चालू घडामोडी - १८ नोव्हेंबर २०१७

Date : 18 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केवळ पुस्तकी ज्ञान नको, शिक्षण क्षेत्रात भारताला मोठा पल्ला गाठायचा आहे: बिल गेट्स 
  • मुंबई : मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

  • भारतातील शिक्षण क्षेत्रावर सावध टीका करताना बिल गेट्स म्हणाले, भारताविषयीचे माझे मत तसे सकारात्मक असले तरी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत मात्र मी फार निराश आहे. ही शिक्षण व्यवस्था अधिक चांगली असायला पाहिजे. मला त्यावर टीका करायची नाही. परंतु मला त्याबाबत ब-याच चांगल्या अपेक्षा आहेत.’

  • तथापि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या संदर्भात आपल्या तूर्तास कोणत्याही योजना नाहीत, असे गेट्स यांनी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्राकडून शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याकडे वळणार काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ‘आपण सर्वच काही करू शकत नाही.

  • भारतातील बहुतांश समाजसेवकांनी शिक्षण क्षेत्र निवडले आहे आणि त्याचा मला आनंद आहे,’ असे ते म्हणाले. केवळ पुस्तकी ज्ञान बाळगण्याची प्रवृत्ती चांगली नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘मागील दोन दशकात भारताने मोठी भरारी घेतली आहे. 

रेवदंड्याच्या सिनेगॉगला १७५ वर्षे पूर्ण :
  • मुंबई - इस्रायलमधून आलेल्या ज्यूं बांधवांच्या नौका कोकणात नौगावला लागल्या आणि भारत व ज्यू यांचं एक नवं नातं निर्माण झालं. तिकडे कोचीनलाही काही ज्यू नौकेतून येऊन थडकले. कोकणातल्या ज्यूं ना इथल्या लोकांनी आपलंसं केलं त्यांना ते बेने इस्रायली म्हणजे इस्रायलची लेकरे असं म्हणू लागले. 

  • मुंबई, ठाणे, पुणे, अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग यामध्ये बेने इस्रायली समुदाय आजही राहतो. या सर्व गावांमध्ये त्यांनी प्रार्थनास्थळे बांधली होती. रायगड जिल्ह्यातले जुने असे एक सिनेगॉग म्हणजे रेवदंडा गावातील सिनेगॉग. त्याला यावर्षी १७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

  • रेवदंड्याचे हे सिनेगॉग १८४२ साली बांधायला घेतले. त्याचे काम सहा वर्षे चालले आणि त्याचा वापर प्रार्थनेसाठी सुरु झाला. प्रत्येक सिनेगॉगला नाव असते त्याप्रमाणे या सिनेगॉगलाही नाव देण्यात आले आहे.

  • इस्रायली बांधव याला 'बेथ एल' म्हणजे देवाचे घर म्हणून ओळखतात. १८७६ साली त्याची पहिली दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. सोलोमन शालेम शूराबी हे त्याचे पहिले हजान म्हणजे प्रार्थना सांगणारे, ग्रंथ वाचणारे एक प्रसिद्ध गृहस्थ होते. (source :lokmat)

'राम रहीमविरोधात साक्ष देण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर केला हल्ला; अपहरणाचाही प्रयत्न' :
  • चंदिगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा माजी ड्रायव्हर खट्टा सिंह आपल्यावर राम रहीमविरोधात खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

  • आपल्या अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे. हा आरोप अशावेळी करण्यात आला आहे जेव्हा, खट्टा सिंहने पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंहच्या हत्येसाठी गुरमीत राम रहीमला जबाबदार धरत याचिका दाखल केली आहे. 

  • खट्टा सिंहची भाची असल्याचा दावा करणा-या सुमिंदर कौरने आरोप केला आहे की, राम रहीमविरोधात खोटी साक्ष देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात आहे. 'खट्ट सिंह डे-याची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • त्यांनी मलादेखील सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी नकार दिला तेव्हा मला धमकावण्यात आलं, माझ्यावर हल्ला झाला. त्यांनी माझ्या अपहरणाचाही प्रयत्न केला', असा आरोप सुमिंदर कौरने केला आहे. (source :lokmat)

चीनमधून अमेरिकेला अवघ्या 14 मिनिटांमध्ये पोहचणार "हे"विमान :
  • चीन अशा एका विमानाची निर्मिती करत आहे. हे विमान अणवस्त्रे घेऊन अवघ्या 14 मिनिटांमध्ये अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहचू शकेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या विमानाचा वेग 27 हजार मैल प्रती तास म्हणजेच 43 हजार 200 किलोमीटर प्रती तास (12 किलोमीटर प्रती सेकंद) इतका असणार आहे.

  • तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार 2020 पर्यंत जगातील सर्वात वेगवान हायपरसुपरसॉनिक फॅसिलटी (चीनमधील विंड टनल) ची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर या विमानाची चाचणी घेण्यात येईल. म्हणजेच या हायपरसॉनिक वेगाने उड्डाण करणाऱ्या विमानाचा वेग आवाजाच्या वेगाहून 35 पट अधिक असणार आहे.

  • आजच्या तारखेला जगातील सर्वात वेगवान विंड टन न्यूयॉर्कमधील एलईएनएक्स-एक्स ही आहे. याचा वेग 22 हजार मैल प्रती तास म्हणजेच 36 हजार किलोमीटर प्रती तास इतका आहे.

  • हायपरसॉनिक विमाने बनवण्यासाठी विंड टनल्सचा उपयोग केला जातो. या टनल्समध्ये आवाजच्या वेगाहून पाचपट अधिक वेगाने वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात.

व्ही. शांताराम यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त गुगलचं अनोखं डूडल :
  • मुंबई - भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नावं म्हणजे चित्रपती शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम. आज त्यांची 116 वी जयंती आहे. सर्च इंजिन गुगलने यानिमित्त खास डूडल तयार केलं असून व्ही शांताराम यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

  • व्ही शांताराम यांना शांताराम बापू या नावानं ओळखलं जायचं. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या.

  • जवळजवळ सहा दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. शांताराम बापूंचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ साली कोल्हापुरात झाला होता. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या `महाराष्ट्र फिल्म कंपनी'पासून.

  • कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्या `सुरेखा हरण' या मूकपटात छोटीशी भूमिका केली. येथून त्यांची घोडदौड सुरू झाली. चित्रपट निर्मितीचं मर्म आत्मसात करीत ते भराभर पुढे जात राहिले.

  • १९२५ साली निर्माण झालेल्या `सावकारी पाश' या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकर्‍याची भूमिका केली आणि १९२७ साली त्यांनी `नेताजी पालकर' हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला. (source :lokmat)

मार्चमध्ये रंगणार महाराष्ट्र कुस्ती लीग :
  • राष्ट्रीय स्तरावर कुस्ती लीग झाल्यावर आता राज्य स्तरावरही याचा आनंद कुस्तीशौकिनांना उपभोगता येणार आहे. महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन्स लीग मार्च महिन्यामध्ये होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या लीगला हिरवा कंदील दाखवला आहे. स्थानिक, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहून या स्पर्धेच्या तारखा ठरवण्यात येणार आहेत.

  • ‘‘लिलावासाठी आतापर्यंत जवळपास १२०० कुस्तीपटूंची यादी तयार करण्यात आली आहे. या १२०० कुस्तीपटूंमधून ५०० खेळाडूंना निवडण्यात येईल आणि या खेळाडूंना लिलावाद्वारे मालक आपली संघबांधणी करतील.

  • महाराष्ट्रामध्ये पुण्यातील बालेवाडीमध्ये सर्व लीगचे सामने खेळवण्यात येणार आहेत,’’ असे महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन्स लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कराज केळकर यांनी सांगितले.

  • ते पुढे म्हणाले, ‘‘आताच्या घडीला काही असे कुस्तीपटू आहेत की ज्यांनी चांगली कामगिरी करूनही त्यांना ओळख मिळालेली नाही. काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके पटकावली आहेत, पण ‘महाराष्ट्र केसरी’पुढे त्यांना नावलौकिक मिळत नाही. या उपेक्षित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, यासाठी या लीगची स्थापना करण्यात आली आहे.’’ (source :loksatta)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

  • १९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.

  • १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

  • १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

  • १९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

  • २०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

  • २०१५: भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

  • २०१५: भारतीय शटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

  • २०१५: भारतीय महिला दुहेरी शटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.

  • २०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.

जन्म

  • १८९८: भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म.

  • १९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)

  • १९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)

  • १९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जून १९७६)

  • १९३१: हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य श्रीकांत वर्मा यांचा जन्म.

  • १९४५: श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.

मृत्यु

  • १८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)

  • १९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)

  • १९९३: लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.

  • १९९६: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

  • १९९८: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर१९३६)

  • १९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

  • २००६: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९१७)

  • २०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९२९)

  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.