चालू घडामोडी - १८ नोव्हेंबर २०१८

Date : 18 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय महिलांचा सलग चौथा विजय :
  • गयाना: हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी धुव्वा उडवला. भारतीय महिलांचा हा ब गटातला सलग चौथा विजय ठरला. भारतानं चारही साखळी सामने जिंकून ब गटात अव्वल स्थान राखलं.

  • भारतीय महिलांनी अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६८ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताच्या फिरकी चौकडीनं ऑस्ट्रेलियाला विसाव्या षटकांत नऊ बाद ११९ असं रोखलं.

  • भारताकडून कोल्हापूरच्या अनुजा पाटीलनं १५ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. दीप्ती शर्मा, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंडपैकी एका संघाशी होईल.

  • त्याआधी, या सामन्यात भारतानं वीस षटकांत आठ बाद १६७ धावांची मजल मारली. सलामीची स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेली ६८ धावांची भागीदारी मोलाची ठरली. त्यात हरमनप्रीतचा वाटा २७ चेंडूंत ४३ धावांचा होता. तिनं तीन चौकार आणि तीन षटकारांनी ही खेळी सजवली. महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं दुसरी खिंड लढवली. तिनं ५५ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ८३ धावांची खेळी उभारली.

भारतातला सर्वात मोठा रोप वे मुंबईत तयार होणार :
  • मुंबई : भारतातला सर्वात मोठा रोप वे मुंबईत बांधला जाणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने त्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटादरम्यान रोप वे सेवा सुरु करणार आहे. या प्रकल्पासाठी पोर्ट ट्रस्ट जागतिक निविदा मागवणार आहे.

  • आज नितीन गडकरींच्या हस्ते वॉटर फ्रंटवर अनेक कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. त्यामध्ये विविध प्रकल्पांसाठीच्या निविदा कामाला सुरुवात करण्यात आली.

  • मुंबई ते घारापुरी येथील एलिफंटा बेटापर्यंतचे 8 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी केवळ 14 मिनिटे लागतील. सध्या हेच अंतर बोटीने पार करण्यासाठी एक तास लागतो. हा भारतातील पहिला समुद्रातील रोप वे आहे.

  • केंद्र सरकारच्या स्थायी वित्त समितीने या रोप वेला परवानगी दिलेली आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत या रोप वेचे संपूर्ण काम होऊन ही सेवा सुरु होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

झकरबर्ग यांनी पायउतार होण्याची मागणी :
  • टीकाकारांना गप्प करण्यासाठी फेसबुकने एका जनसंपर्क आस्थापनेला काम दिल्याच्या बातम्या आल्यामुळे कंपनीचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी कंपनीच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

  • दी न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार फेसबुकने त्यांच्यावरील टीकाकारांना वेगवेगळ्या मार्गाने गप्प करण्याचा प्रयत्न करतानाच त्यांचा संबंध अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न के ला. त्याचबरोबर जनक्षोभाची लाट इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांवर उलटवण्याचा प्रयत्नही केला. फेसबुकने त्यांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी डिफायनर्स पब्लिक रिलेशन्स या आस्थापनेला कंत्राट दिले होते. 

  • २०१६ च्या अमेरिकी निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप तसेच केंब्रिज अ‍ॅनॅलिटिकामुळे अडचणीत आल्यानंतर फेसबुकने जनसंपर्क आस्थापनेची मदत घेतली. अमेरिकी गुंतवणूकदार कंपनी ट्रिलियम अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष जोनास क्रॉन यांची फेसबुकमध्ये ८.५ दशलक्ष पौंडाची गुंतवणूक असून काल रात्री त्यांनी झकरबर्ग यांना पायउतार होण्यास सांगितले. झकरबर्ग यांनी कंपनीच्या मंडळाचे अध्यक्षपद सोडावे अशी त्यांची मागणी आहे. फेसबुक ही कंपनी आहे त्यामुळे तिचे अध्यक्षपद व मुख्य कार्यकारीपद यावर वेगळ्या व्यक्ती असल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

  • फेसबुक दबावगट कंपन्यांची मदत घेत असून या सगळ्याचा आढावा घेण्याचा आदेश फेसबुकचे धोरण प्रमुख सर निक क्लेग यांना देण्यात आला आहे. त्यांची नियुक्ती गेल्या महिन्यात झाली आहे. डिफायनर्स या जनसंपर्क कंपनीने फेसबुकच्या टीकाकारांना व प्रतिस्पर्धी कंपन्यांना लक्ष्य केले होते. फेसबुक विरोधी गट हे गुंतवणूकदार सोरो यांच्याशी संबंधित आहेत अशा बातम्याही पत्रकारांच्या मार्फत देण्यात आल्या होत्या. जनसंपर्क आस्थापनेची मदत घेतल्याच्या आरोपाचा झकरबर्ग यांनी इन्कार केला असून हे समजताच आमच्या सहकाऱ्यांशी बोलून या आस्थापनेशी संबंध तोडले आहेत असे त्यांनी सांगितले.

