चालू घडामोडी - १९ डिसेंबर २०१८

Date : 19 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल, २५० रुपयांत उघडा खाते अन् मिळवा ५० लाखांचा फायदा :
  • नवी दिल्लीः मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता केंद्रानं डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली.

  • मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला. केंद्र सरकारनं या योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.5 टक्के केले आहे.

  • 1 ऑक्टोबरपासून नवे व्याजदर लागू झाले असून, आपल्याला या व्याजदरामुळे मोठा फायदा मिळू शकतो. काही दिवसांपूर्वीच सराकरनं या योजनेत बदल केले आहेत. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत आपण फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडू शकतो. ज्यासाठी पहिल्यांदा 1000 रुपये मोजावे लागत होते.

  • आपल्यालाही जर मुलगी असेल तर केंद्राची ही योजना भरपूर फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे सदर खाते भारतात कुठेही एका डाकघरातून दुसऱ्या डाकघरात स्थानांतरित करण्यात येते. या योजनेत पालकाला समाविष्ट होण्यासाठी कुठलीही अट ठेवण्यात आली नाही. 

ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन :
  • कोल्हापूर : ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले होते. नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष होते.

  • जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती, त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता. रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते. रोज सकाळी रंकाळा तलावावर ते नियमित फिरायला येत असत.

  • अलिकडील पाच, सहा वर्षे ते रंकाळा बचाव आंदोलनाचे आघाडीचे कार्यकर्ते बनले होते. प्रकृती ही उत्तम होती. लोकमत संपादक सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते. कालच सायंकाळी त्यांनी या बैठकीला येतो असे सांगितले होते आणि बुधवारची सकाळ ही त्यांच्या निधनाच्या दुःखद बातमीनं उजाडली आहे. 

सरकारच्या ‘लोकराज्य’मध्ये शिवसेनेला दुय्यम स्थान :
  • मुंबई : लोकराज्य या शासनाच्या मुखपत्रातून दुय्यम स्थान मिळत असल्याची शिवसेनेची खदखद होती. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या लोकराज्यमधील जाहिरातीवरुन ही खदखद बाहेर पडली आणि छापलेले अंक बाजूला ठेऊन पुन्हा नव्याने जाहिरात छापलेला अंक बाजारात आणण्यात आला.

  • लोकराज्य अंकातील पहिल्या पानावर ‘होय, प्रगती करतोय महाराष्टÑ माझा’ अशी जाहीरात प्रकाशित करण्यात आली. त्यात कॅबिनेट मंत्र्यांचे फोटो छापण्यात आले. मात्र ते छापत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई यांची छायाचित्रे तब्बल दहाव्या व अकराव्या क्रमांकावर छापण्यात आली. तो अंक हाती पडल्यावर रावते संतप्त झाले.

  • मंत्रीमंडळात आमचे स्थान कोणते, आम्ही कितव्या नंबरवर आहोत, आमच्यापेक्षा ज्युनियर नेत्यांचे फोटो आधी छापता आणि नंतर आमचा नंबर कसा काय लावता, अशी विचारणा करत रावते यांनी माहिती खाते डोक्यावर घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटी छापलेले अंक बाजूला ठेवले गेले व चार नंबरवर रावते यांचा फोटो लावून पुन्हा छापलेले लोकराज्य बाजारात आणले गेले. मात्र या गडबडीत इंग्रजी अंकात ही चूक तशीच राहून गेल्याने पितळ उघडे पडले.

  • नवीन अंक केला वितरित - अंकाच्या काही प्रति छापून त्या मंत्रीमंडळ बैठकीत दाखवल्या होत्या. मात्र, ते पाहून रावते यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांचा क्रम कसा असावा, याविषयीचा शासन आदेश होताच. तो पाहिला गेला नव्हता म्हणून ही चूक झाली. ती लगेच दुरुस्त करुन नवीन अंक वितरित केले गेले, असे या अंकाचे संपादक मंडळ प्रमुख अजय अंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महिलांसाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना :
  • नवी दिल्ली : देशामध्ये महिलांच्या अधिकारावर सगळेच पक्ष बोलत असतात. मात्र, निवडणुकीमध्ये तिकिट देताना महिलांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येते. यामुळे महिलांची संख्या राजकीय क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असते. ही अडचण ओळखून आज दिल्लीमध्ये केवळ महिलांसाठीच एक वेगळा पक्ष स्थापन करण्यात आला. या पक्षाचे नाव राष्‍ट्रीय महिला पार्टी असे आहे. या पक्षाची स्थापना एका 36 वर्षीय डॉक्टरने केली आहे.

  • राष्ट्रीय महिला पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्वेता शेट्टी या आहेत. त्यांनी सांगितले की, आज संसदेत महिलांच्या आरक्षणावर सर्वच बोलतात, मात्र कृती करत नाहीत. यामुळे आमचा पक्ष याविरोधात लढणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या शोषणावरही आवाज उठविणार आहे. यासाठीच केवळ महिलांसाठी वेगळा पक्ष काढण्यात आला आहे. 

  • 2019 मध्ये लोकसभा निवडणुकाही लढविण्यात येणार असून राजकीय क्षेत्रातील पुरुषांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महिलांचा पक्ष असणे गरजेचे आहे. वंचित महिलांना प्रतिनिधित्व मिळायला हवे. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एक लाखापर्यंत मेगाभरती :
  • मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट नोकरभरती करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक या बँकांतर्फे मार्च 2019 पर्यंत एक लाख नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

  • सार्वजनिक बँकांचा चेहरामोहरा बदलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या बँकांमध्ये वेल्थ मॅनेजमेंट, अॅनलिटिक्स, स्ट्रॅटेजी, कस्टमर सर्व्हिसेस अशा विभागातील पदांवर नव्या जागा भरण्यात येणार आहेत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढलेली स्पर्धा पाहता व्यवसायात वाढ करण्यासाठी ही पावलं उचलण्यात येणार आहेत.

  • सार्वजनिक बँकांमध्ये लेखनिकांची संख्या कमी आणि अधिकाऱ्यांची संख्या जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे लेखनिकांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. वरिष्ठ पातळीवरील पदे सोडून लेखनिक, मॅनेजमेंट ट्रेनी आणि प्रोबेशनल ऑफिसर्सच्या पदांच्या मिळून गेल्या दोन वर्षांत 95 हजार जागा भरण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

  • कोणकोणत्या जागांसाठी भरती - वेल्थ मॅनेजमेंट, अॅनलिटिक्स, स्ट्रॅटेजी, कस्टमर सर्व्हिसेस, चीफ एथिक्स ऑफिसर, चीफ मार्केटिंग ऑफिसर, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, चीफ लर्निंग ऑफिसर, हेड अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग कॅम्पेनर

दिनविशेष :
  • गोआ मुक्ती दिन

महत्वाच्या घटना 

  • १९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

  • १९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

  • १९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.

  • २००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म 

  • १८५२: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९३१)

  • १८९४: पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी१९८०)

  • १८९९: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर१९८४)

  • १९०६: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)

  • १९१९: चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९)

  • १९३४: भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८६०: भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८१२)

  • १९१५: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६४)

  • १९९७: स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र बारलिंगे यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

  • १९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)

  • १९९८: भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे यांचे निधन.

  • २०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.