चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ जून २०१९

Date : 22 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘जीएसटी’च्या नफेखोरीविरोधी प्राधिकरणास २ वर्षांची मुदतवाढ :
  • नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने नफेखोरीविरोधी प्राधिकरणास दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून, जीएसटी लागू झाल्यानंतर कमी झालेल्या कराचा लाभ ग्राहकांना न दिल्यास १० टक्क्यांपर्यंत दंडाच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. जीएसटी परिषदेच्या ३५ व्या परिषदेत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला.

  • महसूल सचिव ए. बी. पांडेय यांनी बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जीएसटी नेटवर्कवर नोंदणीसाठी व्यवसायांना आधारचा वापर करण्याची परवानगी देण्याचा विचार केला जात आहे.

  • जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी दोन महिन्यांची म्हणजेच ३० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एका अर्जाचे नवे जीएसटी विवरणपत्र भरणे १ जानेवारी २०२० पासून सुरू होईल. केंद्रीय मंत्र्याच्या नेतृत्वाखालील तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने मल्टिप्लेक्समध्ये इलेक्ट्रानिक्स इन्व्हॉईस व्यवस्था आणि ई-तिकीट व्यवस्थेला मंजुरी दिली.

  • पांडे यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करणे आणि इलेक्ट्रिक चार्जवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करणे हे प्रस्ताव निर्धारण समितीकडे (फिटमेंट कमिटी) पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निजामाच्या अस्सल हिऱ्यांच्या अंगठीचा लिलाव; तब्बल ४५ कोटींची बोली :
  • अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये बुधवारी भारतीय दागिन्यांच्या लिलावामध्ये पैशांचा पाऊस पाडण्यात आला. या लिलावामध्ये आकर्षणाचे मुख्य केंद्र होते निजाम मीर उस्मान अली खान यांची अंगठी, नेकलेस आणि तलवार. 52.58 कॅरटच्या अस्सल हिऱ्यांच्या अंगठीला तब्बल 45 कोटींची बोली लावण्यात आली. या अंगठीवर जगप्रसिद्ध हिऱ्यांची खाण गोलकुंडामधून काढलेले हिरे लावलेले आहेत.

  • निजामाच्या तलवारीला 13.4 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. या लिलावात निजामाच्या खजान्यातील खास हारावरही लोकांचे लक्ष होते. हिऱ्यांनी लगडलेल्या या हारासाठी 17 कोटी रुपये मोजण्यात आले. या हाराला 33 हिरे लावण्यात आले होते. या हाराला 10.5 कोटी रुपये येतील असा अंदाज होता. मात्र, तो चुकीचा ठरला.

  • यावेळी निजाम परिवाची लिलाव प्रक्रियेवर नजर होती. दिवंगत निजाम मीर उस्‍मान अली खान यांचे नातू मीर नजफ अली खान यांनी सांगितले की, जेव्हा पांढऱ्या मोत्यांच्या हाराची बोली लावण्यात आली तेव्हा त्यांनी जवळपास ओरडच मारली. यावेळी 17 कॅरेटचा गोलकुंडाचे 'अर्काट 2' हिरा 23.5 कोटींना विकला गेला.

  • लिलावांचे आयोजन करणारी संस्था क्रिस्टीनुसार जवळपास 400 वस्तूंचा लिलाव करण्यात आला. यामध्ये 758 कोटी रुपये जमा झाले. ही भारतीय कला आणि मुघलांच्या वस्तूंची सर्वाधिक संख्या आहे.

भारताला ‘एनएसजी’ सदस्यत्व देण्यास चीनचा विरोध कायम :
  • बीजिंग : आण्विक साहित्य पुरवठादार गटाच्या (एनएसजी) अस्ताना येथे होणाऱ्या बैठकीत भारताला सदस्यत्वाचा मुद्दा विषयसूचीवर नाही, असे चीनने सूचित केले आहे.

  • अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या भारतासारख्या देशांना या गटात प्रवेश देण्याबाबत सहमती होणे आवश्यक आहे, अशी भूमिका चीनने घेतली आहे. चीनने नेहमीच भारताचा एनएसजीमधील प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला आहे. आण्विक साहित्य पुरवठादार गट ही ४८ देशांची संघटना असून ती जागतिक अणुसाहित्य व्यापाराचे नियंत्रण करते. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी मे २०१६ मध्ये अर्ज केला असून चीनने भारताला हे सदस्यत्व देण्यास विरोध केला आहे. ज्या देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली आहे, त्यांनाच या संघटनेचे सदस्यत्व मिळावे, असे चीनचे म्हणणे आहे.

  • भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी अण्वस्त्रप्रसार बंदी करार म्हणजे एनपीटीवर स्वाक्षरी केलेली नाही. भारताला एनएसजीमध्ये प्रवेश देण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले, की चीनची आधीचीच भूमिका कायम आहे.

  • कझाकस्थानातील अस्ताना येथे संघटनेची बैठक  होत असून त्यात भारताला सदस्यत्व देण्याचा कुठलाही मुद्दा विचारार्थ नाही. इतर सदस्य देशांत याबाबत मतैक्य झाल्याशिवाय भारताला हे सदस्यत्व देण्यात येऊ नये. भारताला सदस्यत्व नाकारण्याचे आम्ही प्रयत्न केलेले नाहीत. केवळ एनएसजीचे नियम व प्रक्रिया यांचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे, असा खुलासाही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, केरळच्या मंदिरात धमकीचे पत्र आढळले - सूत्र :
  • नवी दिल्ली : केरळ दौऱ्यावर असताना मोदींना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा खुलासा झाला आहे. या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या दौऱ्यावर गेले होते.  यावेळी मोदींनी भेट दिलेल्या गुरुवायुर मंदिराच्या ऑफिसमध्ये एक पाकिट सापडलं होतं. त्यात पाचशेच्या नोटेवर मल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, अशी माहिती मिळाली आहे.

  • सूत्रांच्या माहितीनुसार मोदींच्या मंदिर भेटीआधी ही धमकी मिळाली होती. 8 जूनला मोदी केरळ दौऱ्यावर असताना त्यांनी गुरुवायूर मंदिराला भेट देऊन तिथे तुला केली होती. त्यांच्या वजनाएवढं दान त्यावेळी मोदींनी केलं होतं. त्यानंतर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांकडून मोदींच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.

  • त्रिशुरच्या गुरुवायुर मंदिराच्या कार्यालयात एका पाकिटामध्ये पाचशे रुपयांच्या नोटेवर लिहून ही धमकी  देण्यात आली होती. यामध्ये मोदींना जीवे मारले जाईल. त्यांचा गळा कापला जाईल, अशी धमकी मल्याळम भाषेत लिहिली होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६३३: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

  • १८९७: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.

  • १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

  • १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

  • १९७८: जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

  • १९८४: व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली.

  • १९८६: अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला.

  • १९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण.

  • २००७: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.

जन्म 

  • १८०५: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८७२)

  • १८८७:  ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

  • १८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म.

  • १८९९: मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९८०)

  • १९०८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९९८)

  • १९२७: भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म.  (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५)

  • १९३२: आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी२००५ – मुंबई, महाराष्ट्र)

मृत्यू 

  • १९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)

  • १९९३: चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन.

  • १९९४: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०८)

  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामा नारायणन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९४९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.