चालू घडामोडी - १८ मे २०१८

Date : 18 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पेट्रोल-डिझेल आणखी चार रुपयांनी महागणार :
  • नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. जर सरकारी कंपन्यांना कर्नाटक निवडणुकीपूर्वीच्या मार्जिन स्थितीत पोहोचायचं असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर चार रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.

  • कर्नाटक निवडणुकीमुळे मागील तीन आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे एकूण मार्जिनमध्ये मोठं अंतर निर्माण झालं होतं. हाच तोटा भरुन काढण्यासाठी ही वाढ केली जाऊ शकते.

  • कर्नाटकमध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड (BPCL) या सरकारी तेल कंपन्यांनी 19 दिवासांनंतर सोमवारी पुन्हा दररोज दर बदलण्याच्या आधारावर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून पेट्रोल 69 पैसे प्रति लिटर महाग झालं आहे, त्यामध्ये शुक्रवारी झालेली 22 पैशांच्या वाढीचाही समावेश आहे.

  • ऑईल मार्केटिंग कंपन्यांना येत्या आठवड्यात पेट्रोलच्या किरकोळ किमतीत प्रति लिटर साडेतीन ते चार रुपये आणि डिझेलच्या दरात चार ते साडेचार रुपयांची वाढ करण्याची गरज आहे. तेव्हाच त्या 2.7 रुपये प्रति लिटरची ग्रॉस मार्केटिंग मार्जिन मिळवू शकतील, असा दावा कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या एका अहवालात करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पाच नवी पासपोर्ट कार्यालयं :
  • मुंबई : महाराष्ट्रात आणखी पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालायं सुरु केली जाणार आहेत. यामध्ये चंद्रपूर आणि बारामतीचाही समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत माहिती दिली.

  • कुठे नव्याने पासपोर्ट कार्यालय उघडणार - अकोला, अमरावती, चंद्रपूर, बारामती, माढा

  • देशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु केली जात आहेत.

येडियुरप्पांचं काय होणार - सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार :
  • नवी दिल्लीकर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

  • काँग्रेस आणि जेडीएसनं येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. बुधवारी मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत ऐतिहासिक सुनावणीनंतर, कोर्टाने येडियुरप्पा यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला होता.

  • मात्र त्याचवेळी सर्वोच्च न्यायालायाने भाजपला समर्थक आमदारांची यादी जाहीर करण्यास सांगितलं आहे. त्याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • येडियुरप्पा यांनी गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपनं सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा दावा केला आहे. त्यासाठी भाजपला 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

  • दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसनं येडियुरप्पांच्या शपथविधी होण्यावर स्थगिती आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती त्यावर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी करणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे.

  • न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नाही- रघुराम राजन :
  • लंडन- भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे पद पुढील वर्षी रिक्त होणार आहे. कॅनडाच्या मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मार्क कार्ने जून 2019मध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या सर्वोच्च पदावरुन पायउतार होतील, त्यानंतर रघुराम राजन यांना हे पद मिळू शकते अशी चर्चा केली जात होती. मात्र राजन यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला.

  • शिकागो विद्यापिठात माझी नोकरी उत्तम सुरु असून मी येथेच आनंदी आहे, असे राजन यांनी लंडनमधील कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

  • मला जे सांगायचं आहे ते मी सांगितलं आहे, मी कोणत्याही दुसऱ्या नोकरीसाठी कोठेही आजिबात जाण्याच्या प्रयत्नात नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी आपला मनोदय व्यक्त केलाय

  • इंग्लंडचे अर्थमंत्री फिलिप हॅमंड या वर्षअखेरीपर्यंत नव्या गव्हर्नरचे नाव घोषित करतील. मागच्या महिन्यामध्ये वॉशिंग्टनमध्ये त्यांनी परदेशी व्यक्तीचा या पदासाठी विचार होऊ शकतो असे सांगितले होते. रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्ततज्ज्ञ असून त्यांनी 2007-08 या काळात झालेल्या जागतिक मंदीबाबत पूर्वसूचना दिलेली होती. भारताच्या रिझर्व्ह बँक या मध्यवर्ती बँकेची सूत्रेही त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.

