चालू घडामोडी - २२ एप्रिल २०१८

Date : 22 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कच्चे तेल स्वस्त तरीही इंधन महाग, चिदंबरम यांंची टीका :
  • नवी दिल्ली : देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव काहीसे कोसळूनही भारतात पेट्रोल व डिझेल महाग होत चालल्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

  • गेले दोन महिने पेट्रोल व डिझेलचे भाव रोजच वाढत आहेत. कोलकाता व मुंबईत तर पेट्रोल-डिझेलच्या किमती सर्वाधिक आहेत. चार वर्षांपूर्वी क्रूड आॅइलचा जो भाव होता, त्यापेक्षा आज तो कमी आहे, तरीही देशात पेट्रोलजन्य पदार्थ महाग होत आहेत. त्यास चिदंबरम यांनी आक्षेप घेतला आहे.

  • पेट्रोल-डिझेल यांच्या किमतीवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क तर राज्य सरकार व्हॅट आकारते. राज्य सरकारने तर त्याच्यावर अधिभार लावला आहे.

  • त्यामुळे मूळ किमतीपेक्षा कर अधिक अशी स्थिती आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलवर जीएसटी लागू करावा, अशी सातत्याने मागणी होत आहे. मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या महसुलावर विपरीत परिणाम होईल, असे सांगत राज्य सरकारे त्यास नकार देत आहेत.

मी पक्ष सोडणार नाही, शत्रुघ्न सिन्हांचं स्पष्टीकरण :
  • पाटणा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज पक्षाला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयानंतर यशवंत सिन्हांचे कट्टर समर्थक शत्रुघ्न सिन्हादेखील पक्षाला लवकरच सोडचिठ्ठी देतील, अशा बातम्या येत होत्या. पण आपण कुठेही जाणार नसल्याचं शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.

  • बिहारची राजधानी पाटणामधील श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये भाजप विरोधी पक्षांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. “मला 2019 च्या लोकसभा निवडणूकीत उमेदवारी मिळणार नसल्याने, मी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची अफवाह आहे. पण मला आज हे स्पष्ट करायचं आहे की, मी कुठेही जात नाही.” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

  • दुसरीकडे त्यांनी यशवंत सिन्हांच्या निर्णयाचेही कौतुक केलं. “यशवंत सिन्ह यांचं देशाच्या राजकारणात मोठं योगदान आहे. त्यांनी राजकारणात अनेक त्याग केले आहेत. त्यांच्या निर्णय कौतुकास्पदच आहे,” असं ते यावेळी म्हणाले.

  • विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र तेजस्वी यादव यांची मुक्तकंठाने स्तुती केली. “बिहारच्या राजकारणात तेजस्वी यादव यांचं आगामी काळात महत्त्वाचं स्थान असेल,” असे शत्रुघ्न सिन्हा यावेळी म्हणाले.

  • माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला. विरोधी पक्षातील नेत्यांसोबत आज झालेल्या बैठकीनंतर सिन्हा यांनी हा निर्णय जाहीर केला.

मराठी बोलींचे सर्वेक्षण होणार :
  • पुणे : प्रत्येक गावाची एक भाषा आणि बोली असते. जसे भाषेचे व्याकरण असते, तसे बोलीचेही असते. याच मराठी बोलींचा अभ्यास करण्यासाठी ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण’ (२०१७-२०२०) हा प्रकल्प डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था व राज्य मराठी विकास संस्था यांनी हाती घेतला आहे. मराठी बोलींचे व्याकरण काय आहे?

  • त्यासंबंधी मराठी भाषेतील भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर आढळणाऱ्या काही निवडक व्याकरणिक विशेषांचे भाषावैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करणे आणि भाषिक नकाशे तयार करणे या प्रकल्पातील महत्त्वपूर्ण टप्प्प्यांमुळे भविष्यात अभ्यासक आणि संशोधनाचा निश्चितच उपयोग होणार आहे.

  • या प्रकल्पाच्या निमित्ताने डेक्कन कॉलेजमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप शुक्रवारी झाला. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी प्रकल्पाची घोषणा केली. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर उपस्थित होते.

  • या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ राज्य मराठी विकास संस्थेने दिले आहे. डेक्कन कॉलेजचे उप-कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे आणि मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष प्र. ना. परांजपे आदी या वेळी उपस्थित होते. प्रकल्पाच्या प्रमुख भाषाशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी आहेत.

