चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ सप्टेंबर २०१९

Date : 22 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
 IND vs SA : आज तिसरा टी २० सामना
  • बंगळुरु येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी २० सामना खेळण्यात येणार आहे.

  • धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पहिला टी २० सामना खेळण्यात येणार होता, पण तो रद्द करावा लागला. कारण धर्मशाळा येथे सतत तीन दिवस पाऊस सुरु होता.

  • जर तिसऱ्या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तरी भारताला चिंता करण्याचे कारण नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघ मालिकेमध्ये १-० असा आघाडीवर आहे. 

पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल, ५० हजाराच्या जनसमुदायाला करणार संबोधित
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी एका आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यासाठी शनिवारी रात्री उशीरा अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात दाखल झाले.

  • भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत.

  • ह्यूस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’कडून आज ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याची जय्यत तयारी सुरू आहे.

  • नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला ५० हजारांपेक्षा अधिक अमेरिकी-भारतीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • अमेरिकेत होणाऱ्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला निकाल
  • महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान घेण्याची आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी करण्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी केली.

  • हरयाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्राबरोबरच घेण्यात येणार आहे.

  • केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दोन दिवसांच्या (मंगळवार-बुधवार) मुंबई दौऱ्यात राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर गेले तीन दिवस राज्यातील सर्वच राजकीय पक्ष निवडणूक तारखांच्या प्रतीक्षेत होते.

डिसेंबर २०२१ मध्ये भारत अवकाशात माणूस पाठवणार
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला चांद्रयान-२ च्या लँडर बरोबर संपर्क प्रस्थापित करता आला नाही.

  • चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे आता हा संपर्क कधीच होऊ शकत नाही.

  • लँडर आणि त्यामध्ये असलेल्या रोव्हरचे आयुष्य १४ दिवसांचे होते. ७ सप्टेंबरला इस्रोने चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

  • दरम्यान इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी भारताच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली आहे.

MahaNMK Current Affairs | Episode 08

असेच नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी कृपया MahaNMK या युट्युब चॅनेल ला Subscribe करा. (येथे क्लिक करा)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

  • १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

  • १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.

  • १९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

  • १९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.

  • १९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.

  • १९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.

  • २००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

जन्म

  • १८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)

  • १८८७: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)

  • १९०९: विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)

  • १९१५: मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)

  • १९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.

  • १९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.

मृत्यू

  • १५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन.

  • १५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९)

  • १९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

  • १९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८७७)

  • १९९४: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)

  • २००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.

  • २०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.