चालू घडामोडी - २१ ऑगस्ट २०१८

Date : 21 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान मोदी यांना संघाचे समर्थन :
  • नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी संपूर्ण यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेगुजरातमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीत घेतला.

  • माओवादी विरोधी आॅपरेशन यशस्वी झाल्याने, ख्रिश्चन मिशनऱ्यांना उत्तरदायी बनविल्याने आणि जम्मू- काश्मिरात मेहबूबा मुफ्ती सरकारपासून वेगळे झाल्यामुळे आरएसएस नेतृत्व मोदी सरकारवर खूश आहे. अनेक दशकांपासून लढणाºया आरएसएस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे.

  • आरएसएसच्या ज्येष्ठ सदस्याने ‘लोकमत’ला सांगितले की, मोदी सरकारच्या यशासाठी आरएसएसचे कार्यकर्ते देशभरात काम करतील. यावर्षी मार्चमध्ये आरएसएस प्रतिनिधी सभा, निर्णय घेणारी समिती, प्रमुख संघटना व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सादरीकरण केले होते. हिंदंूना होणाºया त्रासाबाबत पूर्णवेळ प्रांत प्रचारकांसह २०० प्रतिनिधींनी सोमनाथमध्ये तीन दिवस विचारमंथन केले होते. या सर्वांनी एका आवाजात सांगितले की, मोदी सरकार हिंदू आणि आरएसएसच्या हितासाठी आहे.

  • सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस भैय्याजी जोशी व सर्व सहा संयुक्त सरचिटणीस दत्तात्रय होसबळे, कृष्णा गोपाल, मनमोहन वैद्य आदींची या बैठकीला उपस्थिती होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आगामी निवडणुकीची आरएसएसची भूमिका परस्परविरोधी आहे. त्यावेळी अटलबिहारी आणि अडवाणी यांच्या काळात आरएसएसने भाजपसाठी मन लावून काम केले नव्हते.

पंतप्रधान निवासाऐवजी इम्रान खान राहणार लष्कर सचिव निवासात :
  • इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी शासकीय पंतप्रधान निवासात राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान निवासाऐवजी लष्कर सचिव निवासात इम्रान खान राहणार आहेत.

  • बानिगाला येथील माझ्या स्वत:च्या घरी राहणार असल्याचे इम्रान खान यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या जिवाला धोका असल्याने त्याठिकाणी न राहण्याचा सल्ला गुप्तचर संस्थांनी दिला. त्यानंतर इम्रान खान यांनी लष्कर सचिव निवासात राहण्याचा निर्णय घेतला. लष्कर सचिव निवास 3 बेडरूम्सचा आहे.  

  • देशासमोर अनेक समस्या आहेत. बेकारी आणि भ्रष्टाचार या दोन समस्या दूर करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही इम्रान खान यांनी सांगितले. देशात काही जणांकडे खर्च करायला पैसा नाही, तर दुसरीकडे काही जण बादशाही थाटात राहत असल्याचे पाहायला मिळते.

  • सध्या पंतप्रधान निवासात 224 नोकर आणि 80 मोटर गाड्या आहेत, 33 बुलेटप्रुफ कार, हेलिकॉप्टर आणि विमान आहे. मात्र, माझ्याजवळ फक्त 2 नोकर आणि 2 मोटरगाड्या ठेवणार असून बाकी बुलेटप्रुफ कार लिलावात विकून टाकणार असल्याचेही इम्रान खान म्हणाले. 

दररोज ५५ रुपये वाचवून काढा १० लाखांचा विमा, पोस्टाची सुपरहिट योजना :
  • नवी दिल्ली- तुम्हाला तर माहितीच असेल महिन्याभरात पोस्ट ऑफिसची बँक लाँच होणार आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, पोस्ट ऑफिस तुम्हाला विमा संरक्षणही देतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण भारतात जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा 1 फेब्रुवारी 1884ला Postal Life Insurance ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

  • सद्यस्थितीत PLI (Postal Life Insurance) योजनेंतर्गत 43 लाखांहून अधिक पॉलिसी होल्डर आहेत. या योजनेंतर्गत तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकता. वर्षं 1894मध्ये या योजनेंतर्गत पोस्टल अँड टेलिग्राफ विभागाशी संबंधित असलेल्या महिला कर्मचा-यांना विमा संरक्षण देण्यात आलं होतं. त्या काळात इतर कोणतीही कंपनी महिलांना विमा संरक्षण देत नव्हती. 

  • पोस्ट ऑफिसनं PLI अंतर्गत दोन प्रकारचे प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले होते. 

  • Whole Life Assurance (Surksha): PLIच्या या योजनेला सुरक्षेच्या नावानंही ओळखलं जातं. या योजनेंतर्गत विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याचा बोनस आणि निश्चित रक्कम त्याच्या उत्तराधिका-याला मिळते. या योजनेसाठी कमीत कमी 19 ते जास्तीत जास्त 55 वर्षांच्या व्यक्ती पात्र असतात. PLI या योजनेंतर्गत मर्यादित काळासाठी 20 हजार रुपयांपासून 10 लाखांपर्यंत तुम्ही रक्कम ठेवू शकता.