बंद कंपन्यांच्या जागेत घरे आणि कार्यालये :
  • ठाणे : ठाण्यात येऊ घातलेली क्लस्टर योजना आणि रस्ता रुंदीकरणामध्ये भविष्यात बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवाºयाच्या प्रश्नाचा विचार करून बंद पडलेल्या कंपन्या तसेच रिकाम्या औद्योगिक भागाचे रूपांतर वाणिज्य आणि निवासी भागात करण्याची सभागृह नेते नरेश म्हस्के यांची सूचना महासभेत मान्य होऊन तसा ठरावही मंजूर झाल्याने या जमिनींवर घरे, कार्यालये, अन्य व्यापारी संकुले बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • आॅक्टोबरपासून क्लस्टर योजनेच्या पहिल्या टप्प्याला सुरु वात होणार आहे. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने शहरात ही योजना लागू करण्यात येणार असल्याने तेथील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवाºयाचा प्रश्न निर्माण होणार आहे. बीएसयूपीची घरे मर्यादित असल्याने तसेच रेंटलच्या घरांतील असुविधांमुळे तेथे जाण्यास कोणी तयार नसल्याने बंद पडलेल्या कंपन्यांच्या भूखंडांचा पर्याय पुढे आला आहे.

  • त्याला ठाणे शहरातील वाणिज्य आस्थापनांच्या कमतरतेची जोड देण्यात आली आहे. या बंद झालेल्या कंपन्या वा रिकाम्या औद्योगिक विभागाचे वाणिज्य भागात रूपांतर केल्यास नवा रोजगार तयार होईल, असा मुद्दा मांडून विकास नियंत्रण नियमावलीतील परिशिष्ट एम कलम एम-६.१ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाची सूचना म्हस्के यांनी दिली होती.

  • त्यात औद्योगिक विभागाचे वाणिज्य भागात रूपांतर करताना ३३ टक्के निवासी वापरासाठी, ३३ टक्के वाणिज्य वापरासाठी- यात आॅफिसेस, आयटी पार्क , क्लासेस, हॉस्पिटल, लॅबोरेटरीज, कमर्शियल आॅफिसेस यासाठी, तर ३३ टक्के प्रकल्पग्रस्त म्हणजेच क्लस्टर योजना (समूहविकास योजना) राबवताना होणारे विस्थापित तसेच भविष्यात होणारे रस्ता रुंदीकरण, महापालिकेच्या प्रकल्पात बाधित होणाºया नागरिकांसाठी घरे राखून ठेवणे, असा हा फेरबदल असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

  • यामुळे ठाणे शहरातील मोठमोठे औद्योेगिक विभाग- उदा. रेमण्ड, ग्लॅक्सो, युनिअबेक्स तसेच मफतलाल कंपनी अशा प्रकारच्या अनेक बंद कंपन्यांचे निवासी भागात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे प्लान मंजूर करताना प्रस्तावाच्या सूचनेप्रमाणे व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. 

अन् तिनं श्रीलंकेच्या अध्यक्षांना मोदी म्हटलं; बीबीसीनं मागितली माफी :
  • बीबीसीच्या एका वृत्तनिवेदिकेचा राष्ट्रकुल बैठकीचं वृत्तनिवेदन करताना गोंधळ उडाला. यामुळे बीबीसीला माफी मागावी लागली. राष्ट्रकुल प्रमुखांचं थेट प्रक्षेपण सुरू असताना बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेनं श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांना पंतप्रधान मोदी म्हटलं. सिरिसेना बकिंगघम पॅलेसच्या प्रवेशद्वारासमोर गाडीतून बाहेर पडत असताना वृत्तनिवेदिकेनं चूक केली. 

  • महाराणी एलिझाबेझ यांनी राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांसाठी जेवणाचं आयोजन केलं होतं. यासाठी मैत्रीपाल सिरिसेना बकिंगघम पॅलेसला पोहोचले. यावेळी '2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी बकिंगघम पॅलेसला पोहोचले आहेत,' असे बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेनं म्हटलं.

  • यानंतर बीबीसीच्या प्रवक्त्यांनी या चुकीबद्दल माफी मागितली. 'थेट प्रक्षेपणादरम्यान आमच्याकडून चूक झाली. त्यासाठी आम्ही माफी मागतो,' असं प्रवक्त्यांनी म्हटलं. 

दिनविशेष : 
  • जागतिक पृथ्वी दिन

महत्वाच्या घटना

  • १०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.

  • १९४८: अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.

  • १९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

  • १९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.

  • १९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • २००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.

जन्म

  • १८१२: भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर१८६०)

  • १८७०: रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)

  • १९०४: अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म.  (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)

  • १९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म.  (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)

  • १९१६: अभिनेत्री आणि गायिका काननदेवी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

  • १९१६: व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९९९)

  • १९२९: चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च२००० – नाशिक)

  • १९२९: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर यांचा जन्म.

  • १९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.

  • १९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९३३: रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८६३)

  • १९८०: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)

  • १९९४: विचारवंत, समाजसुधारक आचार्य सुशीलमुनी महाराज यांचे निधन.

  • १९९४: अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९१३)

  • २००३: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर१९१६ – भटिंडा, पंजाब)

  • २०१३: व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर१९३०)

  • २०१३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९३३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.