चालू घडामोडी - २३ एप्रिल २०१७

Date : 23 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर पुरस्कार सोहळ्याचे आज प्रक्षेपण :
  • ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे सार्थ नामाभिधान अभिमानाने मिरवत चांद्यापासून बांद्यांपर्यंत विस्तारलेल्या वर्धिष्णु अशा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने ११ एप्रिल २०१७ रोजी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात मराठी भाषा, मराठी माती आणि महाराष्ट्राची शान वाढविणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा गौरव केला.

  • या सोहळ्याचे प्रक्षेपण रविवारी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर दुपारी ३ वाजता तर, ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर दुपारी ४ वाजता होणार आहे.

  • याशिवाय ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवर सोमवारी दुपारी ४.३० वाजता हा सोहळा पाहता येईल.

  • यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर’ पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने हा चौथा पुरस्कार सोहळा झाला. यंदाच्या पर्वात ‘लोकसेवा-समाजसेवा’, ‘परफॉर्मिंग आर्ट््स’, ‘कला’, ‘क्रीडा’, ‘रंगभूमी’, ‘मराठी चित्रपट’, ‘उद्योग’, ‘पायाभूत सेवा’, ‘राजकारण’, ‘प्रशासन (आश्वासक)’ आणि ‘वैद्यकीय’ अशा १४ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता.

‘कॉपी कॅट’ मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे दुर्दैव- सुप्रिया सुळे :
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट असून त्यांच्याकडे स्वत:च्या काही कल्पना नाहीत.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खरमरीत शब्दांत टीका केली आहे.

  • दिल्लीत पंतप्रधान मोदी काय करतात, ते पाहून त्यांची इकडे कॉपी करतात, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे त्या म्हणाल्या.

  • मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून निवडून येतात. तेथे सरकारी विश्रामगृहात बलात्कारासारखे प्रकार होतात. हे अत्यंत निंदनीय असून राज्यासाठी ही अत्यंत वाईट गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. 

तीन वर्षांत १८,५१० शाळा होणार डिजिटल :
  • धुळे जिल्ह्यातील शाळांमधील वर्ग १०० टक्के डिजिटल झाल्या असून, उर्वरित शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

  • आरएसएएसबरोबर राज्यातील १८ हजार ५१० शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

  • बदलत्या काळानुरूप राज्यातील शिक्षण व्यवस्थेत बदल केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून, शाळा १०० टक्के डिजिटल करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

  • कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सब्लिटी (सीएसआर) आणि लोकसहभागातून राज्य शासन पुढच्या तीन वर्षांत १८ हजार ५१० शाळा डिजिटल करणार आहे.

  • सामंजस्य करारानुसार पुढील ३ वर्षांत डिजिटल करण्यात येणाऱ्या शाळांमध्ये प्रामुख्याने शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची निवड करण्यात येणार असून त्यानंतर, खासगी अनुदानित शाळांची निवड करण्यात येणार आहे.

  • ९ जानेवारी २०१७च्या शासन निर्णयाप्रमाणे, ज्या शाळांनी अजूनपर्यंत एक खोली डिजिटल करून घेतलेली नाही. अशा शाळांनी ँ३३स्र://१ङ्म३ं१८३ींूँ .ङ्म१ॅ/ी_’ीं१ल्ल_ेँं_ॅङ्म५ या लिंकवर जाऊन नोंदणी करावी.

इंडियाला ‘हिंडिया’ बनवू नका, द्रमुक नेते स्टॅलिन यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल :
  • द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमूक) नेते एम.के.स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.

  • देशभरातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये हिंदी सक्तीचे केले असून या व्हिडिओत म्हटले व पंतप्रधानांनी इंडियाला ‘हिंडिया’ बनवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा हिंदीविरोधी नवीन ताकदीचा उदय होईल.

  • मोदी हे हिंदी भाषा बळजबरीने थोपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी हे घटनेचे आणि बिगर हिंदी भाषिक लोकांच्या अधिकाराचे हनन करत असल्याचे ते म्हणाले.

  • स्टॅलिन यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून मोदींवर आपला रोष व्यक्त केला आहे. भाजप सरकारने राष्ट्रपतींकडून परवानगी घेऊन विमानतळावर हिंदी भाषेत घोषणेची सुरूवात केली आहे. प्रसिद्धीपत्रके आणि जाहिरातीही हिंदीमध्ये देण्यात येत आहे.

पंतप्रधान स्वत:चे उदहारण देऊन नेतृत्व करत नाहीत - राहुल गांधी :
  • काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टि्वटरवरुन टोला लगावला. 

  • नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा वापर स्वत:च्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी करु नका असा सल्ला नोकरशहांना दिला होता.

  • पंतप्रधानांनी स्वत: आदर्श घालून दिला पाहिजे. पण पंतप्रधान स्वत:चे उदहारण देऊन नेतृत्व करत नाहीत अशी उपरोधिक टीका  राहुल यांनी केली. त्यावर लगेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी टि्वटकरुन राहुल गांधींवर निशाणा साधला. 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोकरशहांना स्वत:च्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करु नका असा सल्ला दिला असला तरी, मोदी स्वत: सोशल मीडियावर सक्रीय आहेत. टि्वटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. 

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • जागतिक ग्रंथ तथा रचनास्वायत्त दिन (World Book & Copyright Day) : २३ एप्रिल 

जन्म, वाढदिवस

  • विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक (baptised) : २३ एप्रिल १५६४

  • पंडिता रमाबाई : २३ एप्रिल १८५८

  • विठ्ठल रामजी शिंदे, अस्पृश्यतानिवारण करण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे थोर समाजसुधारक : २३ एप्रिल १८७३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन 

  • सत्यजित रे, जगप्रसिद्ध सिने दिग्दर्शक : २३ एप्रिल 

ठळक घटना

  • -- 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.