चालू घडामोडी - २२ डिसेंबर २०१७

Date : 22 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ज्येष्ठ नागरिकांचं वय लवकरच 65 वरुन 60, राज्य सरकारची घोषणा :
  • नागपूर : लवकरच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरुन 60 होणार आहे. महिन्याभरात नवीन निर्णय लागू करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी केली आहे.

  • यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढणार असून अनेकांना सवलतीच्या दरात एसटी पास आणि वृद्धापकाळातील निवृत्ती योजनांचा आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, यामुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 200 कोटींचा बोजा पडणार आहे.

  • सध्या केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिकत्वाचं वय 60 वर्ष आहे. तर राज्य सरकारच्या नियमानुसार ते 65 आहे. त्यामुळे केंद्राच्या नियमानुसार राज्यातही ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरुन 60 वर्ष करावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत होती. अखेर राज्य शासनानं ही मागणी मान्य केली आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर; अनिल अवचट यांना जीवनगौैरव :
  • पुणे : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यंदा लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार, तर मराठवाड्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार अरविंद गुप्ता यांना दिला जाईल. १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाचे माजी संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे सभागृहात पुरस्कार वितरण होईल.

  • याशिवाय, सई परांजपे यांच्या ‘सय : माझा कलाप्रवास’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार आणि कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला ललित ग्रंथ पुरस्कार दिला जाणार आहे.

  • अजित दळवी यांना ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाच्या लेखनासाठी रा. शं. दातार नाट्यपुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती विनोद शिरसाठ, मुकुंद टाकसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षासाठी एकूण ९ पुरस्कार दिले जाणार असून, त्यात साहित्यासाठी चार, समाजकार्यासाठी चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 

डोनाल्ड ट्रम्पना झटका ! जेरुसलेम वाद ; भारतासह 100 हून अधिक देशांचं विरोधात मतदान :
  • संयुक्त राष्ट्रे - जेरुसलेमला इस्त्राईलच्या राजधानीची मान्यता देण्याच्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राकडून जोरदार झटका मिळला आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत गुरुवारी भारतासहीत 100 हून अधिक देशांनी अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रचे सदस्य राष्ट्र जेरुसलेमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिलेल्या प्रस्तावाविरोधात मतदान केले आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रस्तावाविरोधात मतदान करणा-या देशांना अनुदातान कपात करण्याची धमकीदेखील दिली होती. परिणामी, काही देशांनी या प्रकरणातून स्वतःला अलिप्त ठेवले आहे.

  • संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाचे एकूण 128 देशांनी समर्थन केले. तर दुसरीकडे 9 देशांनी या प्रस्ताविरोधात मतदान केले आहे आणि 35 देश अलिप्त राहिलेत. जेरुसलेम प्रकरणामुळे अमेरिका जागतिक स्तरावर एकटा पडला असला तरीही  पश्चिमी व अरब देशांच्या मैत्रिपूर्ण संबंध असलेल्या देशांनीही अमेरिकेच्या पक्षात मतदान करत त्याला एकटं पडण्यापासून वाचवलं.

'एसआरपीएफ'ला आयएसओ प्रमाणपत्र, देशात प्रथमच निमलष्करी दलाचा असा सन्मान :
  • पुणे : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या संपूर्ण देशात व महाराष्ट्रातील निमलष्करी दलामध्ये राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ ला (एसआरपीएफ) आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.

  • देशात प्रथमच निमलष्करी दलाचा असा सन्मान झाला आहे, अशी माहिती एसआरपीएफ बल गट क्रमांक दोनचे समादेशक सारंग आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.                       

  • पोलीस महासंचालक कार्यालयाने पुण्यातील एसआरपीएफ बल गट क्रमांक २ ची ‘स्मार्ट गट’ म्हणून २०१६ मध्ये निवड केली होती. 

  • याबाबत सारंग आव्हाड यांनी सांगितले की, एसआरपीएफला आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी गटातील समादेशक कार्यालय, कंपनी कार्यालये, मोटार परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, गट रूग्णालय यातील कर्मचारी, अधिकारी यांना आयएसओ बाबत माहिती देण्यात आली.

