चालू घडामोडी - १९ डिसेंबर २०१७

Date : 19 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला यंदा 'महिंद्रा थार' जीप :
  • मुंबई/पुणे : महाराष्ट्र केसरी हा प्रतिष्ठेचा किताब पटकावणाऱ्या पैलवानाला यंदा बक्षीस म्हणून जीपही मिळणार आहे. मानाच्या चांदीच्या गदेसोबतच महिंद्र अँड महिंद्र कंपनीची थार ही जीप देऊन गौरवण्यात येईल.

  • महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात विजेत्या पैलवानाला चारचाकी वाहन देण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. याआधी 2013 साली तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी विजेता ठरलेल्या नरसिंग यादवचा स्कॉर्पियो देऊन गौरव करण्यात आला होता.

  • यंदा 20 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र केसरीच्या लढतीत उपविजेत्या ठरणाऱ्या पैलवानाला बुलेट देण्यात येणार आहे.

  • भारताचा ऑलिम्पियन पैलवान नरसिंग यादवनं 2011, 2012 आणि 2013 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. चाळीसगावचा विजय चौधरी गेली तीन वर्षे सातत्यानं महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावत आहे. पण सध्या डीवायएसपीच्या ट्रेनिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तो यंदा महाराष्ट्र केसरीत खेळू शकणार नाही.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बनले सॅन्ताक्लॉज :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्या साध्या स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. पण डोक्यावर सांताक्लॉजची टोपी आणि खांद्यावर भेटवस्तूंचं गाठोडं घेऊन ओबामा वॉशिंग्टनच्या एका कार्यक्रमात पोहोचले. आणि लहान मुला-मुलींना अनेक भेट वस्तू दिल्या.

  • वॉशिंग्टनमधील लहान मुलांसोबत त्यांनी जवळपास अर्धा तास धमाल केली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

  • या भेटीमुळे लहान मुलं चांगलीच खूश झाली. त्यानंतर थोड्याच वेळात सांतक्लॉजच्या रुपातला बराक ओबामांचा व्हिडीओही ट्विटरवर पोस्ट करण्यात आला.

  • ओबामा यांनीही लहान मुलांसोबतचा फोटो रिट्विट करत आपण हे क्षण खूप आनंदाने साजरे केले असे म्हटलं आहे. दरम्यान, ओबामांच्या या हटके प्रयोगाचं नेटकऱ्यांनीही स्वागत केले आहे. सॅन्ताक्लॉजच्या वेशातील त्यांचा फोटो लाखो यूजर्सनी रिट्वीट केला आहे.

व्हिसा मुलाखतीची वेळ लवकरात लवकर मिळवता येते का? 
  • प्रश्न - माझा अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचा विचार आहे. मला नुकताच आय-20 हा स्वीकृतीचा दाखला मिळाला असून तो सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी आहे. परंतु, लवकरात लवकरची स्टुडंट व्हिसा मुलाखतीची वेळ 20 जानेवारी आहे. मला मुलाखतीसाठी 20 जानेवारी पर्यंत थांबावं लागेल का?

  • उत्तर - नाही, तुम्हाला त्यासाठी थांबायची गरज नाही. तुम्ही मुलाखत लवकर घ्यावी यासाठी अर्ज करू शकता. आम्हाला कल्पना आहे की शिक्षणसंस्थेमध्ये उशीरा जाणं त्रासदायक आहे. जर तुमचा अमेरिकेतील अभ्यासक्रम 60 दिवसात सुरू होणार असेल तर, मुलाखत लवकर घ्यावी यासाठी केलेला अर्ज आम्ही विचारात घेऊ.

  • ही प्रक्रिया सोपी आहे. आधी व्हिसाची फी भरा आणि ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करा. नंतर लवकरात लवकर कधी व्हिसा मुलाखतीची वेळ मिळतेय ती घ्या. सरतेसेवटी, वेबसाईटवर जा आणि मुलाखत लवकर घ्यावी यासाठी अर्ज करा. तुमची विनंती मान्य झाली तर तुम्हाला तसा मेल पाठवण्यात येईल. मग तुम्ही लवकर कुठल्या तारखेला व्हिसा मुलाखतीची वेळ मिळतेय हे ऑनलाइन बघू शकता आणि वेळ ठरवू शकता.

