चालू घडामोडी - २० जानेवारी २०१९

Date : 20 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केनियाच्या कॉसमॉस लॅगाट ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता :
  • मुंबई : मुंबई मॅरेथॉन 2019 मोठ्या उत्साहात पार पडली. केनियाच्या कॉसमन लॅगटने 42 किमीच्या मुख्य मॅरेथॉनचं विजेतेपद पटकावलं. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू हिने बाजी मारली. मुख्य मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात नितेंद्र सिंग रावतने अव्वल स्थान पटकावलं, तर भारतीय महिला गटात सुधा सिंह विजेपदाचा मान पटकावला.

  • अर्ध मॅरेथॉनमध्ये (21 किमी) पुरुष गटात लष्कराच्या श्रीणू मुगाताने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं, तर महिला गटात मीनू प्रजापतीने बाजी मारली.

  • मुंबई मॅरेथॉनला सकाळी 5:30 वाजता सुरुवात झाली होती. सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल - महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर - नेहरु सायन्स सेंटर - सीएसटी असा मॅरेथॉनचा मार्ग होता.

  • तर अर्ध मॅरेथॉनची सुरुवात ही वरळी सी-लिंकपासून होणार असून महालक्ष्मी रेस कोर्स-विल्सन कॉलेज-वानखडे स्टेडियम-आझाद मैदान असा मार्ग होता.

  • धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबई मॅरेथॉनची ब्रँड अॅम्बेसेडर मेरी कोमसुद्धा उपस्थित होती. मेरी कोमने मॅरेथॉनचं प्लॅगऑफ केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, अनिल अंबानी, टीना अंबानी, गुलशन ग्रोवर आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.

२७ वर्षानंतर मध्य रेल्वेवर राजधानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा :
  • मुंबई : मध्य रेल्वेची ही पहिली राजधानी ट्रेन ऐतिहासिक ठरणार असून, राज्याच्या विकासासाठी मुंबई रेल मंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहायाने 75 हजार करोड एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे विकासकार्यास गती मिळणार आहे. मुंबई रेल मंडळ हे 100 टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे.

  • याचबरोबर भारतीय रेल्वे 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती  रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

  • मुंबईत रेल्वे मंडळासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहायाने करण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासन म्हणजे डबल इंजिन आहे. त्यामुळे विकासात्मक कामे जलद गतीने होत आहेत, असे यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली अवघ्या 19 तास 30 मिनीटांत पोहोचविणाऱ्या पहिल्या राजधानी रेल्वेचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून झाला.

पायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार :
  • चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या पायरसीच्या समस्येला आळा घालण्यासाठी १९५२च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चित्रपटसृष्टीच्या श्रम आणि सामर्थ्यांचा अपमान करणाऱ्या पायरसीसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज मुंबईत बोलत होते. चित्रपटक्षेत्रासाठी अडथळा ठरणाऱ्या कायद्यासंदर्भात संबंधितांनी तपशीलवार माहिती दिल्यानंतर, असे कायदे रद्द करण्याचे ठोस आश्वासन मोदी यांनी या वेळी दिले.

  • समाजात घडणाऱ्या बदलांचे प्रतिबिंब चित्रपटातही दिसत असून, बदलत्या काळात समस्यांबरोबर त्यावर तोडगा सुचवण्याचे कामही चित्रपटाद्वारे केले जात आहे. कुठलाही आव न आणता नवा विचार देण्यासाठी चित्रपट मदत करतात.

  • विचारमंथनासाठी नव्या कल्पना देतात, असे सांगून आकर्षक मांडणी केल्यास सामाजिक विषयांवरचे चित्रपटही व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरून देश उभारणीच्या कार्यातही योगदान देऊ  शकतात, असे त्यांनी सांगितले. भारतीय चित्रपट म्हणजे भारतीयत्वाचे जगातले प्रतिनिधी आहेत, भारतीयत्वाचा आरसा आहेत, अशा शब्दात त्यांनी चित्रपटसृष्टीचा गौरव केला.