रिलायन्सचा 13 हजार 251 कोटींचा विद्युत व्यवसाय अदानींकडे :
  • मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीने आपला वीज प्रकल्प विक्रीत काढला आहे. अदानी ग्रुपसोबत 13 हजार 251 कोटी रुपयांचा सौदा झाल्याची माहिती रिलायन्स इन्फ्राने दिली आहे.

  • रिलायन्स एनर्जी हा कंपनीचा विद्युत व्यवसाय अदानी ग्रुपच्या अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला विकण्यात आला आहे. विजेची निर्मिती करण्यापासून ट्रान्समिशनपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश यात होतो.

  • 12 हजार 101 कोटी रुपये संपत्तीची किंमत असून तर 1 हजार 150 कोटी रुपये रेग्यूलेटरी अप्रूव्हलसाठी देण्यात आले आहेत.

  • 5 हजार कोटी रुपयांचं रेग्युलेटरी असेट आणि 550 कोटी रुपयांचं वर्किंग कॅपिटल रिलायन्स इन्फ्राकडेच राहील. रिलायन्सच्या एकूण विद्युत व्यवसायाची किंमत 18 हजार 800 कोटी रुपयांच्या घरात आहे.

गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? भाजपात मंथन सुरू, आज नावांची घोषणा होण्याची शक्यता :
  • नवी दिल्ली - गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री निवडीसंदर्भात भाजपामध्ये मंथन सुरू आहे. गुरुवारीदेखील (21 डिसेंबर) यावरुन भाजपामध्ये मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. शुक्रवारी (22 डिसेंबर) दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्रीपदासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तीच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

  • गुजरातमध्ये मुख्यंत्रीपदासाठी नव्या व्यक्तीच्या नावाची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासहीत अन्य लोकांसोबत बैठक केली. तर दुसरीकडे हिमाचलमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांसंदर्भात शिमलामध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली.

  • जयराम ठाकूर यांच्या समर्थकांनी नारेबाजी करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांचे समर्थक एकवटले होते. 

 २०२२ राष्ट्रकुल खेळांचं यजमानपद बर्मिंगहॅमकडे :
  • दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहराने आर्थिक अडचणींचं कारण देत २०२२ साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळाचं यजमानपद भूषवण्यात नकार दिल्यानंतर, बर्मिंगहॅम शहराला या स्पर्धेचा मान देण्यात आलेला आहे.

  • डर्बनने माघार घेतल्यानंतर बर्मिंगहॅम या एकमेव शहराने यजमानपद भूषवण्यासाठी आपला प्रस्ताव सादर केला होता. यावरुन राष्ट्रकुल क्रीडा प्राधिकरणाने २०२२ साली होणाऱ्या स्पर्धांच्या यजमानपदाचे हक्क बर्मिंगहॅमला दिले आहेत.

  • याआधी २०१४ साली ग्लास्गो आणि त्याआधी २००२ साली मँचेस्टर शहराने राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदाचा मान भूषवला होता. हा मान आपल्याकडे घेण्यासाठी बर्मिंगहॅम शहरातील स्थानिक प्रशासनाला आपण या स्पर्धेच्या यजमानपदातून माघार घेणार नाही याची हमी द्यावी लागणार आहे.

  • या स्पर्धेसाठीचा अंदाजे ७५ टक्के खर्च हा बर्मिंगहॅम स्थानिक प्रशासनाला करावा लागणार असून उर्वरित २५ टक्के खर्च हा राष्ट्रकुल समिती करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार अॅलेक्झँडर मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटनाचा सोहळा रंगण्याची शक्यता आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • राष्ट्रीय गणित दिन

महत्वाच्या घटना

  • १८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

  • १८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.

  • १९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.

  • १९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

जन्म 

  • १६६६: शिखांचे १० वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १७०८)

  • १८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०)

  • १८८७: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)

  • १९२९: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.

  • १९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य पाटील यांचा जन्म.

मृत्य

  • १९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)

  • १९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२)

  • १९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०६)

  • १९९६: संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन.

  • २००२: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन.

  • २०११: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.