  • Endowment Assurance (Santosh): Postal Life Insurance या योजनेला संतोष नावानंही ओळखलं जातं. या योजनेंतर्गत विमा संरक्षण धारकाला मर्यादित काळानंतर बोनससह त्यानं भरलेली रक्कम परत मिळते. विमा संरक्षण धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदाराला ती रक्कम दिली जाते. 

अंधत्वावर मात करत जयंतचं यूपीएससीत यश, नियुक्तीसाठी संघर्ष सुरुच :
  • नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत आपल्या अंधत्वावर मात करत यश मिळवणाऱ्या जयंत मंकले या विद्यार्थ्यावर आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेल्या पोस्टसाठी सरकार दरबारी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षी झालेल्या यूपीएससी परीक्षेत जयंतने संपूर्ण देशातून 923वा क्रमांक पटकावला.

  • मात्र या यशानंतरही केवळ त्याच्या अंधत्वामुळे यूपीएससी त्याला कुठलीच पोस्ट सध्या द्यायला तयार नाही. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पोस्टमधील काही पोस्ट भरल्या गेलेल्या नाहीत. तरीही हा प्रकार सुरू आहे. याचं कारण सांगितलं जातंय ते देखील संतापजनक आहे.

  • सध्या ज्या पोस्ट रिक्त आहेत, त्या पूर्ण अंधत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाहीत. त्या जागांवर ते काम करू शकणार नाही. इंडियन फॉरेन सर्विस, इंडियन रेल्वे पर्सनल इंडियन सिव्हिल अकाउंट सर्विस या सेवा रिक्त असूनही त्या दिल्या गेलेल्या नाहीत.

  • विशेष म्हणजे यूपीएससी परीक्षा घेताना दृष्टिहीन विद्यार्थ्यांमध्ये कमी अंधत्व, पूर्ण अंधत्व असा भेद करत नाही. मग नेमका पोस्ट देतानाच हा भेद का? आणि उलट पूर्ण अंध असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास करण्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागतो, ही बाब प्रशासनाच्या डोक्यात शिरायला तयार नाही. त्यामुळे आता आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी जयंतनं पंतप्रधानांना साकडे घालायचे ठरवलं.

  • दिव्यांग शब्द आणून अपंगांबद्दलची आपली संवेदना दाखवणारे पंतप्रधान आता या प्रकरणाकडे गांभीर्याने बघून जयंतला न्याय मिळवून देणार का हा प्रश्न आहे. यूपीएससी परीक्षेत आपल्या अपंगत्वावर मात करत जिद्दीने यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने झगडावे लागल्याची याआधीही उदाहरणे आहेत.

‘गगनयान’ मोहिमेची धुरा महिला वैज्ञानिक सांभाळणार :
  • नवी दिल्ली : अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केली. आता या मोहिमेची जबाबदारी एका महिलेच्या हाती सुपूर्द करण्यात येणार असून इस्रोच्या या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या ३० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत.

  • गगनयान मोहिमेपूर्वी जीएसएलव्ही-३च्या आधारे दोन मानवरहित मोहिमा हाती घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. गगनयान मोहिमेसाठी डॉ. ललिथंबिका त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चमूची लवकरच निवड करणार असून कामाची आखणीही करणार आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत पहिला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • गगनयान मोहिमेअंतर्गत पाठविण्यात येणार अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, या प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, या प्रकल्पामध्ये विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही बोलले जात आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.

स्वदेशी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :
  • भारताने रविवारी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये हेलिकॉप्टरवरून डागता येणाऱ्या रणगाडाविरोधी हेलिना या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हेलिना हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता अनेक पटींने वाढणार आहे. जैसलमेरच्या चंदन रेंजवर घेण्यात आलेली गाइडेड बॉम्बची चाचणीही यशस्वी ठरली आहे.

  • चीन आणि पाकिस्तान यांच्याविरोधात ही दोन्ही शस्त्रे मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, हेलिना क्षेपणास्त्राने अत्यंत अचूकतेने आपले लक्ष्य भेदली. टेलिमेण्ट्री स्टेशनपासून या क्षेपणास्त्राच्या संपूर्ण प्रवासावर लक्ष ठेवण्यात आले होते.  सध्या जगातील हे सर्वात अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.

  • डीआरडीओ आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या चाचणीच्या वेळी हजर होते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही यशस्वी चाचण्यांबद्दल डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. यामुळे भारतीय सैन्यदलाची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.

  • १९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.

  • १९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.

  • १९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

जन्म

  • १७६५: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १८३७)

  • १८७१: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)

  • १९०७: भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)

  • १९०९: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २०००)

  • १९१०: जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)

  • १९२४: गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००१)

  • १९३४: महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००१)

  • १९६३: मोरोक्कोचा राजा मोहम्मद (सहावा) यांचा जन्म.

  • १९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.

  • १९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म.

  • १९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक टायलर विंकलेवॉस यांचा जन्म.

  • १९८६: जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म.

मृत्यू

  • १९३१: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)

  • १९७७: एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी यांचे निधन.

  • १९८१: गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन. (जन्म: १ डिसेंबर १८८५ – सातारा, महाराष्ट्र)

  • १९९१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १९१४)

  • १९९५: नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)

  • २०००: समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.

  • २०००: स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.

  • २००१: मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)

  • २००१: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन.

  • २००६: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खाँ यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.