चालू घडामोडी - १९ ऑक्टोबर २०१७

Date : 19 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी
  • वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निक्की हेली, सीमा वर्मा यांच्यासहीत प्रशासनातील वरिष्ठ भारतीय अमेरिकी सदस्य तसेच नेतेमंडळी, अधिका-यांसोबत ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली.

  • सर्वांमध्ये सहभागी होत ट्रम्प यांची मुलगी इवांकानंही दिवाळी साजरी केली. हेली या संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत आहेत.

  • याशिवाय, यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष अजित पै यांच्यासहीत अनेक दिग्गज यावेळी दिवाळी साजरी केली.

मित्तल यांची हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी
  • वॉशिंग्टन - उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी दिली आहे. विद्यापीठातील "साउथ एशिया इन्स्टिट्यूट'साठी या देणगीचा वापर करण्यात येणार आहे.

  • या इन्स्टिट्यूटचे नामकरण आता "लक्ष्मी मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूट' असे करण्यात आले आहे.

  • या संस्थेची स्थापना 2003 मध्ये झाली. ही संस्था 2010 मध्ये आंतरविद्याशाखीय बनली. या संस्थेत दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांशी निगडित संशोधन होते.

  • या संस्थेचे संचालक भारतीय वंशाचे तरुण खन्ना आहेत. मित्तल यांच्या देणगीमुळे दक्षिण आशियाशी विद्यापीठ अधिक जोडले जाणार असून, दक्षिण आशियाशी निगडित संशोधनाला वाव मिळणार आहे.

 

दिनविशेष : 

जन्म /वाढदिवस

  • तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म : १९ ऑक्टोबर १९१०

  • वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म : १९ ऑक्टोबर १९२५

  • अभिनेते अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांचा जन्म : १९ ऑक्टोबर १९६१

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • विश्वनाथ कार, उडिया लेखक व समाजसुधारक. १८९६ मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे नियतकालिक काढले : १९ ऑक्टोबर १९३४

  • नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन : १९ ऑक्टोबर १९३७

  • पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचे निधन : १९ ऑक्टोबर १९५०

ठळक घटना

  • पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर : १९ ऑक्टोबर १९९३

  • पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान : १९ ऑक्टोबर २०००

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.