चालू घडामोडी - २३ जुलै २०१७

Date : 24 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आर्यलडकडून पराभवामुळे भारताला आठवे स्थान :
  • आर्यलडविरुद्ध १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारताला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला असून त्यामुळे जागतिक महिला हॉकी लीगमध्ये (उपांत्य टप्पा) भारतीय संघ आठव्या क्रमांकावर फेकला गेला.

  • आघाडी घेतल्यानंतरही खेळावरील नियंत्रण गमावत सामन्यात पराभव स्वीकारणे, हे भारतीय हॉकी संघाचे वैशिष्टय़ मानले जाते.

  • उत्कंठापूर्ण सामन्यात १५व्या मिनिटाला गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल केला आणि भारताचे खाते उघडले.

  • त्यानंतर पेनल्टी स्ट्रोकसह अनेक हुकमी संधी मिळूनही भारताला आणखी गोल करता आले नसून सामन्याच्या ४७ व्या मिनिटाला कॅथरीन मुल्लनने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत आर्यलडचा पहिला गोल केला आणि १-१ अशी बरोबरी साधली.

बंगळुरूतील संस्था चंद्रावर पहिलं खासगी स्पेसक्राफ्ट पाठवायचा तयारीत :
  • अंतराळ क्षेत्रातील कामगिरीमध्ये भारतासाठी हे वर्ष खूप यशस्वी असल्याचं बोललं जातं असून भारताच्या या यशस्वी पर्वात आणखी एक नाव जोडलं आहे.

  • बंगळुरूतील 'इंडस' ही संस्था लवकरच अवकाश क्षेत्रात मोलाची कामगिरी करायला सज्ज झाली आहे.

  • या वर्षअखेरपर्यंत चंद्रावर जगातील पहिलं खासगी स्पेसक्राफ्ट पाठविण्याच्या तयारीत इंडस ही संस्था आहे. आपल्या ध्येयापासून इंडसची टीम फक्त एक पाऊल लांब आहे.

  • या टीमचं खासगी स्पेसक्राफ्टचं संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर हे क्राफ्ट एका पीएसएलव्हीद्वारे श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केलं जाणार आहे.

अमेरिकेकडून PoKचा 'आझाद काश्मीर' म्हणून उल्लेख, भारताने नोंदवला निषेध :
  • अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने आपल्या दहशतवादी अहवालात पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा 'आझाद जम्मू काश्मीर' असा उल्लेख केला आहे.

  • सोबतच भारताला टार्गेट करण्यासाठी दहशतवादी या भागाचा वापर करतात असंही या अहवालातून सांगण्यात आलं असून 'कन्ट्री रिपोर्ट ऑन टेररिझम २०१६' नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  • भारताने याप्रकरणी अमेरिकेकडे आपला निषेध नोंदवला आहे. 

भारत- इंग्लंड यांच्यात आज अंतिम सामना; भारताची ऐतिहासिक विश्वविजेतेपदावर नजर :
  • भारतीय महिला क्रिकेट संघाची नजर आज, रविवारी इंग्लंडविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून ऐतिहासिक विश्वविजेतेपद पटकविण्यावर असेल.

  • सहापैकी चारवेळा चॅम्पियन राहिलेल्या आॅस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत ३६ धावांनी लोळवून स्वत:ची क्षमता सिद्ध केली.

  • भारतीय संघ २००५ मध्ये देखील या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाला, आजचा सामना जिंकल्यास महिला क्रिकेटकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोनच बदलून जाईल.

  • भारतीय पुरुष संघाने १९८३ मध्ये लॉर्डस्वर बलाढ्य वेस्ट इंडीजला नमवीत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. मिताली आणि झुलन या दोघी २००५ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेल्या संघातील खेळाडू संघात कायम आहेत.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • क्रांती दिन : इजिप्त.

जन्म, वाढदिवस

  • बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी : २३ जुलै १८५६

  • चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक : २३ जुलै १९०६

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • हसन तिसरा, मोरोक्कोचा राजा : २३ जुलै १९९९

  • सर विल्यम रामसे, नोबेल पारितोषिक विजेता स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ : २३ जुलै १९१६

ठळक घटना

  • जोसेफ रॅट्झिंगर (भविष्यातील पोप बेनेडिक्ट सोळावा) याच्या नेतृत्त्वाखालील समितीने जाहीर केले की समलिंगी व्यक्ती व लग्न न करता एकत्र राहणार्‍या व्यक्तींचे हक्क मर्यादित ठेवले पाहिजेत : २३ जुलै १९९२

  • अबखाझियाने जॉर्जियापासून स्वातंत्र्य जाहीर केले : २३ जुलै १९९२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.