  • ज्यावेळी तुम्ही मुलाखतीसाठी कॉन्सुलेटमध्ये याल, त्यावेळी अपॉइंटमेंट लेचरची प्रिंट आणायला विसरू नका. त्याचबरोबर आय-20 दाखला, व्हिसा अर्ज असलेला फॉर्म आणि सोबत लागणारी कागदपत्रे घेऊन या.

आयसीसी क्रमवारीत रोहित शर्मा पाचव्या स्थानी :
  • आयसीसीची एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत दोन स्थानांनी बढती घेत रोहित पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

  • श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात व्दिशतक झळकावणाऱ्या भारताच्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे.

  • तसेच या क्रमवारीत रोहितने पहिल्यांदाच 800 गुणांचा टप्पा पार केला आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-1 अशी भारताने जिंकली असून रोहितच्या खात्यात 816 गुण आहेत. यापूर्वी रोहितने फेब्रुवारी 2016 मध्ये 825 गुणांची कमाई केली होती.

  • या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली 876 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीव्हिलियर्स 872 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

  • गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 28व्या स्थानावरून 23व्या स्थान गाठले आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने 16 स्थानांची कमाई करत कारकीर्दीतील सर्वोत्तम 56वे स्थान पटकावले आहे.

भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ?
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपा व मित्रपक्षांकडे १९ राज्ये आली आहेत.

  • हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल पराभूत झाल्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आ. जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. गुजरातेत पाटीदार नेते नितीन पटेल यांचा दावा असला, तरी विजय रूपाणी यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद कायम ठेवले जाऊ शकते.

  • गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयामुळे मोदी सरकारला सुधारणा कार्यक्रम सुरू ठेवणे सुलभ होणार आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे आलेल्या अडथळ्यांची ते पर्वा

  • करणार नाहीत, असे दिसते. २०१४ पासून मोदी सरकार आपल्या आर्थिक कार्यक्रमावर ठाम असल्याचे चित्र

  • दिसून आले. हा कामगिरी आणि विकासाचा विजय आहे. देश कामगिरी आणि विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

  • गुजरात : भाजपा, हिमाचल प्रदेश : भाजपा, उत्तराखंड : भाजपा, हरयाणा : भाजपा, राजस्थान : भाजपा, मध्य प्रदेश : भाजपा, छत्तीसगड : भाजपा, झारखंड : भाजपा, आसाम : भाजपा, अरुणाचल : भाजपा, गोवा : भाजपा, उत्तर प्रदेश : भाजपा, मणिपूर : भाजपा, महाराष्ट्र : भाजपा+शिवसेना, जम्मू काश्मीर : पीडीपी+भाजपा, बिहार : जनात दल + भाजपा, कर्नाटक : काँग्रेस, पुद्दुचेरी : काँग्रेस, मिझोरम : काँग्रेस, मेघालय : काँग्रेस, पंजाब : काँग्रेस, दिल्ली : आप, प. बंगाल : तृणमूल, ओडिशा : बिजू जनता दल, तेलंगणा : तेलंगण राष्ट्रीय, आंध्र प्रदेश : तेलगू देसम, तामिळनाडू : अण्णा द्रमुक, केरळ : डावी आघाडी, त्रिपुरा : मार्क्सवादी, नागालँड : नागा पिपल्स, सिक्किम : डेमॉक्रॅटिक फ्रंट.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.

  • १९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

  • १९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

  • १९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.

  • २००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म

  • १९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.

  • १९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

  • १९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

  • १९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.

  • २००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

मृत्यू

  • १८४८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८१८)

  • १८६०: भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८१२)

  • १९१५: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६४)

  • १९२७: क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९७)

  • १९९७: स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र बारलिंगे यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

  • १९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)

  • १९९८: भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे यांचे निधन.

  • २०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.