चालू घडामोडी - २० एप्रिल २०१७

Date : 21 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सिंधुदुर्ग विमानतळावरून नोव्हेंबरमध्ये पहिले उड्डाण
  • सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचा संकल्प सन २००९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोडला. चिपी परुळे येथे २७१ हेक्टर्स जमीन चिपी विमानतळासाठी संपादितदेखील करण्यात आली.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ येत्या नोव्हेंबर २०१७ पर्यंत सुरु होईल असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत असून चिपी विमानतळाच्या कामाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत.

  • एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून विकसित होणारा विमानतळ ग्रीन फिल्ड आहे. या विमानतळापासून कुडाळ २४ किमी. मालवण १२ कि.मी. अंतरावर आहे त्याहीपेक्षा हा विमानतळ गोवा दाभोळीय विमानतळाला पर्याय ठरावा अशा अपेक्षा होत्या.

  • गोवा राज्यात मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातला असून हा विमानतळ महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे सिंधुदुर्गच्या सीमेलगत आहे.

टेनिसस्टार सेरेना विल्यम्स गरोदरपणातच जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन
  • सेरेना विल्यम्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे.

  • सेरेना विल्यम्सने पिवळ्या रंगाचा वन पीसमधील फोटो स्नॅपचॅटवर शेअर करत त्याला '२० वीक्स' असं कॅप्शन दिलं असून सेरेना २० आठवड्यांची गर्भवती आहे. याचा अर्थ जानेवारी महिन्यात सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली तेव्हा ती गरोदर होती.

  • जगातील दुस-या क्रमांकाची टेनिसस्टार सेरेना विल्यम्स गरोदर आहे.  मात्र स्नॅपचॅटवरील ही पोस्ट तिने काही वेळातच डिलीट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सेरेना पुढच्या आठवड्यातही टेनिस खेळणार असल्याचं तिच्या टीमने सांगितलं आहे. 

बाबरी विध्वंसाचा अडवाणींवर खटला
  • बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी जमीनदोस्त केली, त्या वेळी मुरली मनोहर जोशी भाजपाचे अध्यक्ष होते. भाजपाने सत्ताकांक्षेने हिंदुत्वाची घट्ट कास धरली होती.

  • लखनऊ येथील विशेष न्यायालयाने या आरोपींवरील भादंवि कलम १२०बी अन्वये कट कारस्थानाचा आरोप मे २००१ मध्ये काढून टाकला होता व अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यावर नंतर शिक्कामोर्तब केले होते.

  • अयोध्येतील बाबरी मशिदीचा कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी केलेल्या विध्वंसाच्या संदर्भात, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या भाजपाच्या दोन ज्येष्ठतम नेत्यांसह संघ परिवाराशी संबंधित एकूण १३ नेत्यांविरुद्ध कट कारस्थान रचल्याचा आरोप ठेवून खटला चालविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

राजकपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर
  • सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली.

  • राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे.

  • जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे असून चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.

दिनविशेष

जन्म, वाढदिवस

  • मोहम्मद पैगंबर, इस्लाम धर्माचा संस्थापक : २० एप्रिल ५७०

  • आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्म : २० एप्रिल ७८८

  • हिटलर जर्मनीचा हुकुमशाहा व महत्त्वाकांक्षी सेनानी : २० एप्रिल १८८९

  • गोपीनाथ मोहांती उडिया लेखक : २० एप्रिल १९१४

  • एन. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री : २० एप्रिल १९५०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • सुप्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष : २० एप्रिल १९६०

  • सुप्रसिध्द भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य : २० एप्रिल १९६८

ठळक घटना

  • न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले : २० एप्रिल १६५७

  • खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अ‍ॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली : २० एप्रिल १९९२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.