चालू घडामोडी - २१ एप्रिल २०१७

Date : 21 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जी. श्रीकांत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी :
  • नागरी सेवा दिनानिमित्त २१ एप्रिल रोजी मुंबईतील 'सह्याद्री' राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
  • राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे.
  • उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनामार्फत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिन प्रताप सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
आशियाई स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व दुती चंदकडे :
  • जियाजिंग आणि जिन्हुआ येथे अनुक्रमे २४ आणि २७प्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. यानंतर अंतिम सत्र ३० एप्रिलला चिनी तैपई येथे होईल.

  • भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां.प्री. २०१७ च्या तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ चीनला रवाना होणार आहे.

  • ४०० मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचिओन आशियाई क्रीडा 2014 क्रीडा स्पर्धेत ४०० मी. शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील.

राज्यात सिंचनाचा विक्रम मोडला :
  • खरिप व रब्बी हंगाम मिळून ३७.२२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली तर, सध्याच्या उन्हाळी हंगामात २ लाख ८० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जात आहे.

  • आधी २०१२ मध्ये ३२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. राज्यात २०१६-१७ या वर्षात आजवरचे सर्वाधिक कृषी सिंचनाचा आकडा गाठण्यात यश आले आहे. यंदा तब्बल ४० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. हा आजवरचा विक्रम आहे.

  • खरिप व रब्बी हंगाम मिळून ३७.२२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली तर, सध्याच्या उन्हाळी हंगामात २ लाख ८० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जात आहे.

टी-२० क्रिकेटचा पहिला 'दस हजारी' खेळाडू ख्रिस गेल :
  • आयपीएलमध्ये गुजरातविरुद्ध लौकिकास साजेशी फलंदाजी करताना ख्रिस गेल ही कामगिरी केली असून आयपीएलच्या नव्या मोसमात गेलची फटकेबाजी प्रथमच बघायला मिळाली. त्यानंतर गेलने स्वतःचे 'युनिव्हर्स बॉस' असे वर्णन करताना प्रतिस्पर्धी संघांना आपल्याला फॉर्म गवसल्याचा जणू इशाराच दिला.

  • झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वप्रथम दहा हजार धावा करण्याचा विक्रम केला.

  • तसेच या सामन्याचा मानकरी ठरल्यावर गेल म्हणाला,'मी अजूनही विश्‍वविजेता आहे आणि जिवंत आहे. मला विश्‍वविजेता म्हणवून घ्यायला आवडते.'

  • गेलची आकडेवारी -२९० सामने, १०,०७४१ धावा, १४९.५११ स्ट्राईक रेट, १८ शतके, ७६९ चौकार, ७४३ षटकार

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • ज.द. गोंधळेकर (जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर), मराठी चित्रकार : २१ एप्रिल १९०९

  • एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी : २१ एप्रिल १९२६

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन 

  • कवी सर मुहम्मद इकबाल : २१ एप्रिल १९३८

ठळक घटना 

  • शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट : २१ एप्रिल १६५९

  • नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला : २१ एप्रिल १९३२

  • भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी : २१ एप्रिल १९९७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.