चालू घडामोडी - १९ जानेवारी २०१८

Date : 19 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता लवकरच विमानात व्हाईस कॉल आणि इंटरनेटचा वापर करता येणार :
  • नवी दिल्ली : हवाई प्रवास करतेळी आपल्याला विमानात स्वत:कडे असलेला मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात येते. मात्र, आता ही सूचना बंद होण्याची शक्यता आहे. कारण, तुम्ही मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवता सरळ विमानातून कॉल करु शकता. याशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर सुद्धा करु शकता. दरम्यान, यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच नागरी उड्डान संचालनालयला(डीजीसीए) प्रस्ताव पाठविणार आहे. 

  • सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात प्रवास करताना व्हाईस कॉल करण्यासाठी आणि मोबाइल डेटा वापरण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच डीजीसीएकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव जर डीजीसीएने मान्य केला, तर हवाई प्रवास करण्या-यांसाठी व्हाईस कॉल आणि मोबाइल डेटा या सुविधांचा उपयोग लकरच करता येणार आहे. 

  • विमानात सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवायला सांगितले जाते. फ्लाइट मोडमध्ये ठेवण्यानंतर प्रवाशाला व्हाईस कॉल किंवा मोबाइट डेटा वापरता येत नाही. त्यामुळे यावर उपाय काढण्याचे काम भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. 

  • लोकांना मोबाइलचा सुलभ करता यावा, यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने आंतरराष्ट्रीय इनकमिंग कॉलच्या टर्मिनेशन शुल्कात घट केली आहे. यामध्ये प्रतिमिनिट 53 पैशांची घट करुन 30 पैसे प्रतिमिनिट केले आहे. हे नवीन दर येत्या एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.(source: lokmat)

कोहलीला सर्वोत्तम वन डे क्रिकेटरचा मान :
  • मुंबई: आयसीसीने आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2017 मधील उत्कृष्ट वन डे क्रिकेटर म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा गौरव करण्यात आला.

  • विराट कोहलीला ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला. गेल्या वर्षभरात कोहलीने तब्बल 6 शतकं ठोकली आहेत. सध्याची त्याची वन डेची सरासरी 55.74 इतकी आहे. कोणत्याही वन डे खेळाडूची ही सर्वोत्तम सरासरी आहे.

  • दुसरीकडे टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला टी ट्वेण्टीतील कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं.

  • चहलला आयसीसी टी ट्वेण्टी परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झाला. चहलने गेल्या वर्षी बंगळुरुत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

  • कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला सन्मानित करण्यात येणार आहे. स्मिथला ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला.

  • उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानच्या हसन अलीने पटकावला. चॅम्पियन्स ट्रॉफीत हसन अलीने 13 विकेट्स घेत, पाकिस्तानच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.(source: abpmajha)

हस्तकलेसह २९ वस्तूंवर शून्य कर; ५४ प्रकारच्या सेवाही झाल्या स्वस्त, जीएसटी परिषदेचा निर्णय :
  • नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आलेल्या महागाईवर उतारा म्हणून सरकारने कर कमी करण्याचे सत्र सुरूच ठेवले असून, गुरुवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत ५३ सेवांच्या दरात कपात केली असून, हस्तकलेसह २९ वस्तूंवर आता शून्य टक्के कर लावला असेल.

  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेली जीएसटी परिषदेची बैठक राजधानीत झाली. बैठकीनंतर जेटली यांनी सांगितले की, जीएसटी भरणा करण्यासंबंधी पोर्टलवर येणाºया अडचणींसंबंधी कुठलाही निर्णय बैठकीत झाला नाही. परंतु ही प्रक्रिया सोपी करण्याबाबत नंदन निलेकणी यांनी सादरीकरण केले.

  • येत्या दहा दिवसांत परिषदेची पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्स होईल. १ फेब्रुवारीपासून लागू होणाºया ई-वे बिलाला १५ राज्यांनी होकार दर्शविला आहे. त्या राज्यांमध्ये राज्यांतर्गत ई-वे बिलाची अंमलबजावणी १ तारखेपासून होणार आहे. बैठकीत जीएसटीच्या संकलनाबाबतही चर्चा झाली.

  • करमुक्त झालेल्या प्रमुख सेवा ‘उडान’अंतर्गत विमानसेवांसाठीचा निधी (३ वर्षांसाठी) माहिती अधिकारांतर्गत माहिती देणे सरकारसाठीच्या कायदे सेवा देशातून विदेशात माल पाठविणे तटरक्षक सैनिकांसाठीचा नौदल समूह विमा शैक्षणिक संस्थांकडून प्रवेश परीक्षांसाठी घेण्यात येणारे शुल्क सर्व प्रकारच्या मंच कलाकारांचे ५०० रुपये प्रति कलाकार मानधन थीम पार्क, वॉटर पार्क, जॉय राइड, मेरी गो राउंड, गो कार्टिंग बैलेट अशा सेवांवर आता १८ टक्के जीएसटी शून्य जीएसटी विभूती, कर्णबधिरांसाठी लागणारी उपकरणे, तेल काढून घेतलेल्या तांदळाचा कोंडा, हस्तशिल्पांच्या यादीत असलेल्या ४० वस्तू. पाण्याचा २० लीटरचा जार, मेहंदी कोनही स्वस्त.(source: lokmat)

१० मे रोजी होणार सीईटी ; इंजिनिअरिंग, फार्मसी व अ‍ॅग्रिकल्चर पदवी :
  • पुणे : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे. या परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून येत्या २५ मार्चपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतील, असे राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आले.

  • तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. इंजिनिअरिंग (बीई व बीटेक), फार्मसी (पदविका व पदवी फार्मसी), पदवीस्तरावरील कृषी अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या तारखा यापूर्वी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, १० मे रोजी ही परीक्षा होईल.

  • आॅनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश घेत असताना अथवा पडताळणीच्या वेळी सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेशाची माहिती-पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. ही माहिती-पुस्तिका तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात अथवा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानंतर आॅनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन समाईक प्रवेश परीक्षांचे आयुक्त आनंद रायते यांनी केले आहे.

  • सीईटी अर्जासाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये शुल्क, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क असेल.'(source: lokmat)

लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, आज किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार :
  • सांगली स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० व्र्षांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यातल्या कुस्तीचा थरार अनुभवता येणार आहे. यंदाचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंग यांच्यामधली ही कुस्ती आज सायंकाळी सहाच्या सुमारास खेळवण्यात येईल.

  • सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या कुस्तीसाठी लोखंडी पिंजऱ्यात मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेच्या उद्धाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांनी या कुस्तीचं आयोजन केलं आहे.

  • महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांच्या संकल्पनेतून 18 जानेवारीला सांगलीत पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेची स्थापना होत आहे. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा भारतीय पैलवान मनजीतसिंग यांच्यामधली निकाली कुस्ती या कार्यक्रमाचं आकर्षण ठरणार आहे.

  • ही कुस्ती लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणारी ही पहिलीच कुस्ती ठरणार आहे. स्वातंत्र्याआधी भारतात लोखंडी पिंजऱ्यात निकाली कुस्ती खेळण्याची पद्धत रूढ होती.

  • पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेच्या सांगलीतल्या स्थापनेनिमित्तानं त्या परंपरेचं पुनरुज्जीवन होणार आहे. या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे आणि संभाजी भिडे गुरुजी उपस्थित राहणार आहेत.(source: abpmajha)

‘फ्री अँड ईझी’, ‘पिंपळ’ सर्वोत्कृष्ट, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता :
  • पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चीनच्या जून जेंग दिग्दर्शित ‘फ्री अँड इझी’ या चित्रपटाने दहा लाख रुपयांचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा बहुमान मिळवला.

  • ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पाच लाख रुपयांच्या पुरस्कारावर गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘पिंपळ’ या चित्रपटाने आपले नाव कोरले. ‘म्होरक्या’ आणि ‘पिंपळ’ने सर्वाधिक पुरस्कार पटकावित पिफवर मोहोर उमटवली.

  • गेले आठवडाभर विविध देशांच्या चित्रपटांची मेजवानी मिळालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्काराचा समारोप सोहळा गुरुवारी कोथरूड येथील सिटी प्राईड येथे रंगला. जागतिक, मराठी आदी विविध विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या पुरस्कारांची या वेळी घोषणा झाली. ‘फास्टर फेणे’, ‘मुरांबा’ अशा तगड्या व लोकप्रिय चित्रपटांवर मात करत ग्रामीण भागातील जीवनाचा बाज जपणाºया ‘म्होरक्या’ व ‘पिंपळ’ या चित्रपटांनी पिफ गाजवला.

  • अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ चित्रपटासाठी गिरीश जांभळीकर यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकार, रमण देवकर यास सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले. गजेंद्र अहिरे यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.

  • सचिन खेडेकर यांना स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ‘नशीबवान’ या चित्रपटासाठी मिताली जगताप यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. यावेळी एफटीआयआयच्या विद्यार्थी मलयज अवस्थी याचा विशेष सन्मान करण्यात आला.(source: lokmat)

चार वरिष्ठ न्यायमूर्तींशी सरन्यायाधीशांची चर्चा :
  • नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार अतिवरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्यासाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी गुरुवारी त्यांच्याशी चर्चा केली.

  • जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन बी. लोकूर आणि कुरियन जोसेफ या न्यायमूर्तींशी मिश्रा यांनी न्यायालयाचे कामकाज सकाळी साडेदहा वाजता सुरू व्हायच्या आधी सुमारे १५ मिनिटे चर्चा केली; परंतु इतर न्यायाधीश यावेळी उपस्थित नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. चेलमेश्वर यांना बरे वाटत नसल्यामुळे बुधवारी ही बैठक होऊ शकली नव्हती.

  • १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयात खटले कोणाकडे सुनावणीला द्यायचे यासह अनेक प्रश्नांची यादीच वाचून दाखवली होती, असे काही विषय आहेत की ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर परिणाम करतात, असेही हे चौघे म्हणाले होते.

  • या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर चर्चा करणे, त्यांना प्रसिद्धी देणे व त्यांचे राजकियीकरण करण्यास प्रसारमाध्यमांना मनाई करावी, अशी मागणी करणाºया याचिकेवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ही याचिका न्यायालयाचे निबंधक सुनावणीसाठी यादीत समाविष्ट करतील त्यानंतरच त्याचा विचार केला जाईल, असे या न्यायपीठाने म्हटले.

  • या याचिकेत तातडीने सुनावणी व्हावी, असे म्हटले आहे. १२ जानेवारीच्या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर चर्चा, त्यांचे राजकियीकरण व त्याला प्रसिद्धी देण्यास सर्वोच्च न्यायालयाची आणखी हानी टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना तात्काळ मनाई करावी, असे म्हटले होते.

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

  • १९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.

  • १९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.

  • १९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

  • १९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

  • १९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

  • १९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

  • १९९६: प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

  • २००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

  • २००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

जन्म

  • १७३६: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

  • १८०९: अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर१८४९)

  • १८८६: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)

  • १८९२: विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.

  • १९०६: चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

  • १९२०: संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

  • १९३६: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८१)

मृत्यू

  • १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी देबेन्द्रनाथ टागोर यांचे निधन.

  • १९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९०)

  • १९९०: भारतीय तत्त्वज्ञानी आचार्य रजनीश यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९३१)

  • २०००: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.