चालू घडामोडी - १९ ऑगस्ट २०१७

Date : 19 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
५० रुपयांच्या नवीन नोटा येणार चलनात : 
  • ५० रुपये नोटेची प्रिंटिंग आणि डिझाइन ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांप्रमाणेच आहे, या नोटांच्या मागील बाजूस दक्षिणेकडील प्रसिद्ध हंपी दगडी रथाची प्रतिकृती आहे

  • नोटाबंदीनंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नवीन नोटा आल्या तशाच प्रकारची ५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार आहे.

  • नवी नोट चलनात आल्यानंतरही जुनी ५० ची नोट चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. हिरवट-निळ्या रंगाच्या या नव्या नोटेवर हम्पी येथील दगडी रथाची प्रतिकृती असेल.

  • दगडी रथाची प्रतिकृती या नोटेवर २०१६ हे छपाई वर्ष असेल, अशा नोटांच्या बंडलांचे फोटो सध्या व्हायरलही झाले असून, ते रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ‘नमुना’ नोटेसारखेच आहेत.

भारताकडून व्हिएतनाम ब्राह्मोस क्षेपणास्त्र चीनच्या विरोधात :
  • भारत आणि चीनमधील तणाव वाढला असताना भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे. त्यामुळे आता चीनचा आणखी जळफळाट होण्याची शक्यता आहे.

  • चीन आणि व्हिएतनाममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे, भारत आणि चीनमध्ये सिक्किम सीमेवरील डोक्लाम भागात महिन्याभरापासून जोरदार तणातणी सुरु असून त्यातच आता भारताने व्हिएतनामला मदत केल्याने चीन आणखी आक्रमक होऊ शकतो.

  • मात्र भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हिएतनामसोबत असा काही व्यवहार झाला का, यावर भारताकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

  • दक्षिणी चिनी समुद्रात हे दोन देश वारंवार एकमेकांसमोर आले आहेत, त्यामुळेच व्हिएतनामकडून भारताला करण्यात आलेल्या मदतीमुळे चीन अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.

  • ब्राह्मोस क्षेपणास्त्र जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे, व्हिएतनामकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र चीनच्या विरोधात समुद्री सीमेवर तैनात केले जाऊ शकते.

निकालाची डेडलाइन देण्यास विनोद तावडे यांचा नकार :
  • मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत तावडे म्हणाले की, लवकरात लवकर सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील.

  • मुंबई विद्यापीठाच्या रेंगाळलेल्या निकालासमोर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे हतबल झाल्याचे चित्र आहे, विद्यापीठाचे सर्व निकाल कधीपर्यंत घोषित होतील, त्यासाठी डेडलाइन काय असेल, याचे उत्तर देण्यास तावडे यांनी शुक्रवारी स्पष्ट नकार दिला. 

  • मात्र, त्यासाठी कोणतीही डेडलाइन देण्यात आलेली नाही. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी वेगळी रचना तयार करण्यात येईल.

  • पुनर्मूल्यांकनाचे शुल्क सध्या ५० टक्के कमी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागतील, याला प्राधान्य देण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.

  • एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल उशिरा लागला, पण तो विद्यार्थी जर मेरिटमध्ये असेल, तर त्याला प्रवेश दिला जाईल, ज्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत, तेवढेच निकाल जाहीर करता येतील का, याबाबत परीक्षा मंडळाला सुचविण्यात येईल.

  • बहुतांश परीक्षांचे ९६ टक्के मूल्यांकन पूर्ण झाले असून, ४ टक्के मूल्यांकन शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून प्रदूषणकारी कंपनी बंद करण्याचा आदेश : एमपीसीबी
  • एमआयडीसीतील प्रदूषणामुळे श्‍वान, तसेच चिमण्यांचे रंगही निळे झाल्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यामुळे अखेर 'एमपीसीबी'ला ही कारवाई करावी लागली.

  • कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान-चिमण्यांसारख्या मुक्‍या प्राण्यांवरही विपरीत परिणाम होण्यास कारणीभूत ठरणारी तळोजा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) डुकॉल ऑर्गेनिक्‍स ऍण्ड कलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिला.

  • २४ तासांत या कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश एमपीसीबीने दिले आहेत, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे.

  • आशिया खंडातील सर्वांत मोठी तळोजा औद्योगिक वसाहत प्रदूषणामुळे पोखरून निघाली आहे, या प्रदूषणाचा फटका मानवाबरोबरच मुक्‍या जिवांनाही बसत असल्याचे वर्तमानपत्राने उघड केले होते.

  • आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याची दखल घेतली होती, या पार्श्‍वभूमीवर 'एमपीसीबी'चे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी परिसराचा दौरा केला, पाहणीदरम्यान वृत्तात तथ्य आढळून आल्यानंतर मोहेकर यांनी कंपनी बंद करण्याचा आदेश दिला.

डोकलाम प्रकरणी चीनविरोधात भारताला जपानची साथ :
  • वादग्रस्त क्षेत्रात पूर्वीची स्थिती (स्टेटस को) बदलण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत जपानने चीनला ठणकावले असून डोकलाम प्रश्नी चीनबरोबर सुरू असलेल्या वादात जपानने भारताला पाठिंबा दिला आहे.

  • सिक्किम-तिबेट-भूतान परिसरात असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ता निर्मितीचा प्रयत्न केला होता. हा परिसर भूतानचा आहे.

  • सामारिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिसर असल्यामुळे भारताने चिनी सैन्याला रस्ता बनवण्यापासून रोखले हेाते, त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य आमने-सामने उभे आहेत.

  • जपानच्या भूमिकेमुळे भारताला नैतिक समर्थन मिळाले आहे, चीनने रस्त्याचे काम सुरू करून भूतानबरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप भारताने केला आहे.

नारायण राणेंचा भाजप प्रवेश २७ ऑगस्टला
  • २७ ऑगस्टला अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाती आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

  • गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे, मात्र, ही अटकळ आता लवकरच खरी ठरणार असल्याची शक्यता ‘माझा’च्या सूत्रांकडून समजते आहे.

  • काँग्रेसी वातावरणाला कंटाळलेल्या आणि नितेश तसंच निलेश राणेंच्या राजकीय भवितव्याची तरतूद म्हणून राणेंसाठी भाजप हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं सध्या बोललं जात आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक छायाचित्र दिन

जन्म, वाढदिवस

  • डॉ. सुधा नारायण मुर्ती, ज्येष्ठ समाजसेविका व लेखिका : १९ ऑगस्ट १९५०

  • डॉ. शंकर द्याळ शर्मा, भारताचे माजी राष्ट्रपती : १९ ऑगस्ट १९१८

  • गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक : १९ ऑगस्ट १९०३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • उत्पल दत्त, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते : १९ ऑगस्ट १९९३

  • मास्टर विनायक, ख्यातनाम मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते : १९ ऑगस्ट १९४७

ठळक घटना

  • अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य : १९ ऑगस्ट १९१९

  • सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले : १९ ऑगस्ट १९९१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.