चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ एप्रिल २०१९

Date : 21 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जळगावात बचत गटाच्या महिलांचा ‘अब की बार मोदी सरकार’चाच नारा :
  • देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच बसावेत अशी इच्छा जळगावातल्या महिलांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातले अनेक प्रश्न सोडवले आहेत. महिला वर्गाला भेडसावणारे प्रश्नही त्यांनी काही प्रमाणात सोडवले आहेत. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की त्यांनीच पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसावे.

  • जळगावात खान्देश पापड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पापड महोत्सवात जळगाव, रावेर येथील महिलांचा समावेश आहे. या सगळ्या महिलांशी लोकसत्ता ऑनलाईनने संवाद साधला, यावेळी त्यांनी ‘अब की बार मोदी सरकार’चाच नारा दिला.

  • जळगावाच्या पापड महोत्सवात आलेल्या दीपाली पोटे सांगतात, मोदींनी सुरू केलेली उज्ज्वला योजना फायद्याची आहे त्यामुळे गावोगावी गॅस पोहचला. त्यांना आणखी एकदा संधी दिली तर ते निश्चितच लोकाभिमुख कामं करतील तसेच महिलांसाठीचे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न सोडवतील. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय निर्मिती करण्यात येते आहे. त्यामुळेही महिलांना मोठा आधार मिळतो आहे, असंही त्या म्हणाल्या. नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला हा निर्णय देशहिताचा आहे असंही पोटे यांनी सांगितलं.

  • याच पापड महोत्सवात सुरतहून आलेल्या वर्षा वाणी यांनीही मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाच विजयी होईल अशी खात्री आहे. असंही त्या म्हणाल्या. एक चौकीदार म्हणून मोदी देशासाठी जे कार्य करत आहेत ते आजपर्यंत कोणीही केलं नाही. एक चहावाला देशाचा पंतप्रधानपदापर्यंत जाऊन पोहचला याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. आयुष्यमान कार्ड, माँ कार्ड, सुकन्या योजना, पंतप्रधान आवास योजना या सगळ्या योजनांचा आम्हाला फायदा होतो आहे असंही वाणी यांनी सांगितलं.

श्रीलंका स्फोट - भारतीयांना हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन :
  • श्रीलंकेत झालेल्या साळखी बॉम्बस्फोटामुळे भारतातूनही चिंता व्यक्त केली जात आहे. कारण, श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात. आत्तापर्यंत या स्फोटात कोणत्याही भारतीय व्यक्तीचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, जर कोणाला मदतीची गरज पडली तर त्यांनी श्रीलंकेतील भारतीय दुतावासाशी अथवा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. मंत्रालय श्रीलंकेतील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.

  • श्रीलंकेतील भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. +94777903082, +94112422788, +94112422789 या श्रीलंकेतील क्रमांकांवर तसेच भारतातील +94777902082 +94772234176 या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • श्रीलंकेतील या साखळी स्फोटांमध्ये आत्तापर्यंत १५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३५ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर तीनशेपेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखीनच वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय माध्यमांनी व्यक्त केली आहे.

पीएम नरेंद्र मोदी प्रदर्शित व्हावा यासाठी विवेक ओबेरॉयचं साईचरणी साकडं :
  • शिर्डी : अभिनेता विवेक ओबेरॉय स्टारर 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी सिनेमाच्या टीमने साईचरणी साकडं घातलं. अभिनेता विवेक ओबेरॉय , निर्माते संदीप सिंह , मनीष आचार्य यांनी साई दरबारी जाऊन साईबाबांना प्रार्थना केली.

  • ओमंग कुमार दिग्दर्शित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर त्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली. 22 एप्रिल रोजी या प्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्मात्यांनी शिर्डीच्या साईबाबांना साकडं घातलं.

  • पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट संघर्षाची कहानी आहे. चित्रपटाच्या ट्रेलर पाहून भ्रमित न होता विरोध करणाऱ्यांनी आधी आमच्यासोबत चित्रपट पाहावा. आक्षेप घेणारे राहुल गांधी, राज ठाकरे, उर्मिला मातोंडकर, विशाल भारद्वाज या सर्वांना हा चित्रपट पाहाण्याच आवाहन विवेकने केलं आहे.

  • दरम्यान विवेकला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. 'मोदी मोदी' अशा घोषणा देत चाहते विवेकसोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी धडपड करताना दिसून आले.

छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त :
  • बिजापूर -  छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

  • जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पामेड परिसरात ही चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

  • छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या कुआकोंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धनिकरका वन क्षेत्रात गुरुवारी (18 एप्रिल) चकमक झाली होती. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर चकमकी दरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीसचा समावेश होता. वर्गीसवर पाच लाखांचे बक्षिस होते. 

दिनिशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.

  • १९७२: अपोलो -१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.

  • १९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.

  • २०००: आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.

जन्म 

  • १८६४: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९२०)

  • १९२२: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७)

  • १९२६: इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.

  • १९३४: महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्म.

  • १९४५: भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.

  • १९५०: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५०९: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १४५७)

  • १९१०: अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५)

  • १९३८: पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ सर मुहम्मद इक्बाल यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

  • १९४६: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८३)

  • १९५२: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८८९)

  • २०१३: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.