चालू घडामोडी - १९ जून २०१७

Published On : Jun 19, 2017 | Category : चालू घडामोडी

एका दिवसात तीन वेळा होतो सूर्योदय : 
 • पृथ्वीवर दिवसात एकदाच सूर्योदय व सूर्यास्त होतो; परंतु शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नव्या ग्रहावर दिवसात तीन वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. आहे ना कमाल? या ग्रहाला तीन सूर्य असल्यामुळे हा चमत्कार घडतो.

 • आमच्यासाठी निसर्गाकडे अशी आणखीही अनेक आश्चर्ये असावीत असे मला वाटते, असेही ते म्हणाले. केविन आणि त्यांच्या पथकाने या अनोख्या ग्रहाचा शोध लावला.

 • या ग्रहाचे वस्तुमान गुरू ग्रहाच्या वस्तुमानाहून चौपट आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ३४० प्रकाशवर्ष दूर असून, तेथे वर्षाच्या एका विशिष्ट काळात तिन्ही सूर्य आकाशात दिसून येतात. त्यामुळे तीन वेळा सकाळ आणि तीन वेळा रात्र होते.

 • तीन सूर्यांपैकी प्रमुख सूर्य मोठा असून उर्वरित दोन लहान आहेत. या ग्रहाच्या एक वर्षाच्या एक चतुर्थांश एवढा काळ (पृथ्वीवरील १०० ते १४० दिवस) येथे सतत दिवस असतो. कारण मोठा सूर्य तळपत असतो आणि छोटे सूर्य मावळत असतात. या तरुण ग्रहाचे वजन १.६ कोटी वर्ष असल्याचे मानले जाते.

राष्ट्रीय सेवा योजनेत सोलापूर विद्यापीठ सर्वोत्कृष्ट :
 • उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे दिले जाणारे 'राष्ट्रीय सेवा योजने'चे पुरस्कार जाहीर झाले असून सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा सन्मान सोलापूर विद्यापीठाला मिळाला आहे.

 • २०१६-१७ या वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

 • विद्यार्थ्यांमध्ये समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती रुजावी, यासाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

 • सोलापूर विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

 • सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या डॉ. बब्रुवान काबंळे यांची घोषणा करण्यात आली आहे.

स्विस बँकेत भारतीयांचा अपेक्षेपेक्षा कमी पैसा :
 • भारतापेक्षा स्विस बँकेत सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या देशांचा पैसा अधिक आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, भारतीयांचे जवळपास ८ हजार ३९२ कोटी रुपये असल्याचं कळतं आहे. अर्थात या बँकेत इतर देशांचा किती पैसा आहे, याची आकडेवारी मात्र मिळालेला नाही.

 • इतर देशांच्या तुलनेत भारतीयांचा अत्यंत कमी पैसा स्विस बँकेत असल्याचा दावा स्वित्झर्ल्डंमधल्या प्रायव्हेट बँकरर्सच्या एका ग्रुपनं केला आहे.

 • भारतातला बहुतांश काळा पैसा हा स्विस बँकेत जमा असल्याचा दावा केला जातो. पण त्या दाव्याला या ग्रुपनं फेटाळून लावलं आहे.

 • असोसिएशनचे प्रबंधक जॉन लांगलो यांनी सांगितलं की, स्वित्झरलँडमध्ये सिंगापूर आणि हाँगकाँगच्या तुलनेत भारतीयांची कमी खाती आहेत.

एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारत विजयी :
 • दिनांक १८ जून रोजी पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या होत्या.

 • शहीद भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी खेळाडूंनी काळी फीत बांधली होती.

 • भारतीय हॉकी संघाने एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विक्रमी ६-१ गोलने धुव्वा उडविला आणि 'ब' गटात अव्वल स्थान कायम राखले.

 • पाकिस्तानचा पराभव केल्याने त्यांनी सर्वाची मने जिंकलीच. पण सोबतच भारतीय जवानांप्रती आदर दाखवत सर्वांचा मानही मिळवला.

श्रीकांत ठरला इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरीचा चॅम्पियन :
 • भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने अंतिम सामन्यात जपानचा क्वॉलिफायर काजुमासा साकाई याच्यावर सरळ गेम्समध्ये विजय नोंदवताना इंडोनेशिया ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्या नावावर केले. त्याचे हे सुपर सीरीजचे तिसरे विजेतेपद ठरले.

 • एप्रिलमध्ये सिंगापूर ओपनच्या फायनल्समध्ये पोहोचणारा जगातील 22 व्या क्रमांकावरील खेळाडू श्रीकांतने ४७ व्या रँकिंगच्या साकाई याचा अवघ्या ३७ मिनिटांत २१-११, २१-१९, असा पराभव करताना ७५,००० डॉलर बक्षीस रकमेचा धनादेश आपल्या नावे केला.

 • तसेच श्रीकांतने २०१४ मध्ये चायना सुपर प्रीमिअर आणि २०१५ मध्ये इंडिया सुपर सीरीज जिंकली होती.

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी :
 • चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला १८० धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.

 • तसेच या पराभवासह पाकिस्तानने साखळी फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली.

 • चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध तिसऱ्यांदा विजय मिळविला.

 • दोन लढतींमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. पाकिस्तान संघ प्रथमच चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ठरला.

पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘राहुल तुम जियो हजारों साल’ !
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्विटरवरून राहुल गांधी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 • तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना मी करतो, असे ट्विट मोदींनी केले आहे.

 • राहुल गांधी आज ४८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसकडून त्यांचा जन्मदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.

 • या कार्यक्रमानिमित्त लखनऊमध्ये शहरातील विविध रुग्णालयांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते फळांचे वाटप करणार आहेत. तर मोतीनगर येथील अनाथालयात काँग्रेस नेत्यांनी मुलांसाठी मेजवानी आयोजित केली आहे.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

 • भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ञ व सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्म : १९ जून १९०१

ठळक घटना

 • छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदार नेताजी पालकर यास शुध्द करुन हिंदु धर्मात घेतले : १९ जून १६७६

 • हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांची शिवसेना स्थापन केली : १९ जून १९६६


अधिक चालू घडामोडी :

टिप्पणी करा (Comment Below)