चालू घडामोडी - २३ जानेवारी २०१९

Date : 23 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी :
  • वाराणसी : भारतीय नागरिकांना येत्या काळात ई-पासपोर्ट दिले जाणार आहेत. एका केंद्रीकृत पासपोर्ट प्रणालीद्वारे चिप आधारित ई-पासपोर्ट जारी करण्याचे काम सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे आयोजित एका समारंभात याबाबत माहिती दिली.

  • पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रकल्पाद्वारे जागतिक स्तरावर सर्व दूतावासांशी जोडले जाणार आहेत. सर्व भारतीयांच्या सेवेसाठी पासपोर्ट सेवेशी संबधित एक केंद्रीकृत प्रणाली तयार केली जाणार आहे. त्यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन चिप आधारित ई-पासपोर्टसाठी काम केले जाणार आहे.

  • एटीएम कार्डनंतर आता पासपोर्टमध्येही चिप लावली जाणार आहे. यामुळे पासपोर्टची सुरक्षा, प्रिंटिंग आणि पेपर क्वालिटीत सुधारणा होईल, असे म्हटले जात आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिकमध्ये या पासपोर्टची निमिर्ती केली जाणार आहे. पासपोर्टमध्ये चिप लावल्यामुळे ई-पासपोर्ट बनवणे सोपे जाणार असल्याची माहिती मोदींनी सांगितले.

भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे स्वागत :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर कमला हॅरिस यांनी २०२० मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे त्या देशात स्थायिक भारतीयांनी जोरदार स्वागत केले आहे. त्या अध्यक्ष झाल्या, तर तो आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

  • कमला हॅरिस यांनी सोमवारी आपल्या प्रचाराच्या मोहिमेला सुरुवात केली. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२० मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा उभे राहणार आहेत. त्यांच्या विरोधात हॅरिस रिंगणात उतरल्या आहेत.

  • अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योगपती एम. आर. रंगास्वामी यांनी सांगितले की, कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास सज्ज झाल्या हा ऐतिहासिक क्षण आहे.

  • राजकारण्यांनी अमेरिकेतील भारतीय वंशीय लोकांना कधीही गृहित धरू नये. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तुलसी गबार्ड यादेखील इच्छुक असून, त्यांनाही बरेचजण पाठिंबा देत आहेत. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये निवडून आलेल्या पहिल्या हिंदू सदस्य, अशी तुलसी यांची ओळख आहे.

आता निवृत्त पोलिसांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ :
  • मुंबई : राज्यातील निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यास झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कनिष्ठस्तरीय संवर्गातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह विविध आपत्तीप्रसंगी सेवा बजावताना पोलिसांना प्रचंड ताणतणावाखाली काम करावे लागते. तसेच अनियमित दिनक्रमामुळेही त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • कुणाला मिळतो लाभ - यापूर्वी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अंत्योदय, पिवळी, अन्नपुर्णा, केशरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थी कुटुंबांव्यतिरिक्त अवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब, तसेच शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमांतील महिला, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडील निकषानुसार पत्रकारांचा व त्यांच्या कुटुंबांचा आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांचा समावेश आहे. आजच्या निर्णयानुसार या योजनेत आता निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कनिष्ठ संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश होणार आहे.

  • राज्यातील जनतेला आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 971 शस्त्रक्रिया-उपचार आणि 121 पाठपुरावा सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी राज्यात केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ‌जोतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना समन्वय साधून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीसी क्रिकेट पुरस्कारांमध्ये विराट कोहलीची हॅटट्रिक :
  • मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कोहलीने आयसीसी पुरस्कारांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. 'आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू 2018' म्हणून त्याची निवड झाली आहे.

  • त्यामुळे तो सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीचा मानकरी ठरला आहे. यासोबतच विराट पहिल्यांदाच 'सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू' ठरला आहे. तर सर्वोत्कृष्ट एकदिवसीय किकेटपटू बनण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे.

  • या पुरस्कारांसह विराटने अनोखी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. 30 वर्षीय विराट कोहली यंदाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू बनला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ यांना ऑस्करची दहा नामांकने :
  • येत्या २४ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणाऱ्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून त्यात रोमा आणि द फेव्हरिट यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत.

  • रोमा या चित्रपटाची कथा मेक्सिको राष्ट्रात घडते. त्याचे दिग्दर्शन अल्फान्सो क्वारोन यांनी केले आहे.  सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्ही गटात त्याला नामांकने मिळाली आहेत. उत्कृष्ट सहअभिनेत्रीसाठी रोमाची अभिनेत्री मारिना डी टॅव्हिरा हिला अनपेक्षित नामांकन मिळाले असून ‘अ स्टार इज बॉर्न’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट अभिनेत्री (लेडी गागा), उत्कृष्ट अभिनेता (ब्रॅडले कूपर) यासाठी नामांकने आहेत.

  • सहअभिनेत्रीसाठी अ‍ॅमी अ‍ॅडम्स (व्हॉइस) एमा स्टोन ( द फेव्हरिट) यांना नामांकने असून उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘दी वाइफ’ मधील ग्लेन क्लोज हिला नामांकन मिळाले आहे. ख्रिस्तियन बेल, महेर्शला अली, सॅम रॉकवेल, रेचल वेझ यांचाही नामांकनात समावेश आहे.

