चालू घडामोडी - २१ मार्च २०१९

Date : 21 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी विश्वासमत जिंकलं :
  • पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 'मगो'चे सुदिन ढवळीकर आणि 'गोवा फॉरवर्ड'च्या विजय सरदेसाई यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप आघाडी सरकार स्थिर राहावं, यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला भाजपने स्वीकारला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

  • भाजपने प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना विजय सरदेसाई आणि सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रीपदे देण्यात आली असल्याची घोषणा केली होती. आज संध्याकाळी त्याचा आदेश जारी करण्यात आला.

  • दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सावंत यांच्या बाजूने 20 आमदारांनी मतदान केलं. तर 15 जण त्यांच्या विरोधात गेले. त्यामुळे सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं. महाराष्ट्र गोमांतक, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी साथ दिल्याने सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

  • मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपने प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली. हे पद कायम राखण्यासाठी सावंत यांना विश्वासदर्शक ठराव जिंकणं गरजेचं होतं. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांनी मतदान केल्यानं सावंत यांचं मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे.

जाणून घ्या, देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत कशी साजरी केली जाते होळी :
  • बरसनामध्ये होळी-रंगपंचमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी 16 मार्चला 'लाठीमार होळी' साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'लाठीमार होळी'चा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक आले होते.

  • कृष्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथुरा-वृदांवनमध्ये फुलांची होळी खेळली जाते. इथेही लाठीमार होळीसारखीच फुलांची होळी केली जाते. इथे होळीची सुरुवात बिहारी मंदिरमधून होते. 17 मार्चपासून इथे फुलांच्या होळीला सुरुवात होईल.

  • पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतनमध्येही होळी वसंत उत्सवाच्या नावानं साजरी केली जाते. बंगालच्या संस्कृतीचं एक खास वैशिष्ट्य आहे. विश्व भारती युनिव्हर्सिटीत होळी खेळली जाते, त्याची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांनी केली आहे.

  • पंजाबमधल्या आनंदपूर साहिबमध्ये होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवात शीख समुदायातील लोक कुस्ती, मार्शल आर्ट्स आणि तलवारबाजीची कसरत करतात.

  • होळीच्या पूर्वसंध्येला उदयपूरमध्ये जोरदार तयारी केली जाते. याला रजवाडा शाही होळी संबोधलं जातं. इथे शाही अंदाजात होळी साजरी केली जाते. या उत्सवानिमित्त शाही यात्रा काढली जाते, त्यात घोडे, हत्तीपासून रॉयल बँडचा समावेश असतो.

  • जयपूरमध्ये होलिका दहनाबरोबरच रंगपंचमीला सुरुवात होते. यावेळी शाही परिवारसोबत सामान्य लोक होळी खेळतात.

मसूद अझहरवर बंदीसाठी जर्मनीचा ईयूमध्ये पुढाकार :
  • नवी दिल्ली  - जैश−ए−महंमदचा प्रमुख  मसूद अझहर याला जागतिक  दहशतवादी घोषित क रण्यात यावे,   असा पुढाक ार जर्मनीने युरोपियन  युनियनमध्ये (ईयू) घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अशा मागणीचा मांडलेला प्रस्ताव चीनने अडवून ठेवल्यानंतर जर्मनीने हे पाऊ ल उचललेआहे, असेसूत्रांनी सांगितले.

  • २८ सदस्यांच्या युरोपियन युनियनने अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर क रावे, यासाठी जर्मनी युनियनचे सदस्य असलेल्या

  • अनेक देशांच्या संपकर् ात आहे. तो दहशतवादी जाहीर झाला क ी, त्याच्यावर प्रवास बंदी येईल आणि त्याची २८ देशांतील संपत्ती गोठवली जाईल. जर्मनीने पुढाक ार घेतला असला तरी या मागणीसाठीचा प्रस्ताव मांडलेला नाही, असेराजनैतिक सूत्रांनी मंगळवारी सांगितले. युरोपियन युनियन मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठीच्या विषयावर सहमतीच्या तत्त्वांनुसार निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. १५ मार्च रोजी अझहर याच्यावर फ्रान्सने आर्थिक निर्बंध घातले आणि सांगितले क ी, युरोपियन भागीदारांसोबत मसूद

