चालू घडामोडी - २० सप्टेंबर २०१७

Date : 20 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
योगी सरकारकडून सहा महिन्यांचं रिपोर्ट कार्ड सादर :
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्या सहा महिन्यातील कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला असून गेल्या सहा महिन्यात उत्तर प्रदेशातील लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून विकास कार्यांना वेग आला असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

  • योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसह सरकारच्या सहा महिन्यातील कामकाजावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन केलं.

  • मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दिवस रात्र एक करुन उत्तर प्रदेशच्या विकासाचा आराखडा तयार केला असून येत्या काळात या आराखड्यावर काम केलं जाणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

  • मार्च २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात जंगलराज होतं, हे संपवणं सरकारची प्राथमिकता होती त्यामुळेच गेल्या सहा महिन्यात उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही.

  • अन्यथा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात प्रत्येक आठवड्याला सरासरी दोन दंगलीच्या घटना होत होत्या, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीने केले कौतुक : सुषमा स्वराज ‘प्रभावशाली’
  • कामाची अभिनव पद्धत तसेच वेगवान कार्यशैलीसाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज या ओळखल्या जात असून भारतात तसेच विदेशातही त्यांच्या या कार्यशैलीचे अनेकजण कौतुक करतात.

  • नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प हिने स्वराज यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

  • सुषमा स्वराज ‘प्रभावशाली’ परराष्ट्रमंत्री डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीने केले कौतुक संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत घेतली भेट.

  • सुषमा स्वराज या प्रभावशाली परराष्ट्रमंत्री असल्याचे इंवाकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

३० सप्टेंबरपासून या सहा बँकांचे चेकबुक बंद :
  • देशातील सर्वात मोठी बँक असा लौकिक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या सहकारी बँकांच्या ग्राहकांना नव्या चेकबुकसाठी अर्ज करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संबंधीचा एक व्हिडिओही ट्विट केला असून ३० सप्टेंबरपासून आधीचे चेक आणि आयएफएस कोड अवैध मानला जाईल असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

  • या बँकांमध्ये खाती असणाऱ्या सगळ्या ग्राहकांनी लवकरात लवकर नव्या चेकबुकसाठी अर्ज करावा अशी सूचना एसबीआयने केली आहे.

  • नव्या चेकबुकसाठी ग्राहकांनी थेट बँकेत अर्ज करावा किंवा इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाईल बँकिंगचा आधार घेऊन अर्ज करावा असेही एसबीआयने स्पष्ट केले आहे.

  • ‘स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर’, ‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’, ‘स्टेट बँक ऑफ म्हैसूर’, ‘स्टेट बँक ऑफ पटियाला’, ‘स्टेट बँक ऑफ त्रावणकोर’ आणि ‘भारतीय महिला बँक’ या बँकांचे विलीनकरण एसबीआयमध्ये करण्यात आले आहे.  

भारताच्या लक्ष्मणन् चित्राला सुवर्णपदक, गोळाफेकीमध्ये तेजिंदरपालला रौप्य :
  • ५ व्या आशियाई इनडोर क्रीडा स्पर्धेत भारताचे गोविंदन् लक्ष्मणन्, पीयू चित्रा यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ३ हजार व महिलांच्या १,५०० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

  • पुरुषांच्या ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गोविंदन् लक्ष्मणन्ने ८ मिनिटे ०२.३० सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले असून तेजिंदरपाल सिंगला गोळाफेकीमध्ये रौप्य, तर कुस्तीमध्ये धर्मेंद्रला कांस्यपदकावर समाधान मानवे लागले.

  • महिलांच्या १,५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पीयू चित्राने ४ मिनिटे २७.७७ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.

  • पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात तेजिंदरपाल सिंगने १९.२६ मीटर अंतर गोळा फेकून रौप्यपदक जिंकले असून पुरुषांच्या फ्री स्टाईल प्रकारात ७० किलोगटात धर्मेंद्रने कांस्यपदक संपादन केले.

  • भारत मंगळवारपर्यंत ३ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकून नवव्या स्थानावर आहे.

GST मुळे देशाचा विकासदर ८ टक्क्यांवर जाईल :
  • जीएसटीमुळे विकासदरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता काही अभ्यासकांनी वर्तविली होती, पण जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद यांनी जीएसटी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. 

  • वस्तू व सेवा कराच्या (GST) अंमलबजावणीवरून देशात सध्या बरेच मतप्रवाह दिसत असून आधीच नोटाबंदीच्या ‘साईड इफेक्टस’मुळे सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना जीएसटी लागू झाल्याने त्याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

  • देशाच्या कररचनेत जीएसटीमुळे आमुलाग्र बदल झाला असून, या नव्या कराची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर भारताचा विकासदर ८ टक्क्यांवर जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

  • मार्च २०१७ ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७.१ टक्के इतका नोंदला गेला होता, त्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यामध्ये घट झाली आणि तो ५.७ टक्क्यांपर्यंत घसरला. 

  • त्यातच केंद्र सरकारने धाडसी पाऊल टाकत १ जुलै २०१७ पासून देशभरात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी केली असून या नव्या करामुळे केंद्राचे आणि राज्यातील विविध कर संपुष्टात आले आहेत आणि जीएसटी हा एकमेव कर लागू झाला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • राष्ट्रीय युवक दिन : थायलंड

जन्म /वाढदिवस

  • नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार : २० सप्टेंबर १८९७

  • द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक : २० सप्टेंबर १९२२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदि

  • ऍनी बेझंट, ब्रिटिश, भारतीय समाजसुधारिका : २० सप्टेंबर १९३३

  • दया पवार, मराठी साहित्यिक : २० सप्टेंबर १९९६

​​​​​​ठळक घटना

  • व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश : २० सप्टेंबर १९७७

  • एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले : २० सप्टेंबर २००४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.