चालू घडामोडी - २१ जुलै २०१८

Date : 21 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तानच्या फखर जमानचं वनडेत द्विशतक :
  • नवी दिल्ली : पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने जिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावलं आहे. जिम्बाब्वेविरुद्ध खेळताना फखरने 210 धावांची खेळी केली. फखर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा सहावा फलंदाज ठरला आहे. भारताच्या रोहीत शर्माच्या नावावर सर्वाधिक 3 द्विशतक आहेत.

  • जिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील क्विन स्पोर्ट्स क्लबमधील चौथ्या सामन्यात फखरने 156 चेंडूत 5 षटकार आणि 24 चौकारांच्या मदतीने 210 धावा ठोकल्या. फखरच्या द्विशतकाच्या जोरावर पाकिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 399 धावांचा डोंगर उभा केला.

  • पाकिस्तानकडून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम फखरने आपल्या नावे केला आहे. याआधी 1997मध्ये भारताविरुद्ध सईद अनवरने 194 धावांची खेळी केली होती.

  • याशिवाय एकदिवसीय सामन्यांमधील 399 ही पाकिस्तानची सर्वोच्च धावसंख्याआहे. याआधी बांगलादेशविरुद्ध 2010साली 385/7 ही पाकिस्तानची सर्वोच्च धावसंख्या होती.

  • याच सामन्यात फखर आणि इमाम-उल-हक (113 धावा) यांनी 304 धावांची पार्टनरशिप केली. एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च पार्टनरशिप आहे. याआधी श्रीलंकेच्या सलामीची जोडी उपुल थरंगा आणि सनथ जयसु्र्याने इंग्लंडविरुद्ध 286 धावांची पार्टनरशिप केली होती.

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात :
  • नवी दिल्ली : देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशात २०१६साली शेतकरी व शेतमजूर मिळून ११,३७० जणांनी आत्महत्या केली. त्यातील ३६६१ महाराष्ट्रातील होते. ही धक्कादायक आकडेवारी सरकारने संसदेत दिली.

  • राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण ब्युरोने (एनसीआरबी) २०१६ साठी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी संबंधित हंगामी माहिती दिली. तीत म्हटले आहे की, महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्य आहे. तेथे २०७९ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली. तिसºया क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. तेथे २०१६ मध्ये शेतकरी व शेतमजूर मिळून १३२१ आत्महत्या झाल्या आहेत.

  • वेगवेगळ््या राज्यांतील शेतकºयांच्या आत्महत्या जास्तही असू शकतात. कारण ही तात्पुरती आकडेवारी आहे. सविस्तर अहवाल बनवण्यासाठी आणखी बारकाईने अभ्यास केल्यास आकड्यात बदल होऊ शकतो. शेतकरी आत्महत्येचा विषय संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला. त्यात तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांच्यासह इतर खासदारांचा समावेश होता.

  • एनसीआरबीने दिलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शेतीच्या कामात सक्रिय असलेले ११११ मजूर आणि २५५० शेतकºयांनी आत्महत्या केली.

  • गोव्यात फक्त एका शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देशात आठ राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत याच कालावधीत एकही अशी आत्महत्या झाल्याचे समोर आलेले नाही. ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत बिहार, लक्षद्वीप, दमण-दीव, दादरा- नगर हवेली, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम बंगाल, नागालँडचा समावेश आहे.

विरोधकांचा पराभव ही २०१९ ची झलक : अमित शाह :
  • नवी दिल्ली : संसदेतील अविश्वास ठरावातील विरोधकांचा पराभव ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीची झलक आहे. यातून मोदी सरकारच्या ‘सबका साथ सबका विकास’चा विश्वास दिसून येतो, असं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे. शिवाय हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याचंही ते म्हणाले.

  • अविश्वास ठराव पडल्यानंतर अमित शाहांनी ट्वीट केलं. ''मोदी सरकारचा हा विजय लोकशाहीचा विजय आहे आणि घराणेशाहीच्या राजकाराणाचा पराभव आहे,'' असं अमित शाह म्हणाले.

  • ''घराणेशाहीचं राजकारण आणि जातीवादाला चालना देणाऱ्या काँग्रेसचा पुन्हा एकदा गरीब कुटुंबातून येणाऱ्या पंतप्रधान मोदींविषयीचा तिरस्कार उघड झाला,'' असल्याची टीका अमित शाहांनी केली.

  • ''जनतेच्या विश्वासावर अविश्वास दाखवणाऱ्या अहंकाराचा लोकसभेत जो पराभव झाला, तो 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाची झलक आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्रामुळे केवळ मोदींवर सहकाऱ्यांचाच नाही, तर देशाचा विकास आहे,'' असं अमित शाह म्हणाले.