  • अझहर याचे नाव दहशतवादी कृत्यांत सहभागी असल्याबद्दलच्या युरोपियन युनियनच्या यादीत समाविष्ट क रण्यासाठी क ाम क रू . चीनने अझहरवरील प्रस्ताव अडवल्यानंतर दोन दिवसांनी फ्रान्सने वरील निर्णय  घेतला. अझहरला दहशतवादी जाहीर क रावे, असा प्रस्ताव फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल−क ायदा निर्बंध समितींतर्गत मांडला होता.

भारताचे उत्पादन क्षेत्र अविकसित ; चीनची दर्पोक्ती :
  • बीजिंग : पाकिस्तानची मदत करणाऱ्या चीनच्या वस्तुंवर भारतात बंदी घाला, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. भारतीयांच्या या भूमिकेची चीनने खिल्ली उडवली आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारतीयाच्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.

  • भारतातले उत्पादन क्षेत्र अजूनही अविकसित आहे. त्यांच्यात आमच्याशी मुकाबला करण्याची क्षमता नाही. त्यामुळे चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची हिंमत भारतात नाही, असे या वृत्तपत्रात म्हटले आहे.

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. व्हिटो पावरचा वापर करुन चीनने मसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला. त्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर चिनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतीयांकडून होत होती. ग्लोबल टाइम्समध्ये ब्लॉगमध्ये लिहिलेल्या मजकूरावर भारतीय लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. काहींनी तात्काळ मेड इन चायना उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे अपिल केले आहे.

नीरव मोदीला लंडनमध्ये अटक :
  • लंडन : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचे सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी यास स्कॉटलँड यार्डने लंडन येथील होलबार्न मेट्रो स्टेशनवरून अटक केली. त्याचा लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून त्याला ९ दिवसांची म्हणजे २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • अटकेनंतर ४ ८ वर्षीय नीरव  मोदीनेन न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.  तसेच कर भरल्याचे आणि प्रवासाचे कागदपत्रही सादर केले होते. त्याचे वकील जॉर्ज हेबुर्न स्कॉट यांनी आपल्या अशीलाकडे  प्रवासाचे तीन वेगवेगळे परवाने आहेत, असे न्यायालयाला सांगितले. परंतु जिल्हा न्यायाधीश मॅरी मॅलान यांनी जामीन अर्ज नामंजूर केला. वेस्टमिन्स्टर कोर्टात बराचवेळ चाललेल्या सुनावनी नंतर न्यायालयाने नीरव मोदी यास पोलीस कोठडी सुनावली. नरीव मोठय़ा रकमेचा घोटाळ्यात सहभागी आहे. त्याला सोडणे म्हणजे त्याला पळण्याची संधी देणे होय, असे सांगून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याची वर्ड्सवर्थच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली.

  • पुढील सुनावणी २९ मार्चला आहे. याच न्यायालयाने नीरव मोदीविरुद्ध अटक वारंट काढला होता. भारतातून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचे अधिकारी  प्रत्यर्पणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन पुढील आठवडय़ात लंडन जातील.

  • भारतात प्रत्यार्पणाबातची सुनावणी न्यायालयात केली जाणार आहे.  नीरव मोदी याने १३, ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मुंबईतील आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायदा न्यायालयाने ईडीला नीरवच्या ११ महागडय़ा कार आणि १७३ पेंटिंग्जचा लिलाव करण्याची परवानगी दिली आहे.