दिल्ली होणार लोकसंख्येची राजधानी :
  • संयुक्त राष्ट्रे : जगातील एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोक २०५० सालापर्यंत शहरवासी झालेले असतील. हे दृश्य भारत, चीन, नायजेरिया या देशांत प्रकर्षाने पाहायला मिळेल. जपानमधील टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून तिथे ३.७ कोटी लोक राहातात. मात्र २०२८ पर्यंत सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली टोकियोला मागे टाकेल, असे संयुक्त राष्ट्रांनी अहवालात म्हटले आहे.

  • संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक घडामोडीविषयक विभागाच्या लोकसंख्याविषयक गटाने हा अहवाल तयार केला. परंतु नंतर २०५० पर्यंत लोक शहरांकडे मोठ्या प्रमाणावर वळतील. चीन हा जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. मात्र चीनला भारतही मागे टाकण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

  • लोकसंख्याविषयक गटाचे संचालक जॉन विल्मथ यांनी सांगितले की, जेव्हा शहरीकरणाचा वेग वाढतो, त्या वेळी त्या ठिकाणच्या लोकांना घरे, पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, आरोग्य तसेच स्वच्छताविषयक सोयीसुविधा पुरविणे हे एक आव्हानच असते. सध्या जगातील ५५ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. मात्र २०५० पर्यंत हे प्रमाण ६८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

  • या शहरीकरणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांना आरोग्य व शिक्षणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध होतील. अनेक देशांत शहरीकरणाचा झपाटा मोठा आहे.

मोदी पुतीन यांना भेटणार :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ मे रोजी रशियाच्या सोची शहरात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत. ही चर्चा अनौपचारिक असणार आहे आणि या वेळी मोदी यांच्यासाठी ‘गार्ड आॅफ आॅनर’असणार नाही. तसेच, कोणत्याही दस्तऐवजावर हस्ताक्षर होणार नाहीत. या चर्चेचा कोणताही अजेंडा असणार नाही. दोन्ही नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय विषयांपासून देशांतर्गत राजकारणावर चर्चा होईल.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच चीनमध्ये राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशाी अनौपचारिक चर्चा केली होती. त्याचप्रमाणे ही दुसरी अनौपचारिक चर्चा आहे. असे समजले जात आहे की, मोदी यांच्या विदेशनीतीचा हा नवा अध्याय आहे. या माध्यमातून ते जगातील नेत्यांसोबत राजकीय नात्याला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • सूत्रांनी सांगितले की, ही चर्चा अनौपचारिक असली तरी, या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही देशात उर्जा क्षेत्रात संयुक्त उपक्रम उभारण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही रशियासोबत उर्जा क्षेत्रात एकत्र काम करु इच्छितो. आम्ही संयुक्त कंपनी बनविण्याबाबतही काम करु इच्छितो. केवळ भारत, रशियात नव्हे, तर अन्य देशात मिळून काम करणे शक्य होईल. याशिवाय अणुउर्जा क्षेत्रात रशियासोबत भागीदारीसाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अध्यक्ष पुतीन यांना भेटतील तेव्हा या विषयावर चर्चा होईल.

  • या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान बहुप्रतीक्षित गॅस पाइपलाइनवर चर्चा होऊ शकते काय? असा प्रश्न केला असता या अधिकाºयाने सांगितले की, हा मुद्दा दोन्ही देशात औपचारिक स्वरुपात होणाºया बैठकीत येईल. ही बैठक यावर्षी दुसºया सहामाहीत होऊ शकते.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

महत्वाच्या घटना 

  • १८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.

  • १९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.

  • १९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.

  • १९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.

  • १९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.

  • १९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.

  • १९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.

  • १९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.

  • १९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.

  • २००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.

जन्म 

  • १०४८: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)

  • १६८२:  छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)

  • १८७२: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)

  • १९१३: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९९८)

  • १९२०: पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००५)

  • १९३३: भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.

  • १९७९: माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.

मृत्य 

  • १८०८: बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.

  • १८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)

  • १९६६: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)

  • १९९७: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९०१)

  • १९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.

  • २००९: एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे  संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)

  • २०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.

  • २०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.