चालू घडामोडी - १९ सप्टेंबर २०१७

Date : 19 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाते.

  • मंडळाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येईल.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरला सुरू झाली होती.

  • यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून ठेवावी, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले होते.

  • दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्जामध्ये या वर्षी काही बदल करण्यात आले होते, या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून हा अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही, तसेच वेळेत काम पूर्ण होईल, यासाठी आधीच माहिती संकलित करणे आवश्यक होते.

केंद्र सरकार 'ISI' आणि 'IS' सोबत आहेत रोहिंग्यांचे संबंध :
  • आयएसआय आणि आयएसला बहुतांश रोहिंगे मुस्लिमांकडून समर्थन देताना पाहायला मिळालं आहे असे केंद्र सरकरानं आपले म्हणणे सुप्रीम कोर्टात सोमवारी मांडले.

  • सध्या रोहिंगे मुस्लिमांचा विषय बराच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर, बहुतांश रोहिंगे मुस्लिमांकडून आयएसआय आणि आयएसला समर्थन देताना पाहायला मिळालं आहे, असे केंद्र सरकरानं आपले म्हणणे सुप्रीम कोर्टात सोमवारी मांडले.

  • यासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी सरकारनं सोमवारी सुप्रीम कोर्टात असे म्हटले आहे की, देशात कुठेही येण्या-जाण्याचे अधिकार देशाच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला दिले असून हा अधिकार बेकायदेशीररित्या देशात राहणा-या लोकांसाठी देण्यात आलेला नाही. 

  • केंद्रीय गृहमंत्रालयानं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या १५ पानांच्या प्रतिज्ञापत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, ''भारतात रोहिंग्यांची २०१२-१३ पासून भारतात बेकायदेशीर पद्धतीनं येण्यास सुरुवात झाली.  

  • देशाच्या सुरक्षा व गुप्तचर संस्था आणि अधिकृत सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की, बेकायदेशीर भारतात राहणारे काही रोहिंग्यांचा पाकिस्तानातील दहशतवादी समूह तसंच त्यांच्यासारखे असलेल्या समुहांसोबत संबंध दिसून आला''. 

दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात : धर्मेंद्र प्रधान
  • दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले असून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात.

  • त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून पेट्रोल-डिझेलच्या या वाढलेल्या दरांवर सर्व स्तरातून टीका होत आहेत सर्वसामान्यां बरोबरच विरोधकांकडूनही सरकारवर टीकेचा भडीमार केला जातो आहे.  

  • सरकारच्या या धोरणावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. 

  • केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या महिन्यात कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली असून त्यांना कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून युएसमध्ये आलेल्या पुरामुळे तेलाच्या निर्मीतील १३ टक्क्यांनी घट झाली म्हणूनच रिफायनरी तेलाच्या किंमती वाढल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. 

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जीडीपी आणखी खालावेल : मनमोहन सिंग
  • नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय घाईघाईत घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी खालावू शकतो, अशी भीती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे.

  • एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नोटाबंदी आणि जीएसटी दोन्हींचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव राहिला आहे.

  • जीएसटी घाईघाईत लागू करण्यात आल्याने आता त्याचे विपरित परिणाम दिसायला लागले आहेत. चालू आर्थिक वर्षातील जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत देशाच्या जीडीपीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे.

  • आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या चौथ्या तिमाहीतील जीडीपी ६.१ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.९ टक्के होता.

  • मनमोहन सिंग यांनी गेल्यावर्षी नोटाबंदीनंतर संसदेत भविष्यवाणी केली होती की, यामुळे जीडीपीत २ टक्के घट होऊ शकते, ते म्हणाले होते की, नोटाबंदी एक ऐतिहासिक संकट असून ती संघटित आणि कायदेशीर लूट आहे.

राष्ट्रीय तपास पथकाच्या महासंचालकपदी वाय.सी. मोदी :
  • गृहमंत्रालयाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. एनआयएचे विद्यमान महासंचालक शरदकुमार यांची ते जागा घेतील ३० ऑक्टोबर रोजी शरदकुमार निवृत्त होत आहेत.

  • वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी. मोदी यांची राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • गोध्रा प्रकरणानंतर घडलेल्या तीन महत्वाच्या प्रकरणांचा तपासही वाय.सी. मोदी यांनी केला असून यामध्ये गुलबर्ग सोसायटी, नरोडा पाटिया आणि नरोडा गाम येथील हिंसाचार प्रकरणांचा समावेश आहे.

  • या पथकात वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी. मोदी यांचा समावेश होता, २००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे झालेल्या जातीय दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती.

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जाणा-या व्हायलेट मॉसे ब्राऊन :
  • जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जाणा-या व्हायलेट मॉसे ब्राऊन (११७) यांचे जमैकामध्ये निधन झाले असून ‘आँट व्ही’ नावाने या बाई त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या वर्तुळात परिचयाच्या होत्या.

  • त्यांचा जन्म ट्रेलॉनीत १० मार्च १९०० रोजीचा आपले प्रदीर्घ आयुष्यही त्यांनी तेथेच घालविले व्हायलेट यांना या वर्षी १५ एप्रिल रोजी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून जाहीर केले गेले.

  • व्हायलेट यांच्या आधी इटलीच्या एम्मा मोरॅनोंकडे हा सन्मान होता, त्यांच्या आयुष्याने १८९९ ते २०१७ अशा तीन शतकांना स्पर्श केला होता. 

  • ११० वा वाढदिवस साजरा केल्यानंतर, व्हायोलेट स्थानिक दैनिकाशी बोलताना म्हणाल्या होत्या की, लोक मला विचारतात की, दीर्घायुष्य लाभण्यासाठी आम्ही काय खावे व प्यावे ? मी त्यांना म्हणते की डुकराचे मांस आणि कोंबडी वगळून सगळे काही खा. मी रम पीत नाही.

  • मी कधी-कधी स्वत:लाच विचारते की, मी ११० वर्षांची आहे ? कारण मला तरी तसे वाटत नाही, असेही व्हायलेट म्हणाल्या होत्या.

  • व्हायलेट यांचा जन्म ज्या घरात झाला, त्याच घरात त्यांचा मृत्यूही. एलिझाबेथ राणीने व्हायलेट यांना त्या राष्ट्रकुलातील सगळ््यात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्याबद्दल सन्मानपत्र पाठविले होते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : सेंट किट्स आणि नेव्हिस.

  • स्त्री मतदान हक्क दिन : न्यू झीलँड.

जन्म /वाढदिवस

  • पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक : १९ सप्टेंबर १८६७

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदि

  • प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री : १९ सप्टेंबर २००२

  • दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार : १९ सप्टेंबर २००७

  • पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ : १९ सप्टेंबर १९३६

ठळक घटना

  • ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले : १९ सप्टेंबर २००७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.