  • ''काहीही मुद्दा हातात नसताना आणि बहुमत नसताना अविश्वास ठराव आणून काँग्रेसने आपली राजकीय दिवाळखोरी जाहीर केली. शिवाय लोकशाहीला पायदळी तुडवण्याच्या आपल्या इतिहासाचीही पुनरावृत्ती केली. सरकारवर देशाचा पूर्ण विश्वास आहे,'' असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

रामानाथन उपांत्य फेरीत :
  • नवी दिल्ली : भारताच्या रामकुमार रामानाथनने कॅनडाच्या वासेक पोस्पिसिलचा पराभव करीत प्रथमच एटीपी उपांत्य फेरी गाठली तर लिएंडर पेस दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे न्यूपोर्ट हॉल आॅफ फेम ओपन ग्रासकोर्टमधून बाहेर झाला.

  • चेन्नईच्या २३ वर्षीय रामानाथनने १ तास १८ मिनिट रंगलेल्या लढतीत पोस्पिसिलचा ७-५, ६-२ ने पराभव केला. आता त्याला अमेरिकेच्या टीम स्मिजेकच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या डोमिनिक थियेमचा पराभव करणाऱ्या रामानाथनने पाच एस लगावले आणि तीन ब्रेक पॉर्इंट मिळवले.

  • पेस व अमेरिकेचा त्याचा सहकारी जैमी सेरेतानी यांना जीवन नेदुंचेझियान व आॅस्टिन क्राइसेक यांच्याविरुद्ध ६-३, ७-६ ने पराभव स्वीकारावा लागला. आता जीवन व आॅस्टिन यांना स्पेनच्या मार्सेलो अरेवालो व मेक्सिकोच्या मिगुल एंजेल रेयेस वारेला या चौथ्या मानांकित जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

  • दिवीज शरण व त्याचा सहकारी जॅक्सन विथ्रो यांनी आॅस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन व युक्रेनचा सर्जेई स्टाखोवस्की यांचा ७-६, ६-३ ने पराभव केला. आता त्यांना पुढच्या फेरीत न्यूझीलंडचा अर्टेम सिटाक व इस्रायलचा जोनाथन एलरिच यांच्यासोबत लढत द्यावी लागेल.

  • अर्टेम व जोनाथन यांनी भारताचा पूरव राजा व ब्रिटेनचा केन स्कुपस्की यांचा ४-६, ६-३, १०-८ ने पराभव केला. 

‘राफेल’चा तपशील जाहीर करता येणार नाही, राहुल गांधींच्या आरोपानंतर फ्रान्सचं उत्तर :
  • लोकसभेत अविश्वास ठरावादरम्यान राफेल विमानांच्या करारावर राहुल गांधी यांच्या गंभीर आरोपांनंतर नवा वाद सुरू झाला आहे. ‘मी फ्रान्सच्या अध्यक्षांना दिल्लीत भेटलो होतो व त्यांनी दोन्ही देशांत राफेलबाबत कुठलाही गुप्तता करार नाही, असा खुलासा केला होता’, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

  • तसंच राफेल विमानांच्या करारातील गुप्ततेच्या अटीबाबत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन खोटं बोलत आहेत, असा आरोप केला. राहुल गांधी यांचं भाषण संपताच यावर फ्रान्सकडून प्रतिक्रिया आली.

  • राफेल विमानांबाबत तपशील जाहीर करायचा नाही असा फ्रान्स व भारत यांच्यातील करार आहे. २००८ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या सुरक्षा करारानुसार दोन्ही देश गोपनिय माहिती सार्वजनिक करु शकत नाहीत, आमचे हात कायद्याने बांधले आहेत.

  • या कराराचा तपशील जाहीर केल्यास सुरक्षेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, हा तंत्रज्ञान संवेदनशील करार असून व्यावसायिक स्पर्धेमुळे त्याचा तपशील जाहीर करता येणार नाही. असं स्पष्टीकरण फ्रान्सकडून देण्यात आलं आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • इ.स. पूर्व ३५६: जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.

  • १९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.

  • १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.

  • १९८३: अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.

  • २००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

जन्म 

  • १९९४: मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.

  • १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.

  • २००१: दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९२८)

  • २००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.

  • २००९: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१३)

मृत्यू 

  • १८५३: ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल१८९८)

  • १८९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१)

  • १९१०: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९९०)

  • १९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)

  • १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.

  • १९४७: सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.