तब्बल १५ कोटी लोकांनी रोजगार गमावला :
  • नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांमध्ये तब्बल १५ कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. त्यात ७.३ टक्के पुरुष मजूर आणि ३.३ टक्के महिलांचा समावेश आहे. ही धक्कादायक माहिती पीरिओडिक लेबर फोर्स सर्वेमध्ये (पीएलएफएस) समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची नुकसान भरपाई करण्यासाठी शहरांमध्येही रोजगार वाढला नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

  • कामगार क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसंदर्भात २०१७-१८ चा पीएलएफएस सव्‍‌र्हे नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार घरकाम व शेतमजुरीतून मिळणाऱ्या रोजगाराच्या संख्येत कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रातील लोकांना मोठय़ा प्रमाणात शेतीतून रोजगार मिळत असून त्याचे उत्पन्नही चांगले आहेत.

  • पण, ग्रामीण भागातील अशा उत्पन्नामध्येही १० टक्क्याने घट झाली आहे. २०११-१२ मध्ये शेतमजुरीतून उत्पन्न मिळवणाऱ्या कामगारांचे प्रमाण २१ टक्केहोते. आता ते प्रमाण १२.१ टक्क्यावर आले आहे. पूर्वी ३ कोटी ६० लाख लोकांना यातून उत्पन्न मिळत होते. आता ते २ कोटी १० लाखांवर आले आहे.

  • रोजगारासंदर्भात एनएसएसओचा अहवाल राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाकडून (एनएससी) डिसेंबर २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. पण, अद्यापही तो प्रसिद्ध झाला नाही. हा अहवाल रोखून धरल्याचा आरोप झाल्यानंतर एनएससीचे प्रभारी अध्यक्ष  पी.एन. मोहनन आणि दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर पीएलएफएसचा २०१७-१८ चा अहवाल प्रसिद्ध झाला असून २०११-१२ पासून आतापर्यंत देशात ३०.४ टक्के पुरुषांनी रोजगार गमावला आहे, तर दुसरीकडे स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांच्या संख्येत ४ टक्क्यांची वृद्धी आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकासाठी लवकरच जाहिरात :
  • दिल्ली : भारतीय संघाच्या कामगिरीवर खूश असल्यामुळे मुख्य प्रशिक्षक आणि साहाय्यकांच्या करारात वाढ होण्याचा आग्रह काही दिवसांपुर्वी प्रशासकीय समितीने धरला होता. मात्र, भारतीय क्रिकेट  नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि प्रशासकीय समितीच्या झालेल्या बैठकीनंतर सर्व सूत्र हलली. असा कोणताच प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. त्यामुळे आगामी विश्व्चषक स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षकाचा शोध बीसीसीआय करणार असल्याच्या शक्यता बळावली आहे.

  • शास्त्री यांच्यासह गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचाही करार जुलै महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत रवि शास्त्री यांच्या कराराचा मुद्दा चर्चिला गेलेला नाही आणि तो चर्चेचा अजेंडात नव्हता, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे विश्व्चषक स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षक निवडीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

  • एका वृत्तानुसार विश्व्चषक स्पर्धेनंतर बीसीसीआय या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळतील अशी शक्यात आहे. पण, प्रशिक्षकासाठी योग्य उमेदवार न मिळाल्यास विंडीज दौऱ्यापर्यंत शास्त्रींना मुदतवाढ देण्यात येईल.

दिनविशेष :
  • जागतिक कविता दिन / जागतिक डाउन सिंड्रोम दिन / आंतरराष्ट्रीय रंग दिन / आंतरराष्ट्रीय जंगल दिन / आंतरराष्ट्रीय भेदभाव निर्मूलन दिन

महत्वाच्या घटना 

  • १५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

  • १६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.

  • १८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

  • १९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.

  • १९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

  • १९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

  • १९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • २०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

  • २००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.

  • २००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

जन्म 

  • १७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०)

  • १८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)

  • १८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)

  • १९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)

  • १९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २०११)

मृत्यू 

  • १९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९१)

  • १९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • १९८५: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन. (जन्म: २० मार्च १९०८)

  • २००१: दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५)

  • २००३: भारतीय लेखक शिवानी यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३)

  • २०१०: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.