ऑनलाइन निवडणूक जाहिरातीत पारदर्शकता ठेवण्याचे गुगलकडून स्पष्ट :
  • भारतात लोकसभा निवडणुकीच्या वेळी केल्या जाणाऱ्या जाहिरातीत पारदर्शकता राखली जाईल असे गुगलने मंगळवारी स्पष्ट केले आहे. या काळात ज्या राजकीय जाहिराती गुगलवरून केल्या जातील, त्यात जाहिरातदार व त्यांनी त्यासाठी खर्च केलेला पैसा हा तपशील जाहीर करण्यात येईल असे गुगलने सांगितले. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळाने याबाबत अशीच भूमिका आधी जाहीर केली आहे.

  • गुगलने एका निवेदनात म्हटले आहे, की भारतासाठी आम्ही निवडणूक किंवा राजकीय जाहिरातींबाबत धोरण आखले असून त्यात जाहिरातदारांना निवडणूक आयोगाकडून जाहिरात करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जाहिरातदारांची ओळखही तपासून पाहिली जाणार आहे.

  • ऑनलाइन निवडणूक जाहिरातीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी भारत विशिष्ट राजकीय जाहिरात पारदर्शकता अहवाल व राजकीय जाहिराती शोध वाचनालय या सुविधा दिल्या जाणार आहेत. निवडणूक जाहिराती कोण देत आहे व त्यावर किती पैसा खर्च केला जात आहे, याची माहिती त्यामुळे उघड होणार आहे.

  • जाहिरातदार तपासणी प्रक्रिया १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पादशर्कता अहवाल व जाहिरात वाचनालय मार्च २०१८ मध्ये थेट प्रदर्शित केले जाईल. देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास समाजमाध्यमांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. बेकायदेशीर मजकूर टाळण्यासाठी काही साधने उपलब्ध करण्यात यावीत, असे नवीन नियमात सरकारने म्हटले आहे. ट्विटरने असे म्हटले होते, की राजकीय पक्ष ज्या जाहिराती देतील त्याच्या खर्चाचा तपशील देणारा डॅशबोर्ड सुरू करण्यात येईल. डिसेंबरमध्ये फेसबुकने असे म्हटले होते, की जाहिरातदारांना ओळख जाहीर करण्यास सांगितले जाईल , त्यांचे ठिकाणही नोंदवले जाईल.

भारतीय अर्थव्यवस्था घेणार झेप; ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज :
  • वॉशिंग्टन : भारतीय अर्थव्यवस्था २0१९ मध्ये ७.५ टक्क्यांनी, तर २0२0 मध्ये ७.७ टक्क्यांनी वाढेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. या दोन वर्षांतील चीनच्या ६.२ टक्के या अनुमानित वृद्धिदराच्या तुलनेत भारताचा वृद्धिदर अत्यंत प्रभावशाली आहे.

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सोमवारी आपला ‘जानेवारी वर्ल्ड इकॉनॉमी आउटलूक’ हा अहवाल जारी केला. त्यात म्हटले आहे की, २0१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था गतिमान होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सध्या नरमाई असून, महागाई घसरल्यामुळे पतधोरणातील कठोरपणा कमी होण्यास मदत होणार आहे. ेयाचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळेल.

  • नाणेनिधीने म्हटले की, अमेरिकेने केलेल्या करवाढीचा परिणाम रोखण्यासाठी काही वित्तीय प्रोत्साहन उपाय चीनने योजले आहेत, तरीही चीनची अर्थव्यवस्था मंदावेल. आवश्यक वित्तीय नियामकीय बंधने आणि अमेरिकेसोबतचा व्यापारी संघर्ष याचा परिणाम चीनवर जाणवणार आहे.

  • अहवालात म्हटले आहे की, उगवत्या आणि विकसनशील आशियातील आर्थिक वृद्धिदर मात्र घसरणार आहे. २0१८ मध्ये ६.५ टक्के असलेला येथील वृद्धिदर २0१९ मध्ये ६.३ टक्के आणि २0२0 मध्ये ६.४ टक्के होईल. २0१७ मध्ये चीनचा वृद्धिदर ६.९ टक्के, तर भारताचा वृद्धिदर ६.७ टक्के होता. २0१८ मध्ये चीनचा वृद्धिदर ६.६ टक्के राहिला; २0१९ आणि २0२0 मध्ये तो ६.२ टक्के राहील. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.

  • १९३२: प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.

  • १९६८: शीतयुद्ध - उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.

  • १९७३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.

  • १९९७: मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.

जन्म 

  • १८१४: भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३)

  • १८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)

  • १८९८: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)

  • १९१५: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९७२)

  • १९२०: व्यासंगी लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म.

  • १९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)

  • १९३४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)

  • १९४७: इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मेगावती सुकार्नोपुत्री यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन. (जन्म: १८ मार्च १५९४)

  • १९१९: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन. (जन्म: २६ मे १८८५)

  • १९३१: द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अ‍ॅना पाव्हलोव्हा यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)

  • १९५९: शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर यांचे निधन.

  • १९९२: भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.