चालू घडामोडी - २० जुलै २०१७

Updated On : Jul 20, 2017 | Category : Current Affairsटीम इंडियाचे ‘मिशन फायनल’, बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज उपांत्य सामना :
 • आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

 • सहा वेळेच्या विजेत्या संघाला नमवून अंतिम फेरीत धडक देण्याचे कडवे आव्हान भारतापुढे असेल.

 • भारताचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड चांगला नाही. ४२ पैकी ३४ सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला असून मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ मागील पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने खेळेल.

 • भारत विजयी झाल्यास स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक देईल. 

ऐतिहासिक संसदीय पुरस्कार सोहळा :
 • भारतातील प्रसारमाध्यमांद्वारे संसद सदस्यांना राजधानीत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून दिल्लीच्या विज्ञान भवनात लोकमतकडून पहिला संसदीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. 

 • लोकमत वृत्तपत्र समूह यापुढे दरवर्षी संसदीय पुरस्कार देणार असे भाजपाचे ज्येष्ठ नेते व लोकसभा सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि संयुक्त जनता दलाचे नेते व राज्यसभा सदस्य शरद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.

 • सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू हा पुरस्कार सुश्मिता देव (लोकसभा) व जया बच्चन (राज्यसभा) यांना देण्यात आला, तर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने मीनाक्षी लेखी (लोकसभा) व रजनी पाटील (राज्यसभा) यांचा गौरव केला.   

भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर : 
 • रामनाथ कोविंद की मीरा कुमार, भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.

 • त्यानंतर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल.

 • निवडणूक अधिकारी आणि लोकसभेचे महासचिव अनुप मिश्रा यांच्या माहितीनुसार, “सकाळी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी संसद भवनातील बॅलेट बॉक्स उघडला जाईल आणि त्यानंतर सर्व ३२ राज्यांचे बॅलेट बॉक्स उघडले जातील.

 • अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार बॅलेट बॉक्स उघडून, मतांची मोजणी केली जाईल.

 • एकूण आठ टप्प्यात मतमोजणी होईल. यानंतर निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसर निकालाची अधिकृत घोषणा करतील.”

एचपीसीएल मधील सरकारी भागीदारी ओएनजीसीला मिळणारा :
 • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) मधील सरकारची भागीदारी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी)ला विकण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

 • केंद्र सरकारने जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधली सरकारची ५१.११ टक्क्यांची भागीदारी आता ओएनजीसी विकत घेणार आहे. त्यानंतर अतिरिक्त भागीदारीसाठी कोणतीही अट ठेवण्यात येणार नाही.

 • ओएनजीसीमध्ये एचपीसीएलचे विलीनीकरण झाले तरी एचपीसीएल या ब्रँडचे नाव कायम राहणार आहे.

 • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारी भागीदारी ओएनजीसी विकत घेण्याचा व्यवहार एका वर्षात पूर्ण होणार आहे.

अणू चाचणी टाळण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला दिली होती ०५ अब्ज डॉलर्सची ऑफर :
 • १९९८ साली पाकिस्तानने अणूचाचणी करु नये यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला पाच अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती असा दावा नवाझ शरीफ यांनी केला आहे.

 • पाकिस्तानने १९९८ साली केलेल्या अणूचाचणीबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.  

 • मला पाकिस्तानची काळजी नसती, मी देशाप्रती प्रामणिक नसतो तर, मी अमेरिकेची पाच कोटी रुपयांची ऑफर स्वीकारुन अणू चाचणी केली नसती असे नवाझ शरीफ म्हणाले. 

 • भारताने तत्कालिन पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पोखरणमध्ये १९९८ साली यशस्वी अणूचाचणी केल्यानंतर पाकिस्तानात मोठया प्रमाणावर अस्वस्थतता निर्माण झाली होती. 

नागालँडच्या नवनियुक्त मुख्यमंत्रीला पक्षातून काढले :
 • एकीकडे नागा पीपल्स फ्रंटचे नेते आणि सत्तारूढ डेमोक्रेटिक अलायन्स ऑफ नागालँडचे अध्यक्ष टी.आर. झेलियांग यांचीच पुन्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागत त्यांचा शपथविधीही पार पडला.

 • एकापाठोपाठच्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे नागालँडमधील राजकीय पेचाला नवीन वळण लागले.

 • तसेच त्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा वेगवान राजकीय घडामोडी घडल्या असून, पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून झेलियांग यांची नागालँड पीपल्स फंरट या पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.

 • एकीकडे राजकीय पेच संपुष्टात आल्याचे दिसत असताना या नव्या घडामोडीमुळे नागालँडमधील राजकीय पेच अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

 • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन.

 • स्वातंत्र्य दिन : कोलंबिया.

जन्म, वाढदिवस

 • देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू : २० जुलै १९७६

 • नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता : २० जुलै १९५०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

 • आंद्रे मार्कोव्ह, रशियन गणितज्ञ : २० जुलै १९२२

 • अब्दुल्ला पहिला, जॉर्डनचा राजा : २० जुलै १९५१

ठळक घटना 

 • फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली : २० जुलै १९०३

 • भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे : २० जुलै १९४७

टिप्पणी करा (Comment Below)