चालू घडामोडी - १९ जून २०१८

Date : 19 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बायोमेट्रिकने काय साध्य करणार?, एसएफआयचा सवाल :
  • मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांत विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित राहत नाहीत, असा ठपका ठेवून राज्य सरकारने अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा निर्णय १५ जून रोजी घेतला. या निर्णयावर स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय)ने आक्षेप घेतला आहे.

  • राज्यातील अनेक महाविद्यालयांत बाकडे, विज्ञान प्रत्यक्षिकाची साधने, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रशिक्षित शिक्षक आदी मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. मजबूत, सुसज्ज इमारती नाहीत. अशा ठिकाणी तेथे बायोमेट्रिक हजेरी लागू करून सरकारला काय साध्य करायचे आहे, असा सवाल एसएफआयने केला आहे.

  • सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे की, विद्यार्थी प्रात्यक्षिकांना उपस्थित राहतात, परंतु नियमित वर्गांना अनुपस्थित असतात. मात्र एसएफआयने आक्षेप घेतला की, अनुपस्थितीचे अपयश नेमके कोणाचे, याचा विचार सरकारने करावा. प्रत्यक्षात प्रात्यक्षिकांना उपस्थित राहणारे विद्यार्थी हे नियमित वर्गांनादेखील उपस्थित राहतात. म्हणून बायोमेट्रिक हजेरीवर पैसा खर्च करण्याऐवजी मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यावर खर्च वाढवण्यात यावा.

  • काही महाविद्यालये खासगी शिकवणी वर्गांसोबत हातमिळवणी करतात. त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. खासगी शिकवणींवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घालण्याचे जे आदेश दिले त्याचे तत्काळ पालन करून त्या दिशेने पावले उचलावीत.

एफवायची पहिली मेरिट लिस्ट आज :
  • मुंबई : एफवाय प्रवेशासाठी मंगळवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. यासाठी आतापर्यंतच्या प्रवेशपूर्व नोंदणी आणि प्रवेश अर्जांनुसार यंदाही कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे. कॉमर्सपाठोपाठ सेल्फ फायनान्सला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे.

  • मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व आॅनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया १ जून, २०१८ पासून सुरू केली होती. या प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीसाठी एकूण २ लाख ७५ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ५४ हजार ९४९ अर्ज करण्यात आले आहेत. कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही २० जून ते २२ जून २०१८ पर्यंत असेल.

  • ८ लाख ५४ हजार ९४९ अर्ज मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया १ जून ते १८ जून २०१८ पर्यंत राबविली होती. यामध्ये १८ जून २०१८ सायंकाळी ५ वाजेपर्यंत २ लाख ७५ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी करून विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ५४ हजार ९४९ एवढे अर्ज केले आहेत.

  • बीव्होक (फायनान्शिअल मार्केट, ग्रीन हाउस मॅनेजमेंट, मीडिया प्रोडक्शन, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, फार्मा एनेलिटकल सायन्सेस, रिअल इस्टेट मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम) - २, ८२६ जागाएकूण अर्जांमध्ये वाणिज्य शाखेतील परंपरागत आणि स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत.

राहुल गांधी झाले ४८ वर्षांचे, मोदींनी दिल्या शुभेच्छा :
  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीत असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. ते ४८ वर्षांचे झाले. देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच राहुल गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राहुल गांधीना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरद्वारे मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो, असं ट्विट मोदींनी केलं.

  • १९ जून १९७० रोजी जन्मलेल्या राहुल गांधींनी २००४ मध्ये सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली, आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपल्या राजकारणाची शैली बदललेली पाहायला मिळत आहे. आगामी वर्ष राहुल गांधी यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात राहुल गांधी यांच्यासमोरील आव्हानांचा घेतलेला आढावा.

भारत, पाकिस्तान आणि चीनकडून अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ :
  • नवी दिल्ली : भारत, चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांनी गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिपरी) ताज्या अहवालातून याबद्दलची आकडेवारी समोर आली आहे. आशियातील तीन प्रमुख देश असलेल्या भारत, चीन आणि पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात अण्वस्त्र यंत्रणा अधिक सुसज्ज केली असून अण्वस्त्रांच्या संख्येतही वाढ केली आहे.