५० लाख झाडे लावणा-या ‘ट्री मॅन’चे निधन :
  • ‘झाडे आपलं आई-वडिल, मुलं नातेवाईक आहेत’ असा नारा देणारे वृक्षमानव विश्वेश्वर दत्त सकलानी यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वृक्षमानव विश्वेश्वर यांनी ५० लाखांपेक्षा आधिक झाडे लावली आहेत. विश्वेश्वर यांनी यांनी आपलं संपूर्ण जिवन प्रकृतीसाठी समर्पित केले आहे.

  • विश्वेश्वर दत्त सकलानी यांनी बांज, बुरांश, सेमल, देवदारसारख्या वृक्षाचे घनदाट जंगल तयार केले. दुष्काळग्रस्त आणि पडीक जमीन त्यांनी सुजलम सुफलम बनवली. झाडामुळे ग्रामिण भागात पर्जन्यमानही वाढले.

  • विश्वेश्वर दत्त सकलानी यांचा जन्म दोन जून १९२२ रोजी झाला. लहानपणापासून ते आजी-आजोबाकडून पर्यावरण संरक्षणाच्या कथा ऐकून प्रकृतीबद्दल प्रेम आणि प्रेरणा मिळाली. त्यामुळे ८ वर्षापासून ते पर्यवरणासाठी झटले. पर्यावरणासोबत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले आहेत. देशाची अनेकवेळा तुरूंगवारीही भोगावी लागली. विशेश्वर दत्त सकलानी यांना १९ नोव्हेंबर १९८६ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी इंदिरा प्रियदर्शनी वृक्ष मित्र पुरस्कार देऊन सम्मानित केलं होतं

प्रजासत्ताक दिनाच्या परेडला मुकणार राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते विद्यार्थी :
  • नरेंद्र मोदी सरकारच्या अखेरच्या वर्षात आणखी एक समस्या उभी राहताना दिसत आहे. कारण राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारे देशभरातले 20 विद्यार्थी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहतील की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. 1957 सालपासून India Council for Child Welfare (ICCW) या एनजीओकडून शौर्य पुरस्कारांचं वितरण केलं जातं. यासाठी देशभरातून 20 मुलं निवडली जातात. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या एका निरीक्षणामुळे केंद्र सरकार यंदा स्वतः नवीन शौर्य पुरस्कार देणार असल्याचं कळतंय.

  • दिल्ली उच्च न्यायालयाने ICCW या एनजीओच्या आर्थिक धोरणांवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे एनजीओमार्फत निवड केलेल्या 20 मुलांना शौर्य पुरस्कार देण्याऐवजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांची स्थापना केली असून यासाठी 26 मुलांची निवडही करण्यात आलेली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने यासंदर्भात सरकारची बाजू स्पष्ट केली. मात्र यंदा राजपथावर होणारं संचलन अनुभवायला मिळणार की नाही हे स्पष्ट न झाल्यामुळे मुलांचा चांगलाच हिरमोड झाल्याचं कळतंय.

  • ICCW च्या अध्यक्षा गिता सिद्धार्थ यांनी याप्रकरणावर कोणतीही अधिक माहिती देण्यास नकार दिला. या विषयावर आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्रालयाला पत्र पाठवलं आहे, मात्र त्यावर अजुन कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये. मात्र निवड केलेल्या 20 मुलांना त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय नक्कीच मिळेल असा आत्मविश्वास गिता सिद्धार्थ यांनी व्यक्त केला आहे. सरकार कोणाला पुरस्कार देऊ इच्छिते हा त्यांचा प्रश्न झाला, मात्र या पुरस्कारांची सुरुवात आमच्या संस्थेने केली आहे. घडलेला प्रकार आमच्यासाठी धक्कादायक आणि निराशाजनक आहे. याप्रकरणात आम्हाला ठोस माहिती मिळाल्यानंतर आम्ही निवड झालेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना योग्य ती माहिती देऊ, गिता सिद्धार्थ यांनी माहिती दिली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.

  • १९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

  • १९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.

  • १९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.

  • १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

  • २००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.

जन्म 

  • १८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.

  • १८७१: टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)

  • १८९८: नात मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९७४)

  • १९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.

  • १९६०: १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९८०: दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)

  • १९८८: स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)

  • २००२: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचे निधन. (जन्म: १० मे १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.