिलपर्यंत ‘सेबी’कडे जमा न केल्यास अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारला जाईल, असे न्यायालयाने याआधी बजावले होते.

  • सहाराने कबूल केल्याप्रमाणे पैसे जमा न केल्याने न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने लिलावाची कारवाई सुरु करण्याचा आदेश दिला.

  • अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ कार्यालयामार्फत करण्यात येईल.

  • सहाराच्या वकिलांनी अ‍ॅम्बी व्हॅलीसंबंधीची सर्व आवश्यक माहिती दोन दिवसांत ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ना द्यावी आणि त्या कार्यालयाने १० दिवसांत या मालमत्तेचे मूल्यांकन करून लिलावाची कारवाई कायद्यानुसार सुरू करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. गेल्या फेब्रुवारीत न्यायालयाने अ‍ॅम्बी व्हॅलीवर टांचही आणली होती.

चारा घोटाळा : शिक्षेविरोधातील लालूंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
  • १९९० ते १९९७ या काळात चारा घोटाळ्यात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता.

  • पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्यातील अपीलाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. ९०च्या दशकात झालेला हा चारा घोटाळा देशातील अनेक प्रमुख घोटाळ्यांपैकी एक आहे.

  • कलम 201 हे खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आहे. हे दोन्ही आरोप त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत 96 लाख रुपयांच्या अनियमिततेप्रकरणी आहेत.

  • झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्यावरील गुन्हेगारी स्वरुपाचं कटकारस्थान करण्याचे आरोप काढून टाकले असूनही तरी कलम 201णि कलम ५११ नुसार काही आरोप कायम ठेवले आहेत.

जिओला एअरटेलची ‘४जी डाटा’ची टक्कर :
  • रिलायन्स जिओने काही मोफत आणि काही अतिशय स्वस्त योजनांसह बाजारात उडी घेतल्यापासून, त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली असून, जिओला टक्कर देण्यासाठी अन्य टेलिकॉम कंपन्यांनीही तशाच योजना जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

  • त्याचा फटका बसू नये, म्हणून एअरटेलनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ३ महिन्यांसाठी ४जी स्पीड आणि ३० जीबी फ्री डाटा देण्याची घोषणा केली आहे.

  • कोट्यवधींचा टप्पा पार केल्यानंतर, जिओने मोफत सेवा बंद केली आणि प्राइम मेंबरशिपची आॅफर आणली. त्यालाही ग्राहकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. मग जिओने ‘समर सरप्राइज’ आॅफर बंद करून ‘धन धना धन’ ही आॅफर ग्राहकांसाठी सेवेत आणली.

  • एअरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी आपल्या पोस्टपेड ग्राहकांना एक ईमेलच पाठवला आहे. पुढील तीन महिने मोफत डाटाचा लाभ घ्या, ही आॅफर तुमच्या लांब उन्हाळी सुट्ट्यांमध्येही सुरू राहील, असे गोपाल विठ्ठल यांनी ईमेलमध्ये नमूद केले आहे. जे ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग पॅक सक्रिय करू शकले नाहीत, त्यांना त्यांचे पैसेही परत मिळणार आहेत.

  • करावी, अशी मागणी एअरटेलने ट्रायकडे केली होती.

  • रिलायन्सने जिओ प्राइम मेंबरशिपसोबत दिलेली तीन महिन्यांची मोफत सेवा बंद करावी, असा आदेश दिल्यानंतर, रिलायन्सने नव्या रूपात पुन्हा जुनीच आॅफर ग्राहकांसाठी सेवेत आणली होती. या नव्या आॅफरचे नाव ‘जिओ धन धना धन’ आहे.

सुखदेव निर्मळचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते गौरव :
  • सुखदेव निर्मळ या सर्वसामान्य युवकाचा हा संशोधन प्रवास अगदी अद्भुत असा आहे. राजापूर (ता. संगमनेर) येथील महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या सुखदेवला आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, घरच्या कोरडवाहू शेतीत लक्ष घालावे लागले.

  • संगमनेर तालुक्यातील काकडवाडी सारख्या अगदी छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या, चरितार्थासाठी दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर चालकाची नोकरी करणाऱ्या सुखदेव तात्याभाऊ निर्मळ या ३२ वर्षाच्या तरुण संशोधकाचा फ्री वाल्व्ह इंजिन टेक्निक या संशोधनासाठी झी टीव्हीच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंग इनोव्हेटर श्रेणीतील रँचो अॅवॉर्डने राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.

  • मात्र लहानपणापासून त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिन बाबत प्रचंड आकर्षण होते. या छंदातून त्याने सर्व प्रकारची इंजिने अभ्यासली. त्यांच्या बाबत अधिकाधिक माहिती मिळवली, हाताळली.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • प्रसिद्ध चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचा जन्म : १८ एप्रिल १९१०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • चाफेकर बंधू : १८ एप्रिल १८९८

  • क्रांतीवीर तात्या टोपे (रामचंद्र पांडुरंग टोपे) : १८ एप्रिल १८५९

  • अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ : १८ एप्रिल १९५५

  • पांडूरंग वामन काणे : १८ एप्रिल १९७२

  • थॉर हायरडाल नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ : १८ एप्रिल २००२

जागतिक दिवस 

  • जागतिक वारसा दिन (World Heritage Day) : १८ एप्रिल 

  • झिम्बाब्वे स्वातंत्र्य दिन : १८ एप्रिल

  • इराण सेना दिन : १८ एप्रिल

ठळक घटना 

  • दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना : १८ एप्रिल १३३६

  • टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले : १८ एप्रिल १९१२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.