मालदीवमध्ये सोली पर्वाची सुरुवात, शपथविधी सोहळ्याला मोदीही उपस्थित :
  • मालदीवमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या इब्राहिम मोहमद सोली यांनी शनिवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर मोदींनी ट्विटरवरुन इब्राहिम मोहमद सोली यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • ‘दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करायचे आहे’, असे मोदींनी म्हटले आहे.

  • सप्टेंबरमध्ये मालदीवमध्ये अध्यक्षीयपदासाठी निवडणूक झाली होती. २३ सप्टेंबरला झालेल्या निवडणुकीत सोली यांना एकूण मतांपैकी ५८.४ टक्के मते मिळाली होती. सोली यांच्याकडून पराभूत झालेले यामीन अब्दुल गयूम हे चीनच्या जवळचे असलेले नेते म्हणून ओळखले जायचे.

  • २०१३ साली निवडून आल्यानंतर यामीन यांनी त्यांच्याविरुद्धचे राजकीय मतभेद दडपून टाकताना त्यांचे विरोधक आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना तुरुंगात डांबले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत यामीन अब्दुल गयूम यांचा सोली यांनी पराभव केला. सोली हे भारताचे मित्र मानले जातात.

१९७१ च्या युद्धाचे ‘हिरो’ ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचं निधन :
  • भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धातील विजयाचे शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचं आज निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. महावीरचक्राने सन्मानित करण्यात आलेल्या कुलदीप सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी ८.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कुलदीप सिंग यांचा दुसरा मुलगा जर्मनीहून परतल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती हरदीप सिंग चंदपुरी यांनी दिली आहे.

  • ५ आणि ६ डिसेंबर १९७१ रोजी राजस्थान येथील लोगेंवाला सीमेवर पाकिस्तानकडून मध्यरात्री हल्ला करण्यात आला होता. यावेळी पंजाब तुकडीचे नेतृत्व कुलदीप सिंग यांनी केलं होतं. या युद्धात भारताच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले. त्यांच्या योगदानामुळे महावीरचक्राने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

  • ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४० ला गुर्जर शीख कुटुंबात झाला होता. भारतातल्या पंजाबमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्याला होतं. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबीय बालाचौरमधल्या चांदपूरमध्ये वास्तव्याला गेले. १९६२ मध्ये त्यांनी होशियारपूरमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केली होती. त्यानंतर ते भारतीय लष्करात सामील झाले.

७२ टक्के गुण मिळवा, स्कूटी मिळवा : मध्यप्रदेशात भाजपचे घोषणापत्र जाहीर :
  • भोपाळ : मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूक होण्याआधी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. आज मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने घोषणापत्र जाहीर केले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे घोषणापत्र जाहीर केले आहे. भाजपने या घोषणापत्राला 'दृष्टीपत्र' असे नाव दिले आहे.

  • या घोषणापत्रात महिलांपसून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना आश्वासने देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांबद्दलचे तपशीलदेखील दिले आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा याबद्दलही मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला आहे. यावेळी शिवराज सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रभात झा उपस्थित होते. भाजपने घोषणापत्रात महिला आणि शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिल्याचा दावा केला आहे.

  • घोषणापत्रात केलेल्या भाजपच्या घोषणा गरीब नागरिकांसाठी पक्की घरं, स्वस्त वीज आणि मुलांचा शिक्षणासाठीची व्यवस्था करणार शेतकऱ्यांच्या विकासासाठी 32 हजार 701 कोटी रूपये देण्यात आले आहेत.

  • शहरांना स्मार्ट सिटी तर ग्रामीण भागात स्मार्ट गावं बनवणार असल्याचा संकल्प किमान एक हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये चांगले पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र पत्र तयार करण्यात आले आहे, स्व-मदत गटासाठी निधी तयार केला जाईल असा उल्लेख या संकल्प पत्रात करण्यात आला आहे

  • शाळेत मुलींना 75 टक्के गुण मिळाल्यानंतर स्कूटी देण्यात येणार उच्च शिक्षणासाठी गरीब मुलांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणर नाही युवकांसाठी 10 हजार लाख रोजगारांची निर्मिती करणार आयटी, रिअल इस्टेट आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवणार.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.

  • १९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

  • १९१८: लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

  • १९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.

  • १९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.

  • १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

  • १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

  • १९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

  • २०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

  • २०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

  • २०१५: भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

  • २०१५: भारतीय शटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

  • २०१५: भारतीय महिला दुहेरी शटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.

  • २०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.

जन्म 

  • १८९८: भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म.

  • १९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)

  • १९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)

  • १९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जून १९७६)

  • १९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९६५)

  • १९३१: हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य श्रीकांत वर्मा यांचा जन्म.

  • १९४५: श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७७२: मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)

  • १९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)

  • १९६२: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८८५)

  • १९९३: लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.

  • १९९६: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

  • १९९८: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६)

  • १९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

  • १९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.

  • २००१: नाडेप कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका यांचे निधन.

  • २००६: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल१९१७)

  • २०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.