  • सध्या हे तिन्ही देश अत्याधुनिक आणि लहान अण्वस्त्रांच्या विकासावर भर देत असल्याचं सिपरीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अण्वस्त्रांच्या संख्येचा विचार केल्यास पाकिस्तान आत्ताही भारताच्या पुढे आहे. 

  • आशिया खंडात अण्वस्त्र स्पर्धा सुरू असताना पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र स्थिरता आहे, असं निरीक्षण सिपरीनं नोंदवलं आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात तिन्ही देशांकडे असणाऱ्या अण्वस्त्रांबद्दलची आकडेवारी देण्यात आली आहे.

  • 'गेल्या वर्षी चीनकडे असणाऱ्या अण्वस्त्रांची संख्या 270 इतकी आहे. आता ती वाढून 280 वर पोहोचली आहे. भारताकडे सध्याच्या घडीला 130 ते 140 अण्वस्त्र असून पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या 140 ते 150 इतकी आहे. मात्र यातील कोणतंही अण्वस्त्र डागण्यासाठी क्षेपणास्त्रात लावण्यात आलेलं नाही,' असं सिपरीचा अहवाल सांगतो. 

मुतालिक यांना पंतप्रधान मोदी माफ करणार का :
  • कर्नाटकात प्रत्येक वेळी कुत्रे मेले तरी पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे अपेक्षित आहे काय, असा सवाल श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात केला असून त्यावर काँग्रेसने संतप्त  प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुतालिक यांना गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना करण्याच्या या वक्त व्याबाबतही पंतप्रधान मोदी माफ करणार का, असे काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. 

  • मुतालिक यांनी येथे बोलताना नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कन्नड लेखक एम. एम कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाच्या संदर्भात असे सांगितले, की हिंदू संघटनांनी गौरी लंकेश यांच्या खुनाचा कट आखल्याचे सर्व जण म्हणतात, पण दोन खून महाराष्ट्रात व दोन कर्नाटकात काँग्रेसच्याच काळात झाले होते.

  • त्या वेळी काँग्रेसला कुणी अपयशाबाबत जाब विचारला नाही, उलट आता डावे बुद्धिमंत हे पंतप्रधान मोदी यांनी गौरी लंकेश यांच्या खुनाविषयी बोलावे असे म्हणत आहेत. कर्नाटकात कुत्रे मेले तरी मोदींनी प्रतिक्रिया द्यावी किंवा त्यावर बोलावे अशी तुमची अपेक्षा आहे काय?

  • यात पत्रकार गौरी लंकेश यांची तुलना कुत्र्याशी करण्यात आली हे संतापजनक आहे, असे सांगून काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी सांगितले, की मोदी आता मुतालिक यांच्या वक्तव्याला माफ करणार आहेत का?

  • गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना करण्याचा हेतू मुळीच नव्हता असे मुतालिक यांनी सांगितले ते म्हणाले की ‘राज्यातील कुठल्याही मृत्यूबाबत पंतप्रधानांनी बोलावे अशी अपेक्षा आहे काय एवढेच मला म्हणायचे होते.’

दिनविशेष :
  • जागतिक सांत्वन दिन

महत्वाच्या घटना 

  • १६७६: शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

  • १८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

  • १९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

  • १९४९: चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.

  • १९६६: शिवसेनेची स्थापना.

  • १९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.

  • १९८१: भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.

  • १९८९: ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

  • १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

जन्म 

  • १५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १६४४)

  • १७६४: उरुग्वेचा राष्ट्रपिता जोसेगेर्व्हासियो आर्तिगास यांचा जन्म.

  • १८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.

  • १९४१: चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष वाक्लाव क्लाउस यांचा जन्म.

  • १९७०: भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म.

  • १९७६: फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले यांचा जन्म.

  •  

मृत्यू 

  • १८७७: शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचे निधन.

  • १९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.

  • १९४९: भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)

  • १९५६: अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)

  • १९९३: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९११)

  • १९९८: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९२५)

  • २०००: मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.