चालू घडामोडी - २१ जून २०१७

Date : 21 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान मोदींचा लखनौत योग :
  • जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखनौमध्ये हजेरी लावली.

  • लखनौमध्ये लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘स्वस्थ मनानं जगण्याची कला ही फक्त योगमधून मिळते. आज संपूर्ण जगात योग दिवस उत्साहात साजरा करत आहेत.’

  • ‘ज्या पद्धतीनं जेवण्याच मीठाचं महत्त्व असतं तेवढंच महत्त्व आपल्या जीवनात योगाचं आहे. सुखी राहण्यासाठी योगचं महत्त्व मोठं आहे.’ असंही यावेळी मोदी म्हणाले.

  • दुसरीकडे अहमदाबादमध्ये खुद्द योगगुरु रामदेव बाबांसोबत भाजपाध्यक्ष अमित शहांनी योगासनं केली. तर नागपूरमध्ये केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींनी हजेरी लावली.

अमिताभ बच्चन जीएसटीचे नवे ब्रँड अँबेसिडर :
  • बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून काम पाहणार आहेत.

  • जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी बच्चन यांच्यावर सोपविली आहे.

  • केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमा शुल्क (सीबीडीटी) विभागाने याबाबत माहिती दिली.

  • बच्चन यांच्यासोबत ४० सेकंदांची जाहिरातीचे याआधीच चित्रीकरण करण्यात आले आहे.

  • तसेच या आधी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू जीएसटीची ब्रॅंड अँबेसिडर होती.

अमेरिका पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करण्याची शक्यता : 
  • अफगाणिस्तानला वारंवार लक्ष्य करणा-या पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच ट्रम्प प्रशासनाने केले आहेत.

  • पाकिस्तानकडून सीमारेषेवर अफगाणिस्तान सैन्याला करण्यात येणा-या लक्ष्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

  • अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांत (ड्रोन) वाढ करण्याची शक्यता असून, पाकिस्तानला दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीवर गधा आणण्याची भूमिका अमेरिका घेण्याची शक्यता आहे,

  • अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास १६ वर्षे पूर्ण झालीत. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प प्रशासनाकडून याचा पुनर्अभ्यास केला आहे. 

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवास :
  • निरोगी आरोग्यासाठी योगा हा सगळ्यात रामबाण उपाय आहे. शरीरामध्ये तसेच आपल्या विचारांमध्ये पॉसिटीव्ह एनर्जी निर्माण व्हावी यासाठी योगा करा असा सल्ला आपण नेहमीच ऐकत असतो.

  • इतकच नाही, तर योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राजकीय नेते तसंच सेलिब्रेटीही पुढाकार घेतात. योगाचा हा प्रचार आणि प्रसार सध्या चालू आहे.

  • पण विशेष म्हणजे जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्याचे संपूर्ण श्रेय हे भारताला जाते.  

  • भारतातील ५००० वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते, असे जाणकार सांगतात.

  • योगाची हीच प्राचीन परंपरा जपायला हवी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊल उचलली होती. नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला लगेचच तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्थानी दोन वर्ल्डकप :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारताच्या यजमानपदाखाली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा स्थगित करीत त्याच्या जागी चार वर्षांच्या कालावधीत दोन टी-२० विश्वकप स्पर्धांच्या आयोजनाचा विचार करीत आहे.

  • आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी ही माहिती दिली. रिचर्डसन म्हणाले, पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२१ मध्ये होईलच, याची हमी देता येणार नाही. याबाबत आयसीसीच्या वार्षिक  बैठकीमध्ये या आठवड्यामध्ये चर्चा होईल. आम्ही विश्व स्पर्धेंदरम्यान पुरेसे अंतर ठेवण्यास प्रयत्नशील आहोत. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२१ मध्ये भारतात होणार आहे.

  • तसेच जर चार वर्षांत दोन टी-२० विश्वकप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रद्द करावी लागेल.

निम्न तापी लाभक्षेत्रात उपसा सिंचन योजना :
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

  • तसेच या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच उपसासिंचन योजना शासकीय खर्चाने राबविण्याच्या सुमारे ६२१.६८ कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्‍यातील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

  • तापी नदीवर मौजे पाडळसे गावाजवळ निम्न तापी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे ५०२.०९ दलघमी एवढा पाणीसाठा होणार असून ६३ हजार ५६३ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या  प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात या प्रकल्पात लाभधारक शेतकऱ्यांनी वैयक्तिक अथवा सामूहिक पद्धतीने स्वत:च्या खर्चाने पाणी उपसा करून शेतीसाठी वापरण्याची तरतूद आहे.

रामनाथ कोविंद यांचा विजय सहज शक्य :
  • भाजपाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना निवडून येण्यात अडचणी दिसत नसतानाच, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण दिसत आहे.

  • या दोन्ही नेत्यांनी दलित उमेदवार असलेल्या कोविंद यांच्याविषयी अनुकूल मत व्यक्त केल्यामुळे, विरोधी मतांमध्ये फूट पडण्याची शंका काँग्रेसला वाटत आहे.

  • केंद्रात सत्तेत नसलेले, पण राज्यांत भाजपासमवेत असलेले पक्षही कोविंद यांनाच मते देतील, असा दावा आहे. त्यातच वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय समिती ही दक्षिणेकडील पक्ष व बिजू जनता दल या पक्षांचा पाठिंबा लक्षात घेता कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

  • अण्णा द्रमुकही त्याच वाटेने जाऊ शकेल. राजद, जनता दल (यू), लोक दल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्या भूमिका स्पष्ट नसल्या, तरी यापैकी काही पक्ष कोविंद यांनाच मते देतील, अशी भाजपा नेत्यांना खात्री आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.

  • दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.

  • आंतरराष्ट्रीय योग दिवस/आंतरराष्ट्रीय योग दिन.

जन्म, वाढदिवस

  • सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक : २१ जून १९२३

  • बेनझीर भुट्टो, पाकिस्तानची पंतप्रधान : २१ जून १९५३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक : २१ जून १९४०

  • अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता : २१ जून १९८४

ठळक घटना

  • अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली : २१ जून १९८९

  • पी.व्ही. नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी : २१ जून १९९१

    Whatsapp Group

    © Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

    Made with ❤ in India.