चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ एप्रिल २०१९

Date : 18 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
७५ वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये - सुशीलकुमार शिंदे :
  • सोलापूरमधील भाजपाच्या खासदाराने काहीच काम केले नाही. भाजपाने फक्त टीका करण्याचे काम केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत याची भीती वाटल्याने सोलापूरमध्ये भाजपाने उमेदवार बदलला आणि जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली, अशी टीका काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली. ७५ वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये, या मताचा मी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सोलापूरमध्ये मतदान केले. सोलापूरमध्ये काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे, भाजपातर्फे लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे रिंगणात आहे. या तिरंगी लढतीबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानानंतर भाष्य केले. शिंदे म्हणाले, तिरंगी लढतीची ही पहिलीच वेळ नाही. मी यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये अशा लढतींना सामोरे गेलो.

  • सोलापूरमध्ये भाजपा खासदाराने एकही काम केले नाही. मी खासदार असताना केलेले काम आजही जनतेसमोर आहे, असा दावा शिंदे यांनी केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा धर्मनिरपेक्ष असून या भागातील मतदारांनी जात, धर्म न पाहता मला मतदान केले, असे त्यांनी सांगितले. जनतेचा आता मोदींवर विश्वास राहिलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

  • ७५ वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये, या मताचा मी आहे. मी गेल्या निवडणुकीतच स्पष्ट केले होते की मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. मात्र, २०१४ मधील पराभवानंतर अनेकांनी मला पुन्हा निवडणूक लढवण्याची विनंती केली. जनतेच्या आग्रहाखातर मी निवडणुकीत उतरलो. पण ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात :
  • लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातील या ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत.

  • दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान होणार आहे.

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

राज्यात १० जागांसाठी आज मतदान :
  • मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील या ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत.

  • राज्यात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ३८२ संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक कडक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे २१०० मतदान केंद्रांवरील थेट प्रक्षेपणाद्वारे तेथील मतदान प्रक्रियेवर करडी नजर असेल, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.

  • राज्यात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

  • देशात आज इथे मतदान - तमिळनाडूतील लोकसभेच्या ३९ पैकी ३८ मतदारसंघांसह विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाने बुधवारीच रद्द केली. तसेच त्रिपुरातील एका जागेवरील मतदानही लांबणीवर टाकण्यात आले आहे. कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूर आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होणार आहे. ओदिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही आज मतदान होणार आहे.

‘टाइम्स’च्या यादीत मुकेश अंबानी, अरुंधती काटजू, मेनका गुरुस्वामी :
  • न्यू यॉर्क : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि लोकचळवळींसाठी कायदेशीर लढा देणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांचा सहभाग जगभरातील प्रभावी व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे.

  • ‘टाइम’ या नियतकालिकाने जगभरातील प्रभावी व्यक्तींची २०१९ मधील यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात या तिघांचा समावेश आहे. या यादीत भारतीय-अमेरिकन कॉमेडियन हरन मिनाज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश आहे.

  • मुकेश अंबानी यांची व्यावसायिक धोरणे ही अधिक व्यापक असून त्यामुळेच जवळपास २८० दशलक्ष लोकांना कमी किमतीत ४जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे जगभरात व्यापाराचा विस्तार करून त्यांची ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ हे घोषवाक्य खरे केले आहे. तर अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांनी एलजीबीटीक्यू यांच्यासाठी लढा देऊन कायदेशीर मार्गाने त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत.

जेट एअरवेजची सेवा आज रात्री १२ नंतर पुर्णपणे बंद, बँकांकडून ४०० कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय :
  • मुंबई : बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पुर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद होणार आहे.

  • जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. काही दिवसांपूर्वी जेटची मुंबई-नाशिक विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतू आता आपली सेवा पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतू बँकांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने आज रात्री 12 नंतर जेटची विमानसेवा बंद होणार आहे. आज रात्री 10.30 वाजता जेट एअरवेजचं शेवटचं विमान उडणार आहे.

  • जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  • १९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

  • १९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

  • १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

  • १९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.

  • १९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.

  • २००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.

जन्म

  • १४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.

  • १८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२)

  • १८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९१३)

  • १८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७३)

  • १८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)

  • १९१६: श्रीलंकेच्या ६ व्या आणि जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओबंदरनायके यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०००)

  • १९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदूयांचा जन्म.

  • १९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.

  • १९७२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म.

  • १९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म.

मृत्यू

  • १७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी१७०६)

  • १८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८१०)

  • १९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर१८६९)

  • १९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)

  • १९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१६)

  • १९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.

  • २००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर१९२५)

  • २००४: कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९७२)

  • २०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९२६)

  • २०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: १७ जुन १ ९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.