चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ जून २०१९

Date : 19 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वाहन चालक परवान्यासाठी किमान शैक्षणिक अट शिथिल :
  • नवी दिल्ली : वाहन चालक परवान्यासाठी असलेली किमान शिक्षणाची अट शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बस, ट्रक आणि माल वाहतूकीसाठी चालकांना रोजगार मिळावा, यासाठी किमान अर्हता घटवणार असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलं. आतापर्यंत ड्राईव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी किमान आठवी पास असणं आवश्यक होतं.

  • केंद्रीय मोटर वाहन 1989 च्या नियम 8 मध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच त्यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात येईल. देशात मोठ्या संख्येवर बेरोजगार युवक आहेत, जे सुशिक्षित नसले, तरी कुशल आणि साक्षर आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुशल कामगारांना रोजगार मिळावा, यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत.

  • बस, ट्रक आणि माल वाहतुकीचा वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल केल्यास अधिकाधिक जणांना रोजगार मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या जवळ वाहतूक आणि माल वाहतूक क्षेत्रात जवळपास 22 लाख चालकांची कमतरता आहे. शिक्षणाची अट शिथिल केल्याने ही तूट भरुन निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच यासंदर्भात एक बैठक घेतली होती, त्यावेळी हरियाणा सरकारने याला विरोध केला होता. मात्र शैक्षणिक अर्हता हटवली तरी प्रशिक्षण आणि कौशल्य चाचणीवर केंद्राकडून भर देण्यात आला आहे. रस्ते वाहतूक सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

मोदींनी दिल्या राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या खास शुभेच्छांसह राहुल गांधी यांना आरोग्यदायी दीर्घायू लाभो अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाकडूनही राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • राहुल गांधी यांच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘ श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य देवो.’

  • लोकसभा निवडणूकीमध्ये अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांना पराभवाचा धक्का बसला होता. भाजपाच्या  स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र वायनाड मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत.

  • काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा वाढदिवस भव्य पद्धतीनं साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केक कापून राहुल गांधींचा ४९ वा वाढदिवस संस्मरणीय बनवण्याची योजना आखली आहे.

नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या अर्थ विभागातील १५ बड्या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती :
  • केंद्र सरकारने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि कस्टम बोर्डाच्या १५ बड्या अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती दिली आहे. यापूर्वीही सरकारने आयकर विभागातील १२ बड्या अधिकाऱ्यांकडून १० जून रोजी राजीनामे मागितले होते. या सर्व अधिकाऱ्यांवर कर्तव्यावर असताना नियमांविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विविध तपास यंत्रणांनी कारवाईची शिफारस केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

  • ज्या अधिकाऱ्यांना सरकारने पदमुक्त करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये मुख्य आयुक्त, आयुक्त, अतरिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त पदांवर नियुक्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नियम ५६ नुसार अर्थमंत्रालयाने ही कारवाई केली आहे. एएनआयने अर्थ मंत्रालयाच्या सुत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

  • ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यामध्ये मुख्य आयुक्त डॉ. अनुप श्रीवास्तव, आयुक्त अतुल दीक्षित, संसार चंद, जी. श्री. हर्षा आणि विनय ब्रिजसिंह या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अतिरिक्त आयुक्त पदावरुन अशोक आर. महिंदा, वीरेंद्र कुमार अग्रवाल आणि राजू सेकर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

  • तसेच उपायुक्त पदावर नियुक्त असलेले अमरेश जैन आणि अशोक कुमार असवाल, सहआयुक्त नलिन कुमार, सहाय्यक आयुक्त एस. एस. पबाना, एस. एस. बिष्त, विनोद कुमार सांगा, मोहम्मद अल्ताफ यांनाही पदमुक्त करण्यात येणार आहे.

‘या’ संघाचे विश्वचषक स्पर्धेतील संपले आव्हान :
  • यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सध्या चांगलीच रंगत आली आहे. प्रत्येक संघ उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र अफगाणिस्तान संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यापासून गुणतालिकेत अफगाणिस्तानचा संघ तळाशीच राहिला. पाच सामन्यात अफगाणिस्तान संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. शून्य गुणांसह अफगाणिस्तान संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेतून बाहेर पडणारा अफगाणिस्तानचा संघ पहिला असेल.

  • यंदाची विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात आहे. या स्पर्धेत १० संघांनी भाग घेतला आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक संघाला अन्य संघाबरोबर खेळत आहे. त्यामुळे प्रत्येकाचे ९ सामने होणार आहेत. ९ पैकी अफगाणिस्तानच्या संघाला पाच सामन्यात पराभवाचा धक्का पहावा लागाला आहे. गुणतालिकेत ते तळाशी आहे. अफगाणिस्तान संघाचे अद्याप चार सामने बाकी आहेत. त्यांनी चारही सामन्यात विजय मिळवला तरी त्यांना उपांत्यफेरीत स्थान मिळण्याची शक्यता ढासळली आहे.

  • अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर जरी पडला असला तरी एखाद्या तगड्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. उर्वरित सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न असेल. अफगाणिस्तान संघाचे उर्वरित सामने भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि विंडीजबरोबर आहेत.

… तर 2030 नंतर केवळ इलेक्ट्रीक गाड्यांचीच विक्री होणार :
  • केंद्र सरकार सध्या इलेक्ट्रीक गाड्यांची विक्री वाढवण्यावर भर देत आहे. नीति आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर 2030 नंतर देशात केवळ इलेक्ट्रीक गाड्यांचीच विक्री केली जाऊ शकते. 2030 नंतर देशात केवळ इलेक्ट्रीक गाड्यांचीच विक्री केली जावी, असा प्रस्ताव नीति आयोगाने सादर केला आहे.

  • यापूर्वी नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कान्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2025 पासून देशात केवळ इलेक्ट्रीक टू व्हिलर्स आणि थ्री व्हिलर्सचीच विक्री करण्याच्या सुचना केल्या होत्या. 150 cc पर्यंतच्या टू व्हिलर्ससाठी हा त्यांनी या सुचना दिल्या होत्या.

  • परंतु आता समितीने एक नवी नोट जारी केली आहे. यामध्ये निरनिराळ्या मंत्रालयांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त रस्ते आणि वाहतूक मंत्रालयालाही 2030 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांची विक्री थांबवण्यासाठी फ्रेमवर्क तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

दिनविशेष :
  • जागतिक सांत्वन दिन

महत्वाच्या घटना 

  • १६७६: शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

  • १८६२: अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.

  • १८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

  • १९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

  • १९४९: चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.

  • १९६१: कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६६: शिवसेनेची स्थापना.

  • १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

  • १९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.

  • १९७८: गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.

  • १९८१: भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.

  • १९८९: ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

  • १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

जन्म

  • १५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १६४४)

  • १६२३: फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)

  • १७६४: उरुग्वेचा राष्ट्रपिता जोसेगेर्व्हासियो आर्तिगास यांचा जन्म.

  • १८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.

  • १९४१: चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष वाक्लाव क्लाउस यांचा जन्म.

  • १९४५: म्यानमारची राजकारणी ऑँगसान सू की यांचा जन्म.

  • १९४७: ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म.

  • १९७०: भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म.

  • १९७६: फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७४७: पर्शियाचा सम्राट नादिर शहा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६९८)

  • १८७७: शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचे निधन.

  • १९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.

  • १९४९: भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)

  • १९५६: अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी१८७४)

  • १९९३: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९११)

  • १९९६: समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचे निधन.

  • १९९८: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९२५)

  • २०००: मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.

  • २००८: बंगाली पत्रकार बरुण सेनगुप्ता यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.