चालू घडामोडी - २० ऑक्टोबर २०१७

Date : 21 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अफगाणिस्तानमधल्या कंधारमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 43 सैनिक ठार, 9 जण जखमी
  • अफगाणिस्तान- कंधारमधल्या लष्करी तळाला पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी घडवून आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 9 सैनिक जखमी झालेत.

  • तालिबाननं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

  • स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, तालिबानच्या दोन दहशतवाद्यांनी एका कारमध्ये बॉम्बस्फोटही घडवून आणला आहे. त्यानंतर तालिबानचे दहशतवादी व अफगाण सैन्यात चकमक झाली.

  • कंधार प्रांताचे खासदार खालिद पश्तून यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अफगाणिस्तानच्या एका सुरक्षा अधिका-यानं मृतांच्या संख्येची खातरजमा केली आहे.

प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू, २०१५चे भारतातील चित्र, अहवालातील धक्कादायक माहिती
  • नवी दिल्ली : हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.

  • यातील बहुतांश मृत्यू असंसर्गजन्य आजारातून झाले. प्रदूषणामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुफ्फुसाचा कॅन्सर, श्वसनाच्या दुर्धर आजारांमुळे बहुतांश लोक मृत्युमुखी पडले. हवेच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा वाटा राहिला.

  • २०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोक वायू प्रदूषणाला बळी पडले. पाण्यातील प्रदूषणामुळे १८ लाख लोकांना मृत्यूच्या दाढेत नेले. त्यापाठोपाठ कामाच्या स्थळी झालेले प्रदूषण धोकायदायक ठरले असून आठ लाख लोक दगावले.

  • कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९२ टक्के मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाले असल्याकडे आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या इकान स्कूल आॅफ मेडिसिनच्या संशोधकांनी लक्ष वेधले. 

 

दिल्लीत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून फटाकेबाजी, स्थिती धोकादायक
  • नवी दिल्ली : दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे.

  • प्रदूषणाचा स्तर दर्शविणा-या सरकारी ‘सफर’(सिस्टिम आॅफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च) या यंत्रणेचे चिन्ह गडद बनले आहे.

  • सदृढ आरोग्य असणा-यांवरही परिणाम करणारे असे हे प्रदूषण असून श्वसन आणि हृदयासंबंधी आजारी लोकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

  • दिल्लीत गेल्या २४ तासात पीएम २.५ आणि पीएम १० ची सरासरी अनुक्रमे ४२४ आणि ५७१ मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर असून सुरक्षित मर्यादेपेक्षा त्याचे प्रमाण अनुक्रमे ६० ते १०० पट जास्त होते.

पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी
  • जम्मू काश्मीर : पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर दिवाळी साजरी करण्याची परंपरा नरेंद्र मोदींना यंदाही कायम ठेवली. काल सकाळी पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या गुरेजमध्ये पोहचले होते. गुरेज सेक्टर सीमारेषेजवळ १५ कॉर्प्सच्या जवानांबरोबर दिवाळी साजरा केली.

  • यावेळी पंतप्रधांनी लष्करी गणवेष परिधान केला होता. मोदींनी यावेळी जवानांना आपल्या हातानं मिठाई भरवत त्यांचं तोंड गोड केलं.

  • याप्रसंगी मोदी यांच्यासोबत लष्कर प्रमुख बिपिन रावतही उपस्थित होते. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी 2014 मध्ये सियाचिनमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. 2015 च्या दिवाळीत ते डोगराई वॉर मेमोरियल येथे गेले होते. तर गेल्यावर्षी हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथील चीन सीमेवर तैनात आयटीबीपीच्या जवानांबरोबर मोदींनी दिवाळी साजरी केली होती.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन

  • जागतिक सांख्यिकी दिन

जन्म /वाढदिवस

  • भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म : २० ऑक्टोबर १९२०

  • अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म : २० ऑक्टोबर १८९१

  • वीरेंद्र सेहवाग, भारतीय क्रिकेट खेळाडू : २० ऑक्टोबर १९७८

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक दि. वि. तथा बंडोपंत गोखले यांचे निधन : २० ऑक्टोबर १९९६

  • समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन : २० ऑक्टोबर १९९९

  • पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल यांचे निधन : २० ऑक्टोबर २०१२

ठळक घटना

  • चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात : २० ऑक्टोबर १९६२

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना : २० ऑक्टोबर १९६९

  • ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर : २० ऑक्टोबर १९९५

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.