चालू घडामोडी - २० जून २०१७

Date : 20 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान मोदींचे गुरु स्वामी आत्मस्थानंद यांचे निधन :
  • पंतप्रधान मोदींचे गुरु आणि रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचे १८ जून रोजी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.

  • नरेंद्र मोदी आणि स्वामी आत्मस्थानंद यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक ऋणानुबंध होते.

  • १९६६ मध्ये स्वामी आत्मस्थानंद राजकोट येथील रामकृष्ण मठाचे प्रमुख म्हणून गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी मोदी स्वामी आत्मस्थानंद यांना पहिल्यांदा भेटले होते.

  • पंतप्रधान मोदींनी वयाच्या २०व्या वर्षी स्वामी आत्मस्थानंद यांच्याकडून दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी आत्मस्थानंद यांनी दीक्षा देण्यास नकार दिला, तसेच त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारण्याचा सल्ला दिला.

  • मोदी आत्मस्थानंद यांच्या शिकवणीतून प्रभावित झाले होते, त्यामुळे त्यांनी आत्मस्थानंद यांना गुरु मानले होते.

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदासाठी भाजपाचे उमेदवार :
  • बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची अचानक राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून भाजपाने सर्वांनाच धक्का दिला.

  • दलित वर्गात मोडणाऱ्या कोळी समाजाच्या नेत्याला राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने, काँग्रेस व अन्य विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिजू जनता दलाने कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला.

  • रालोआचा उमेदवार २३ जून रोजी ठरणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपाच्या संसदीय बोर्डाने कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

  • पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषण केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोविंद यांना फोन करून त्यांचे अभिनंदनही केले.

अमेरिका भारतात बनवणार एफ-१६ फायटर जेट :
  • पूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणारी 'एफ-१६' लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या 'मेक-इन-इंडिया' योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे.

  • तसेच यासाठी 'एप-१६' विमाने बनविणारी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योग समूहातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये येथे सुरू असलेल्या 'पॅरिस एअर शो'मध्ये अधिकृत करार झाला.

  • या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनी 'एफ-१६' विमानांचे उत्पादन करणारा त्यांचा अमेरिकेच्या टेक्सास राज्यात फोर्ट वर्थ येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतरित केला जाणार आहे.

  • भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन व टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही 'एफ-१६' लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाईल.

डॉ. माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर :
  • भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर झाला.

  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी ही घोषणा केली. यावेळी ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे, विश्‍वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.

  • एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, राजर्षी शाहू जयंतीदिनी दिनांक २६ जून रोजी सायंकाळी पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल.

  • तसेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी असतील.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • ध्वज दिन : आर्जेन्टिना

जन्म, वाढदिवस

  • लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक : 20 जून १८६९

  • रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू : 20 जून १९३९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक : 20 जून १९९७

  • वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर : 20 जून १९९७

  • चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता : 20 जून २००८

ठळक घटना

  • कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले : 20 जून १७५६

  • पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना : 20 जून १९२१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.