चालू घडामोडी - २२ सप्टेंबर २०१७

Date : 22 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ईडन गार्डन्सने अनुभवली ‘वन-डे’ हॅटट्रिक २६ वर्षानंतर कुलदीप यादवनं :
  • भारताकडून वन-डे सामन्यात हॅटट्रिक घेणारा कुलदीप तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी भारताकडून चेतन शर्मा आणि कपिल देव यांनी वन-डे सामन्यात हॅटट्रिक घेतली होती.

  • ईडन गार्डन्सच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलिन संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली.

  • यष्टिरक्षक मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर आणि पॅट कमिन्सला माघारी धाडत कुलदीप यादवनं २६ वर्षांपूर्वीच्या कपिल देव यांच्या आठवणीला उजाळा दिला.

  • ४ जानेवारी १९९१ मध्ये ईडन गार्डन्सच्या मैदानावर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कपिल देव यांनी हॅटट्रिक घेतली होती, त्यांनी श्रीलंकेच्या रोशन महानमा, रुमेश रत्नायिके आणि सनथ जयसूर्या यांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

  • भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला होता. कपिल देव यांच्यापूर्वी चेतन शर्मा यांनी विदर्भ असोसिएशनच्या म्हणजेच नागपूरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात असा पराक्रम केला होता. 

  • कुलदीपने पहिल्या वन-डे सामन्यातही लक्षवेधी खेळी केली होती. या सामन्यात त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टोयनिस यांना तंबूचा रस्ता दाखवत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.

शिर्डी विमानतळाचा १ ऑक्टोबरला कोविंद यांच्या हस्ते प्रारंभ होण्याची शक्यता :
  • श्रीसाईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षांचा प्रारंभ या विमानतळाच्या उद्घाटनाने होत असून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

  • जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले श्रीसाईबाबांचे शिर्डी अखेर हवाई नकाशावर आले असून नागरी हवाई महासंचालनालयाने (डीजीसीए) शिर्डी विमानतळाला उड्डाण परवाना गुरुवारी जारी केला.

  • राहता तालुक्यातील काकडी गावामध्ये असलेल्या विमानतळाचा रनवे अडीच हजार मीटरपेक्षा जास्त असून तो ए-३२० आणि बोइंग ७३७ जातींच्या विमानांसाठी पुरेसा असेल.

  • राष्ट्रपतींचा दौरा जवळपास निश्चित झाल्याने डीजीसीएने उड्डाण परवाना देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्याचे समजले असून या विमानतळावर २७५० चौरस मीटरची टर्मिनल इमारत असून चार विमानांना पुरेल एवढय़ा हँगरची सुविधा आहे.

  • अगोदरच घोषित केल्याप्रमाणे श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे त्याचे नाव असणार प्रारंभीच्या टप्प्यात मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला शिर्डी जोडले जाईल तर मुंबई आणि दिल्लीमधून अलायन्स एअरलाइन्स, तर हैदराबादहून ट्रजेटची सेवा असेल.

राज्य सरकारकडून गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ :
  • राज्य सरकारकडून गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून १ जानेवारी २०१७ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे.

  • यापैकी ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाईल तर त्यापूर्वीच्या ७ महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे द्यायचा, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. 

  • राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घटस्थापनेचा मुहूर्त फलदायी ठरला असून यापूर्वी एप्रिल महिन्यातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

  • काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये १ टक्क्याने वाढ करण्यात आली होती ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६१ लाख निवृत्त वेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

  • त्यावेळी महागाई भत्ता १३२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला असून आता त्यामध्ये आणखी चार टक्क्यांची भर पडली असून राज्य सरकारचे तब्बल १६ लाख कर्मचारी आणि ६ लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे.

गुगलने १.१ अब्ज डॉलरला खरेदी केला HTC स्मार्टफोनचा बिझनेस :
  • गुगलने तब्बल १.१ अब्ज डॉलरमध्ये हा करार केला असून गुगलने पिक्सल फोनच्या निर्मितीचा विचार करून हा निर्णय घेतला, गुगलने तायवानची कंपनी HTC कडून स्मार्टफोन बिजनेस खरेदी केला आहे.

  • गुगल आणि एचटीसीच्या या कराराचा परिणाम थेट स्मार्टफोन इंडस्ट्रीवर होणार असल्याचं बोललं जात असून हा परिणाम कालांतराने पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • एचटीसीच्या टीमसोबत काम करून सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न असणार आहे, एका रिपोर्टमध्ये आलेल्या माहितीनुसार अॅपल प्रमाणे गुगल देखील स्वतःचं प्रोसेसर बनवत आहे.

  • सध्या गुगल आपल्या पिक्सल स्मार्टफोनसाठी दुस-या कंपन्यांसोबत भागीदारी करतं आणि फोनचं हार्डवेअर इतर कंपन्या बनवत असतात गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर असतं. 

  • गुगल आणि एचटीसी यांनी यापूर्वीही एकत्र काम केलं असून गुगलचा पहिला नेक्सस डिव्हाइस देखील एचटीसीनेच बनवला होता.

  • एचटीसीचे सीईओ शीर वांग यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून आम्ही यापुढे एचटीसी स्मार्टफोन्स आणि वाइव व्हर्चुअल रिअलिटी बिझनेसमध्ये नाविन्यपणा आणण्यावर काम करू असं ते म्हणाले.  

आंतरराष्ट्रीय स्तरावर रविना रवींद्र म्हात्रे हिला सुवर्ण यश :
  • रविना रवींद्र म्हात्रे हिने आपल्या कराटे क्रीडा नैपुण्यातून प्राप्त केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशातून एक नवा वस्तुपाठ महिलांच्या समोर ठेवला आहे.

  • सध्याच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणाकरिता दुस-यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याकरिता स्वत:च सिद्ध झाले पाहिजे, अशी भूमिका पेणमधील कारमेल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणा-या रविना रवींद्र म्हात्रे हिची आहे.

  • अथक मेहनतीने रविनाने इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन करून सिल्व्हर, गोल्ड पदके जिंकू नरायगडचे नाव उंचावले असून त्याकरिता तिने पाचवीपासून स्वसंरक्षणाच्या विचारातूनच कराटे या खेळाची निवड केली आणि पुढे याच खेळाची तिला आवड निर्माण झाली.

  • सातत्यपूर्ण सरावातून रविनाने शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके मिळविली आहेत, परंतु मे २०१७ मध्ये काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता तिची निवड झाली.

  • तिने या स्पर्धेत एक सिल्व्हर, दोन ब्रांझ मेडल्स मिळवून यश संपादन केले असून गतवर्षी जानेवारी २०१६ मध्ये तामिळनाडूमध्ये झालेल्या ‘नॅशनल थांग-ता चॅम्पियनशिप’ मध्ये तिने प्रत्येकी एक सिल्व्हर आणि गोल्ड मेडल संपादन करून आपल्या यशाची चढती कमान अबाधित राखली आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : बल्गेरिया (ऑट्टोमन साम्राज्यापासून, १९०८), माली (फ्रांसपासून, १९६०)

जन्म /वाढदिवस

  • कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक : २२ सप्टेंबर १८८७

  • रामकृष्ण बजाज, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती : २२ सप्टेंबर १९२३

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

  • मन्सूर अली खान पटौदी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब : २२ सप्टेंबर २०११

  • जी. एन. जोशी, जुन्या पिढीतील भावगीत गायक : २२ सप्टेंबर १९९४

​​​​​​ठळक घटना

  • नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले : २२ सप्टेंबर २००३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.